Maratha Reservation Survey | मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास २ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

Categories
Breaking News social महाराष्ट्र
Spread the love

Maratha Reservation Survey | मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास २ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

 

Maratha Reservation Survey |  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत (Maharashtra State Commission for Backward Classes) मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण (Maratha Samaj Survey) करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा कालावधी दि.३१ जानेवारी २०२४ पर्यत होता. तथापि काही ठिकाणी सर्वेक्षणास आणखी कालावधीची आवश्यकता असल्याने या सर्वेक्षणासाठी ०२ फेब्रुवारी २०२४ पर्यत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती आयोगामार्फत प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. (Maratha Reservation Survey)

आयोगामार्फत प्रगणकांना सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती मोबाईल अॅप्लीकेशनमधील प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जात आहे. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जात नाही.

सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. नागरिकांनी सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन आयोगामार्फत करण्यात येत आहे.