UPA : Sharad pawar : UPA अध्यक्ष पदात मी पडणार नाही  : शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र
Spread the love

UPA च्या अध्यक्ष पदात मी पडणार नाही

: शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

कोल्हापूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. याच बैठकीत शरद पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद सोपवण्याचा ठराव मांडण्यात आला आणि संमतही करण्यात आला. तेव्हापासून शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA)अध्यक्ष होण्यासंबंधी  चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांना आज शरद पवारांनी आज पूर्णविराम दिला. पवार कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलते होते.

शरद पवार म्हणाले, ”युपीएच्या अध्यक्षपदासाठी मला रस नाही, जनाधार असलेल्या पक्षांना एकत्र घेऊन पर्याय द्यावा, विरोधकांनी एकत्र यावे, यासाठी मी पाठिंबा आणि जी मदत हवी असेल ती देणार आहे. मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्याच पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य देण्यासाठी माझी तयारी आहे,”

”इतर सर्व पक्षांचीही राज्या राज्यांमध्ये शक्तीकेंद्र आहेत. पण काँग्रेस एक असा पक्ष आहे जो देशाच्या प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात आहे. आज त्यांची सत्ता नसेल पण काँग्रेस कार्यकर्ता देशाच्या प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात, गावात पहायला मिळतो. त्यामुळे पर्यायी काही करायचं असेल तर ज्या पक्षाचा वेस व्यापक आहे त्याला घेऊन करणं वास्तव्याला धरुन होईल. तसा विचार वेगवेगळ्या पक्षातील लोक करत असतील तर त्याच्यातून काही निर्णय येण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षाने एकत्र यावं असं म्हणतात त्यावेळी काही वास्तव गोष्टी दुलर्क्ष करुन चालणार नाहीत.ममता बॅनर्जींचा अत्यंत शक्तिशाली पक्ष आहे, सत्ता असून लोकांचा पाठिंबा आहे,” असे पवार म्हणाले.

संजय राऊतांनी युपीएचा सातबारा काँग्रेस आणि गांधी घराण्याकडे असून तो बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे, याबाबत पवारांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ” ते संजय राऊत यांचे मत आहे माझं मत नाही,”

Leave a Reply