Supriya Sule | यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता १२ मे पर्यंत अर्ज करता येतील | खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र
Spread the love

यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता १२ मे पर्यंत अर्ज करता येतील

| खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून येत्या १२ मे २०२३ पर्यंत आता अर्ज सादर करता येतील. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून ज्यांनी अद्यापही अर्ज केले नसतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कृषी, साहित्य, क्रीडा, सामाजिक कार्य, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज करायचे राहून गेले असल्यास पुढील दहा दिवसात अर्ज करता येणे आता शक्य होणार आहे.

पुरस्कारासाठी अर्ज आणि त्यासंबंधी अटी जाणून घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या www.chavancentre.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन खासदार सुळे यांनी केले असून या वेबसाईटवरच गुगल फॉर्ममध्ये ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे त्यांनी म्हटले आहे.