NCP : Pune : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नामकरण

Categories
Political पुणे
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नामकरण

पुणे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येस राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नामकरण, तैलचित्राचे अनावरण आणि पु. ल. देशपांडे ग्रंथालयाचा उद्घाटन समारंभ बुधवारी पार पडला.

डेंगळे पूल, शिवाजी नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथील दुसऱ्या मजल्यावर कार्यकर्ता प्रशिक्षणासाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाचे स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह असे नामकरण करण्यात आले. मराठी साहित्य समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते नामकरण समारंभ पार पडला. तसेच, या सभागृहातील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्राचे अनावरण व पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी उभारण्यात आलेल्या पु. ल. देशपांडे ग्रंथालयाचे उद्घाटनही मिलिंद जोशी यांच्या हस्ते पार पडले.

मिलिंद जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनचरित्राचे अनेक पैलू उलगडून सांगितले तसेच पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.ग्रंथालयाच्या माध्यमातून विचारांची पकड अधिक मजबूत होण्यास मदत होईल. सध्याच्या या असहिष्णू काळात विचारांची लढाई विचारानेच लढण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याची गरज असून येत्या काळातील ही लढाई जिंकताना पु. लं.च्या विचारांचा निश्चित उपयोग होईल, याची खात्री आहे असेही श्री.मिलिंद जोशी म्हणाले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप, जेष्ठनेते श्री.अंकुश काकडे,विरोधीपक्ष नेत्या सौ.दिपालीताई धुमाळ, शहर उपाध्यक्ष श्री.संदीप बालवडकर,राष्ट्रवादी युवकचे श्री.महेश हांडे,युवती शहराध्यक्षा सुषमा सातपुते, कार्याध्यक्षा अँड.श्रुती गायकवाड आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply