Movement For FRP : एकरकमी एफआरपीसाठी भाजपा किसान मोर्चा आक्रमक

Categories
पुणे शेती
Spread the love

एकरकमी एफआरपीसाठी भाजपा किसान मोर्चा आक्रमक

: वासुदेव नाना काळे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलाबाहेर असंख्य कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन

पुणे: महाविकास आघाडी सरकारच्या एकरकमी एफआरपी न देण्याच्या शिफारशींच्या विरोधात भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा एल्गार आज पुण्यातील शिवाजीनगर येथील साखर संकुल परिसरात पाहायला मिळाला. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. वासुदेव नाना काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या जुलमी धोरणाविरोधात धिक्कार करत आंदोलन केले.

शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही

शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावा यासाठी भाजपा किसान मोर्चा आवाज उठवत आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यभर शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेले आहे. मुसळधार कोसळणारा पाऊस, झालेले प्रचंड नुकसान त्यामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याची शिफारस केली आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे निर्दयी महाविकास आघाडी सरकार करत आहे.
त्याचाच निषेध करत आज हजारो कार्यकर्त्यांनी साखर संकुलावर धरणे आंदोलन केले. आयुक्तांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांचे निवेदन देऊ केले. शेतकऱ्याला एकरकमी एफआरपी मिळेणे हा त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार त्यांना प्राप्त होईपर्यंत आम्ही थांबणार नाही असा इशारा किसान मोर्चाच्यावतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply