PMC Health Department | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची कंत्राटदारावर कोट्यवधी रुपयांची खैरात!

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे
Spread the love

PMC Health Department | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची कंत्राटदारावर कोट्यवधी रुपयांची खैरात!

| कोविड काळात CSR मधून जमा झालेल्या पैशाचा गैरवापर

PMC Health Department | पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) बोपोडी येथील महापालिकेच्या मालकीचे रुग्णालय (PMC Bopodi Hospital) व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन (Vision Next Foundation) या संस्थेला PPP तत्वावर ३० वर्षांसाठी चालवण्यासाठी दिले.  मात्र करारात तरतूद नसताना देखील महापालिका आरोग्य विभागाने (PMC Health Department) दोन कोटी रुपये खर्च करून स्वतः च्या पैशातून एक OCT मशीन व एक यलो लेसर मशीन विकत घेऊन या रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या समोर ठेवला आहे. विशेष म्हणजे यासाठी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध नसल्याने कोविड काळात सी एस आर (CSR) मधून उभ्या राहिलेल्या पैशातून वर्गीकरण करून निधी उभारण्याचा घाट घातला जात आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून महापालिकेचे अर्थात नागरीकांच्या करांचे पैसे कंत्राटदारावर खैरात करायला जबाबदार सर्व अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केली आहे. (PMC Health Department)
वेलणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच वर्षांपूर्वी पुणे महापालिकेने (PMC Pune) बोपोडी येथील महापालिकेच्या मालकीचे रुग्णालय व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन या संस्थेला PPP तत्वावर ३० वर्षांसाठी चालवण्यासाठी दिले. करारातील अट क्रमांक ३ नुसार कंत्राटदाराने या eye hospital साठी आवश्यक ४३ प्रकारची यंत्रसामुग्री स्वतः विकत घ्यायची असून त्यात दोन OCT machines , तसेच दोन green laser machines घेणे आवश्यक आहे. गेली पाच वर्ष हे हाॅस्पिटल सुरु आहे म्हणजे ही मशिन्स तिथे असली पाहिजेत. करारातील अट क्रमांक १० नुसार हाॅस्पिटल साठी आवश्यक सर्व शस्त्रे , उपकरणे , यंत्रसामुग्रीची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे.  करारातील अट क्रमांक १६ नुसार सदर मिळकतीमध्ये करावयाचा आरोग्य विषयक विकसनाचा संपूर्ण खर्च कंत्राटदाराने करावयाचा आहे, पुणे मनपाकडून कोणतीही आर्थिक मदत उपलब्ध होणार नाही. (Pune Municipal Corporation News)
वेलणकर पुढे म्हणाले, करारातील अटी स्वयंस्पष्ट असूनही महापालिका आरोग्य विभागाने दोन कोटी रुपये खर्च करून स्वतः च्या पैशातून एक OCT मशीन व एक यलो लेसर मशीन विकत घेऊन या रुग्णालयाला देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या समोर ठेवला आहे. यासाठी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध नसल्याने कोविड काळात सी एस आर मधून उभ्या राहिलेल्या पैशातून वर्गीकरण करून निधी उभारण्याचा घाट घातला जात आहे. (PMC Pune News)
विवेक वेलणकर यांनी खालील प्रश्न उपस्थित केले आहेत
१) कंत्राटाप्रमाणे महापालिकेने या रुग्णालयातील यंत्रसामुग्री साठी कोणताच खर्च करणे अपेक्षित नसताना असा प्रस्ताव होतोच कसा ?
२) या प्रस्तावाला मान्यता देताना ऑडिट व दक्षता विभागाने हे कंत्राट वाचायची तसदी घेतली होती का ?
३) सदरहू हाॅस्पिटल मध्ये दोन दोन OCT आणि लेसर मशीन उपलब्ध असताना या आणखी एक एक मशीन ची गरज कधी व कशी निर्माण झाली?
४) तीनच महिन्यांपूर्वी अर्थसंकल्प झाला असताना तेंव्हा ही गोष्ट अर्थसंकल्पात का नमूद केली नाही ?
५) सी एस आर मधून कोविड साठी आलेल्या निधीचा अशा प्रकारे खर्च करण्याचा अधिकार कोणी दिला?
    या सर्व प्रकाराची चौकशी करून महापालिकेचे अर्थात नागरीकांच्या करांचे पैसे कंत्राटदारावर खैरात करायला जबाबदार सर्व अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. असे वेलणकर म्हणाले. (PMC CSR Fund)
—-
News Title | PMC Health Department |  The health department of Pune Municipal Corporation paid billions of rupees to the contractor! |  Misuse of money collected from CSR during Covid