Mosquito Tornados in Pune | डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिका ड्रोन च्या माध्यमातून करणार औषध फवारणी! 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे
Spread the love

Mosquito Tornados in Pune | डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिका ड्रोन च्या माध्यमातून करणार औषध फवारणी!

| वाढत्या जलपर्णीनेच डासांची जास्त पैदास | आरोग्य विभागाचा खुलासा

Mosquito Tornados in Pune | पुणे | शहरात गेल्या आठवड्या भरापासून डासांची पैदास (Mosquito Émergence in Pune) अचानक वाढली आहे. मात्र ही पैदास वाढत्या जलपर्णी मुळे झाली आहे. असा खुलासा महापालिका आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Dr Surykant Devkar PMC) यांनी केला आहे. तसेच आगामी काळात जलपर्णीमुळे होणारी डासांची पैदास रोखण्यासाठी ड्रोन च्या माध्यमातून औषध फवारणी केली जाईल. असे ही डॉ देवकर यांनी सांगितले. (PMC Health Department)
पुणे शहरात डासांची पैदास अचानक वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कारण डासांची जास्त पैदास आणि त्यामुळे आजार वाढण्याचे प्रमाण हे सप्टेंबर महिन्यात होत असते. मात्र फेब्रुवारी महिन्यात अचानक ही पैदास वाढल्याने नागरिक त्रासले आहेत. यामुळे अजून तरी कुठले आजार वाढले नसले तरी नागरिकांमधून तक्रारी येऊ लागल्या आहेत. याबाबत आरोग्य विभागाकडून खुलासा करण्यात आला आहे.
the karbhari - mosquito fogging  pmc
सहायक आरोग्य अधिकारी डॉ देवकर यांनी सांगितले कि, नदीतील पाण्यावर जलपर्णी वाढल्याने डास वाढले आहेत. ही जलपर्णी आटोक्यात येणे आवश्यक आहे. तरीही आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. डासांची घनता वाढलेल्या परिसरात आम्ही तिथे जाऊन फवारणी करतो. तसेच आमचे कर्मचारी तक्रारी आलेल्या परिसरात साप्ताहिक फवारणी करत असतात. डॉ देवकर यांनी सांगितले कि, नुकतेच आम्ही खराडी परिसरातील नदीत वाढलेल्या जलपर्णीची पाहणी केली.  जलपर्णी वाढीचा वेग जास्त असल्याने डासांची पैदास देखील जास्त होत आहे. त्यामुळे आता गरज भासली तर आम्ही ड्रोन च्या माध्यमातून औषध फवारणी करुन पैदास आटोक्यात आणू.