Hadapsar Flyover | हडपसर मधील उड्डाणपूल पाडण्याची नितीन गडकरींकडे मागणी | शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिले पत्र

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

Hadapsar Flyover | हडपसर मधील उड्डाणपूल पाडण्याची नितीन गडकरींकडे मागणी

| शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिले पत्र

Hadapsar Flyover | हडपसरमधील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम उड्डाणपूलामुळे (Sant Dnyaneshwar and Sant Tukaram Flyover) नागरिकांना समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे हा पूल पाडून अखंड पूल बांधण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे (Shivsena City Chief Pramod Nana Bhangire) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Road and Highway Minister Nitin Gadkari) यांच्याकडे केली आहे. (Hadapsar Flyover)

याबाबत भानगिरे यांनी मंत्री गडकरी यांना पत्र दिले आहे. त्यानुसार गेल्या कित्येक वर्षापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा प्रश्न आपण विक्रमी वेळेत सोडवला.  चांदणी चौकासारखाच वाहतुकीचा प्रश्न पुणे महानगरातील हडपसर उपनगरात असलेल्या संत ज्ञानेशवर आणि संत तुकाराम उड्डाणपूलामुळे नागरिकांना सतावतोय. उड्डाणलापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ (जुना क्रमांक ९) पुणे ते मच्छलीपट्टणम सुरु होतो या महामार्गामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही राज्ये जोडली गेली आहेत त्यामुळे उड्डाणपुलावरून मोठया प्रमाणात सातत्याने वाहतूक असते. मुळात एकच असलेल्या या पूलाला पुढे सासवड रस्त्यावर जाण्यासाठी वेगळा मार्ग बांधण्यात आला. या जोडकामामुळे मुळातील पूल अत्यंत कमकुवत झाला आहे. परिणामी आठवड्यातील चार ते पाच दिवस उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागत आहे. (Hadapsar Flyover News)


ज्यामुळे उड्डाणपूल तयार करण्याचा मूळ हेतुच नाहीसा होत आहे. उड्डाणपूलाचा उपयोग होत नसल्याने, परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होते. ज्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांचे अनेक तास निव्वळ वाहतूक कोंडीमूळे वाया जात आहेत. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत येथे अनेक अपघात झालेले आहेत. त्यापैकी काही अपघातात जीवितहानी देखील झाली आहे. तसेच हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी फातिमानगर ते मांजरी फाटा, सोलापूर रोड लोणी काळभोर जवळ हा उडडाणपूल अखंड करण्यात आला तर पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्या नागरिकांना, जड वाहनांना, सार्वजनिक बसेस आदि सर्व प्रकारच्या वाहनांना सहजपणे सोलापूरला जाता येईल. हडपसर भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून, वाहतूक कोंडीमुक्त पुणे शहर होण्यास मदत होईल. तरी आपण वरील निर्णय हडपसरमधील जनतेच्या हितासाठी लवकरात लवकर घेऊन हा चुकीचा उड्डणपूल पाडण्यात यावा आणि नव्याने अखंडपूल बांधण्यात यावा. अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे. (Pune News)

—-
News Title | Hadapsar Flyover | Demand to Nitin Gadkari to demolish the flyover in Hadapsar| The letter was given by Shiv Sena city chief Pramod Bhangire