7th Pay Commission : PMC : अखेर वेतन आयोगानुसार वेतन होण्यास सुरुवात 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

अखेर वेतन आयोगानुसार वेतन होण्यास सुरुवात 

: महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा 

 
पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वेतन आयोग लागू झाला तरी त्याचा लाभ मिळालेला नव्हता. कारण वेतन निश्चितीकरण प्रक्रिया व बिल तपासणे अधुरे राहिले होते. मात्र महापालिका प्रशासनाने लगबग करत ही प्रक्रिया पूर्ण करत आणली आहे. त्यानुसार सोमवार पासून कर्मचाऱ्यांना वेतन आयोगानुसार वेतन मिळू लागले आहे. जवळपास साडे आठ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन झाले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील लवकरच वेतनाचा लाभ मिळेल. अशी माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी दिली. 
 

: साडे आठ हजार कर्मचाऱ्यांना मिळाला लाभ 

महापालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्यानुसार नोव्हेंबर पेड इन डिसेंबर वेतन करण्याचे आदेश आहेत. मात्र डिसेंबर ची 19 तारीख उलटून गेले तरी वेतन झालेले नव्हते. त्यामुळे कर्मचारी परेशान होते. शिवाय तक्रारी देखील येत होत्या. याची दखल घेत प्रशासनाने वेतन करण्यासाठी लगबग सुरु केली होती. मनपा भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयातील बिल लेखनिकांना शनिवार आणि रविवारी देखील कामावर हजर राहून बिले तपासण्याचे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी दिले होते. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करत आणली आहे. त्यानुसार सोमवार पासून कर्मचाऱ्यांना वेतन आयोगानुसार वेतन मिळू लागले आहे. जवळपास साडे आठ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन झाले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील लवकरच वेतनाचा लाभ मिळेल.

वेतन आयोग आणि त्यातील वेतन निश्चितीकरणानुसार कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येत आहे. सोमवारी जवळपास साडे आठ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात आले. उर्वरित बिले आल्यानंतर त्यांचे ही वेतन अदा करण्यात येईल. 

           उल्का कळसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका.

Leave a Reply