Maratha Reservation Survey in Pune City | Pune PMC News | पुण्यात पुणे महापालिकेकडून 14 लाख 30 हजार घरांचे सर्वेक्षण | शहरात 12 लाख मिळकती

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

Maratha Reservation Survey in Pune City | Pune PMC News | पुण्यात पुणे महापालिकेकडून 14 लाख 30 हजार घरांचे सर्वेक्षण | शहरात 12 लाख मिळकती

| उपायुक्त चेतना केरुरे यांची माहिती

Maratha Reservation Survey in Pune City| Pune PMC | पुण्यात पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC)) प्रगणकाद्वारे मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. 2 फेब्रुवारी म्हणजे विहित कालावधीत 14 लाख 30 हजार घरांचा सर्वे झाला आहे. महापालिका उपायुक्त चेतना केरुरे (Chetna Kerure PMC) यांनी ही माहिती दिली आहे. 23 जानेवारी पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण (Maratha Reservation Survey in Maharashtra) सुरु करण्यात आले होते. (Maratha Reservation News)

| 3 हजारहून अधिक प्रगणकाची नियुक्ती

या कामासाठी  महाराष्ट्र  शासनाने महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग  आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे  काम सोपवले होते. त्यानुसार पुणे शहरामध्ये  देखील मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण  होत आहे.   सर्वेक्षण 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी  या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation) मार्फत नियुक्त केलेल्या 3 हजाराहून प्रगणकामार्फत पूर्ण करण्यात  आले आहे. सदरील  सर्वेक्षण  मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप MSBCC वर livedata entry मार्फत  करण्यात आले. (Pune PMC News)

– मिळकतकर विभागाच्या माहितीनुसार शहरात 12 लाख मिळकती

2 फेब्रुवारी पर्यंत महापालिकेने 14 लाख 30 हजार घरांचे सर्वेक्षण केले आहे. शहरात जवळपास 12 लाख हून अधिक मिळकती आहेत. असे मिळकतकर विभागाचे म्हणणे आहे. याबाबत केरुरे यांनी सांगितले कि आम्ही हा अहवाल सरकारकडे जमा केला आहे. तसेच आम्हांला दिलेलं उद्दिष्ट आमच्या कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने पूर्ण केले आहे.

Maratha Reservation Survey | मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास २ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Maratha Reservation Survey | मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणास २ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

 

Maratha Reservation Survey |  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत (Maharashtra State Commission for Backward Classes) मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण (Maratha Samaj Survey) करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा कालावधी दि.३१ जानेवारी २०२४ पर्यत होता. तथापि काही ठिकाणी सर्वेक्षणास आणखी कालावधीची आवश्यकता असल्याने या सर्वेक्षणासाठी ०२ फेब्रुवारी २०२४ पर्यत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती आयोगामार्फत प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. (Maratha Reservation Survey)

आयोगामार्फत प्रगणकांना सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती मोबाईल अॅप्लीकेशनमधील प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जात आहे. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जात नाही.

सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. नागरिकांनी सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन आयोगामार्फत करण्यात येत आहे.

Maratha Survey of 6 lakh 40 thousand Properties by Pune Municipal Corporation (PMC) in Pune

Categories
Breaking News PMC social पुणे

Maratha Survey of 6 lakh 40 thousand Properties by Pune Municipal Corporation (PMC) in Pune

|  45% work done

 |  Information from Deputy Commissioner of PMC Chetna Kerure

 Maratha Reservation Survey in Pune City|  Pune PMC |  Maratha Reservation Survey in Maharashtra has been started from Tuesday (January 23) to check the economic and social backwardness of the Maratha community.  Maharashtra State Commission for Backward Classes (State Commission for Backward Classes) published the notification in this regard.  The survey will be conducted from 23rd January to 31st January 2024 by going door to door of Maratha and open category people.  Accordingly, this survey is being conducted by the enumerator of Pune Municipal Corporation (PMC) in Pune.  So far 6 lakh 40 thousand houses have been surveyed and 45% of the work has been completed, claimed Municipal Deputy Commissioner Chetna Kerure PMC.  (Maratha Reservation News)

 |  Appointment of more than 3 thousand enumerators

 For this work, the Government of Maharashtra has entrusted the task of checking the backwardness of the Maratha community to the Maharashtra State Commission for Backward Classes.  Accordingly, a survey of Maratha community and open category citizens is also being conducted in Pune city.  The survey is being completed by more than 3 thousand enumerators appointed by Pune Municipal Corporation from January 23 to 31.  The said survey is being conducted from house to house within the municipality limits through livedata entry on the mobile app MSBCC.  (Pune PMC News)

 – 100% less likely to be surveyed!

 Till January 29, the Municipal Corporation has conducted a survey of 6 lakh 40 houses.  The city has an income of over 12 lakhs.  It means that the Municipal Corporation has completed 45% of the work.  The Municipal Corporation has two more days left.  Can the entire city be surveyed in these two days?  Such a question arises.  On the other hand, the municipal employees are being beaten up by the people without informing them.  This also creates difficulties in the survey.  Also, the employees of the municipal corporation have also suffered due to giving the area far away from their homes.  Therefore, conducting a 100% survey of the entire city will be a challenge for the Municipal Corporation.

Maratha Reservation Survey in Pune City | Pune PMC News | पुण्यात पुणे महापालिकेकडून 6 लाख 40 हजार घरांचे सर्वेक्षण | 45% काम पूर्ण

Categories
Breaking News PMC social पुणे

Maratha Reservation Survey in Pune City | Pune PMC News | पुण्यात पुणे महापालिकेकडून 6 लाख 40 हजार घरांचे सर्वेक्षण | 45% काम पूर्ण

| उपायुक्त चेतना केरुरे यांची माहिती

Maratha Reservation Survey in Pune City| Pune PMC | मंगळवार (23 जानेवारी) पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण (Maratha Reservation Survey in Maharashtra) सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे (State Commission for Backward Classes) यासंदर्भातील सूचना प्रकाशित केली होती. 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या  काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार पुण्यात पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC)) प्रगणकाद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत 6 लाख 40 हजार घरांचा सर्वे झाला असून 45% काम पूर्ण झाल्याचा दावा महापालिका उपायुक्त चेतना केरुरे (Chetna Kerure PMC) यांनी केला आहे. (Maratha Reservation News)

| 3 हजारहून अधिक प्रगणकाची नियुक्ती

या कामासाठी  महाराष्ट्र  शासनाने महाराष्ट्र  राज्य मागासवर्ग  आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे  काम सोपवले आहे. त्यानुसार पुणे शहरामध्ये  देखील मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण  होत आहे.   सर्वेक्षण  २३ ते ३१ जानेवारी  या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation (PMC) मार्फत नियुक्त केलेल्या 3 हजाराहून प्रगणकामार्फत पूर्ण करण्यात  येत आहे. सदरील  सर्वेक्षण  मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप MSBCC वर livedata entry मार्फत  करण्यात  येत आहे. (Pune PMC News)

– 100% सर्वेक्षण होण्याची शक्यता कमी!

29 जानेवारी पर्यंत महापालिकेने 6 लाख 40 घरांचे सर्वेक्षण केले आहे. शहरात जवळपास 12 लाख हून अधिक मिळकती आहेत. म्हणजे महापालिकेने 45% काम पूर्ण केले आहे. महापालिकेकडे अजून दोन दिवस बाकी आहेत. या दोन दिवसात पूर्ण शहरात सर्वेक्षण होऊ शकेल का? असा प्रश्न निर्माण होत आहे. तर दुसरीकडे लोकांकडून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती न देता पिटाळून लावले जात आहे. यामुळे देखील सर्वेक्षणात अडचणी आहेत. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरापासून दूरचा परिसर दिल्याने कर्मचारी देखील त्रासून गेले आहेत. त्यामुळे पूर्ण शहराचे 100% सर्वेक्षण करणे, हे महापालिकेपुढे आव्हान असेल.

Maratha Reservation Latest News | PMC Pune | मराठा सर्वेक्षण | पुण्यात महापालिकेच्या प्रगणकासमोर तांत्रिक अडचणींचा डोंगर! 

Categories
Breaking News PMC social पुणे

Maratha Reservation Latest News | PMC Pune | मराठा सर्वेक्षण | पुण्यात महापालिकेच्या प्रगणकासमोर तांत्रिक अडचणींचा डोंगर!

Maratha  Reservation Latest News | Pune PMC | आज पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण (Maratha Reservation Survey) सुरु करण्यात आलं आहे. 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पुणे शहरात देखील महापालिकेच्या (Pune Municipal Corporation PMC) वतीने 2007 प्रगणक नियुक्त करून सर्वेक्षण सुरु केले आहे. मात्र महापालिकेच्या या प्रगणकांना सर्वे करताना खूप तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे खूपच थोडे लोक 25 पेक्षा जास्त घरात सर्वेक्षण करू शकले आहेत. (Pune Municipal Corporation News)

पुणे शहरामध्ये  देखील मराठा समाज व खुल्या  प्रवर्गातील नागरिकाचे सर्वेक्षण  होत आहे.   सर्वेक्षण  २३ ते ३१ जानेवारी  या कालावधीत पुणे मनपा (Pune Municipal Corporation) मार्फत नियुक्त केलेल्या  २००७ प्रगणकामार्फत पूर्ण करण्यात  येणार आहे. सदरील  सर्वेक्षण  मनपा हद्दीतील घरोघरी जाऊन मोबाईल ॲप वर livedata entry मार्फत  करण्यात  येणार आहे. (Pune PMC News)

: या येत होत्या अडचणी

महापालिकेच्या प्रगणकांना दररोज 100 घरांत जाऊन सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार प्रगणकांनी आजपासून काम सुरु केले आहे.  मात्र काही कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार पहिल्याच दिवशी सर्वे करण्याचा ऍप बंद होता. काही ठिकाणी रेंज नसायची. काही ठिकाणी लोकांनी घरातच घेतले नाही. काही लोकांनी सांगून टाकले कि आम्हांला माहिती द्यायची नाही. काही लोकांना माहिती द्यायची होती, मात्र सरकारने दिलेले प्रश्नच असे होते कि लोकांना उत्तरे देताना कचरल्यासारखे झाले. त्यामुळे प्रगणक देखील प्रश्न विचारताना खजील होत होते. काही प्रगणकांनी सांगितले कि मराठा सोडून इतर समाजाची माहिती ऍप मध्ये भरताना फार अडचणी येत नाहीत. मात्र मराठा समाजाची माहिती भरताना ऍप मधेच बंद पडायचा. त्यामुळे सर्व्हर देखील बंद पडायचा. त्यामुळे नव्याने माहिती भरावी लागायची. यामुळे आम्ही 20 घरांच्या पुढे सर्वे करू शकलो नाही. काही प्रगणकांनी सांगितले कि मुस्लिम समाजातील लोकांना त्यांच्या जाती आणि उपजाती माहित नाहीत. समजा कुणाचे आडनाव इनामदार असेल तर ते सांगतात आम्ही उच्च जातीतील आहोत, मात्र त्यांना जात सांगता येत नाही. त्यामुळे देखील माहिती भरताना अडचणी येत होत्या.

: सरकारला खरंच आरक्षण द्यायचे आहे का?

दरम्यान सरकारच्या मागासवर्ग आयोगाने जी प्रश्नावली तयार केली आहे ते प्रश्न विचारणारे  आणि त्याची उत्तरे देणारे असे दोघेही प्रश्नांना त्रासून गेले आहेत. अशा प्रश्नातून काय साध्य होणार आहे, हे कुणाला समजेनासे झाले आहे. त्यामुळे सरकार असा सर्वे करून फक्त वेळकाढूपणा करत आहे का? सरकारला मराठा समाजाला खरंच आरक्षण द्यायचे आहे का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सर्वेक्षणात कोणते प्रश्न विचारले जात आहेत?

तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची परवानगी आहे का?

लग्न झालेल्या स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे असा नियम आहे का?

जागरण गोंधळ किंवा अन्य विधीसाठी कोंबडा किंवा बोकड कापण्याची पद्धत आहे का?

हे आणि असे एकूण 154 प्रश्न विचारून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे.

मागासवर्ग आयोगाने या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली आहे. त्यानुसार मुख्यतः पाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील.

यातल्या मॉड्यूल ए मध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती, तुमचं नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का, नसाल तर तुमची जात कोणती असे एकूण 14 प्रश्न विचारले जातील.

मॉड्यूल बी मध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता? तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त आहे? तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता? सध्या तुम्ही काय करता? तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का? असे एकूण 20 प्रश्न असतील.

मॉड्यूल ‘सी’ मध्ये तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

तुमच्या घरात शौचालय आहे का?

तुमच्याकडे शेती आहे का? असेल तर ती कुणाच्या नावावर आहे?

तुमच्या कुटुंबावर किती कर्ज आहे?

मागच्या पंधरा वर्षांमध्ये तुम्ही स्थावर मालमत्ता विकली आहे का?

तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी धुणी भांडी, स्वयंपाक, झाडलोट करायला जाते का? असे एकूण 76 प्रश्न असतील.

या प्रश्नावलीच्या मॉड्यूल ‘डी’मध्ये समाजाचं मागासलेपण तपासलं जाईल.

तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का?

विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का?

तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं?

गेल्या दहा वर्षांत तुमच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केली आहे का?

असे एकूण 33 प्रश्न असतील.

आणि मॉड्यूल ‘ई’मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण अकरा प्रश्न विचारले जातील. तर असे एकूण 154 प्रश्न विचारून तुमचे कुटुंब सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाईल.