Pune Unlock : PMC : पुणेकरांना महापालिकेचा दिलासा  : निर्बंध केले शिथिल

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

पुणेकरांना महापालिकेचा दिलासा

: निर्बंध केले शिथिल

पुणे : कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्य सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. हे आदेश मिळाल्यानंतर आज (ता. ३) पुणे महापालिकेने याबाबत आदेश काढले. नाट्यगृह, चित्रपटगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, शैक्षणिक संस्था पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आदेश काढले आहेत.

असे आहेत आदेश.


– सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विवाह सोहळे, अंत्यविधी हे जागेच्या किंवा हॉलच्या ५० टक्के क्षमतेने सुरू होतील
– महापालिकेच्या क्षेत्रातील विशेष शाळा, कार्यशाळा, कोचिंग क्लास, वसतिगृहे, अंगणवाडी पूर्ण क्षमतेने सुरू करता येतील
– मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह, रेस्टॉरंट, बार, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, धार्मिकस्थळे, पर्यटनस्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करता येतील
– लसीकरण झालेल्या नागरिकांना प्रवासासाठी बंधन नाही
– लसीकरण अपूर्ण असलेल्या नागरिकांना आंतरराज्य प्रवासासाठी ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्‍यक
– सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये, औद्योगीक व वैज्ञानिक संस्था १०० टक्के क्षमतेने सुरू होतील
– सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होणार
– हे आदेश पुणे कॅन्टोन्मेंट व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांनांही लागू राहतील.

Leave a Reply