Chaitanya Laughter Yoga Mandal | सुखी जीवनासाठी हास्याची जोड हवी | डॉ. सिद्धार्थ धेंडे | चैतन्य हास्य योग मंडळाचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र
Spread the love

सुखी जीवनासाठी हास्याची जोड हवी | डॉ. सिद्धार्थ धेंडे

| चैतन्य हास्य योग मंडळाचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सुखी आयुष्यासाठी सतत हसत राहणे आवश्‍यक आहे. हसण्याची जोड दिल्यास जगणे आनंदी होऊन जाते. हास्य क्‍लबच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य लोकांच्या आनंदात भर घालणारे आहे. इथे सुख आणि दुःखावर चर्चा होते. त्यामुळे मनावर असणारे ओझे हलके होण्यास मदत होते. त्यामुळे हास्य क्‍लबकडून उत्कृष्ट काम केले जाते, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.

महाराष्ट्र हौसिंग बोर्ड – नागपूरचाळ येथील चैतन्य हास्य योग मंडळ, लुंबिनी उद्यान समतानगर हास्य क्‍लबचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समता बालक मंदिराच्या सभामंडपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे बोलत होते.
या वेळी लेखक व प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे प्राचार्य पद्माकर पुंडे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते मंगेश गोळे, शिवसेनेचे यशवंत शिर्के, भाजपा चिटणीस राजू बाफना, सामाजिक कार्यकर्ते, शिवाजी ठोंबरे, दिलीप म्हस्के, त्रिदल नगर सोसायटीचे चेअरमन पांलाडे आदींसह हास्य क्‍लबचे पदाधिकारी, कार्याध्यक्ष श्री. प्रभाकर घुले व इतर १५० सभासद या वेळी उपस्थित होते.

प्राचार्य पद्माकर पुंडे म्हणाले की, समाजात एकोपा राहणे आवश्यक आहे. त्यासाठी क्लब, टीम आदीसारखे एकत्रित येऊन उपक्रम राबविणे आवश्यक आहे. हास्य क्लबद्वारे चांगले उपक्रम घेतले जात आहेत. कितीही अडचणी आल्या तरी त्याला हसत सामोरे जाऊन मात करावी.

मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आंब्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. परूळीकर मॅडम यांनी निवेदन केले.