Deepak Mankar | Ajit Pawar | अजित पवारांनी दीपक मानकर यांच्याकडे दिली पुण्याची जबाबदारी | पक्ष बांधणीवर जोर देण्याचा मानकरांचा मानस! 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

Deepak Mankar | Ajit Pawar | अजित पवारांनी दीपक मानकर यांच्याकडे दिली पुण्याची जबाबदारी

| पक्ष बांधणीवर जोर देण्याचा मानकरांचा मानस!

Deepak Mankar | Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार (NCP Ajit Pawar Camp) गटाच्या पुणे शहर अध्यक्षपदी दीपक मानकर (City President Deepak Mankar)!यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील  तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी तसे पत्र मानकर यांना दिले आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दीपक मानकर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. दीपक मानकर यांनी सांगितले कि या माध्यमातून पक्ष बांधणीवर जोर दिला जाणार आहे. तसेच शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Deepak Mankar | Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी पुण्याची जबाबदारी माजी उपमहापौर दीपक मानकर (Former Deputy Mayor of PMC Deepak Mankar) यांच्याकडे दिली आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अजित पवारांच्या जवळचे मानले जायचे. असे असले तरी जगताप हे शरद पवार यांना समर्थन देत आहेत. तर दीपक मानकर हे अजित पवार यांच्या गटासोबत गेले आहेत. (NCP Crisis)

अजित पवार यांनी 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाकडे दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. तसेच बहुमताने अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून नेमल्याचेही त्या पत्रात म्हटले आहे. त्यानंतर अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटाकडून नवीन नेमणुका करण्याचे काम जोरदार सुरु आहे. (NCP Pune Ajit Pawar Camp)

त्यात पुण्यात मानकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेशी (thekarbhari.com) बोलताना नवनियुक्त शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले कि, या माध्यमातून पक्ष बांधणीवर जोर दिला जाणार आहे. शहरातील प्रश्नाकडे बारकाईने लक्ष दिले जाईल. खासकरून नागरी सुविधा युवा वर्गाच्या प्रश्नांना प्राथमिकता दिली जाणार आहे. तळागाळापर्यंत जाऊन शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यानुसार काम सुरु केले जाणार आहे. लवकरच शहराची कार्यकारिणी देखील तयार केली जाईल. अजित पवार हे 8 जुलै ला पुण्यात येणार आहेत. यावेळी बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

—-

News Title | Deepak Mankar Ajit Pawar Ajit Pawar gave the responsibility of Pune to Deepak Mankar Mankar intends to emphasize party building!