Gopichand Padalkar Vs NCP Pune | गोपीचंद पडळकर च्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Gopichand Padalkar Vs NCP Pune | गोपीचंद पडळकर च्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

 

Gopichand Padalkar Vs NCP Pune| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) व पवार कुटुंबीयावर (Pawar Family) आ.गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे (NCP Pune) शहराच्या वतीने बालगंधर्व चौक येथे पडळकर च्या फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आले ,”चोरीचा छंद गोपिचंद “ , “पिसाळलेल कुत्र गोपिचंद “ , “गोप्याच्या बैलाला धो “ अशाप्रकारच्या धोषणा देण्यात आल्या .

सदर प्रसंगी बोलताना शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar) म्हणाले पडळकरने अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे त्याला पुणे शहरांमध्ये आल्यावर त्याचे कपडे उतरून त्याला चोप देवू व त्याला त्याच प्रकारे उत्तरे देण्यात येईल. प्रसिध्दीच्या हव्यासापोटी त्याने हे वक्तव्यकरून वातावरण गढूळ करू नये.
याप्रसंगी बोलताना कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख म्हणाले की महाराष्ट्रच्या विकासाच्या मुद्द्यावरून आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत यात कोणतीच कटुता येवू नये यांचे सर्वांनीच भान ठेवायला हवे याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना देशमुख यांनी विनंती केली की गोपीचंद पडळकर हा पिसाळलेला श्वान आहे व याला आवरणे गरजेचे आहे पुणे शहरांमध्ये येरवडा येथे मनोरुग्ण रुग्णालय आहे आपण जर या ठिकाणी त्याला पाठवला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण खर्च करून याचा आजार बरा करण्याकरता आम्ही निश्चित प्रयत्न करू
याप्रंगी शहराघ्यक्ष दीपक मानकर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख , रूपाली ठोंबरे ,प्रिया गदादे, , सदानंद शेट्टी , आप्पा रेणुसे , समीर चांदेरे ,दत्ता सागरे , , शुभम माताळे , पूजा झोळ , हरेश लडकत, गुरूमित गिल , शांतीलाल मिसाळ , अभिषेक बोके , अजय दराडे व इतर पदाधिकारी मोठेया संख्येने उपस्थित होते

Deepak Mankar | Ajit Pawar | Ajit Pawar gave the responsibility of Pune to Deepak Mankar

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Deepak Mankar | Ajit Pawar | Ajit Pawar gave the responsibility of Pune to Deepak Mankar

| Mankar intends to emphasize party building!

 

Deepak Mankar | Ajit Pawar | Deepak Mankar has been selected as Pune City President of NCP Ajit Pawar Camp. State President MP Sunil Tatkare has given such a letter to Mankar. On this occasion, Deputy Chief Minister Ajitdada Pawar congratulated Deepak Mankar by handing over his appointment letter. Deepak Mankar said that party building will be emphasized through this. Also an attempt will be made to reach the last element. (Deepak Mankar | Ajit Pawar)

After the fall of two groups in NCP, Ajit Pawar has given the responsibility of Pune to the former Deputy Mayor of PMC Deepak Mankar. NCP city president Prashant Jagtap of Sharad Pawar group was considered close to Ajit Pawar. However, Jagtap is supporting Sharad Pawar. Deepak Mankar has gone with Ajit Pawar’s group. (NCP Crisis)

Ajit Pawar has given the letter of signatures of 40 MLAs to the Election Commission and has sued the NCP party. It is also said in that letter that Ajit Pawar has been appointed as the president of NCP by the majority. After that, the work of making new appointments from both the groups of Ajit Pawar and Sharad Pawar is going on vigorously. (NCP Pune Ajit Pawar Camp)

Mankar has been given the responsibility in Pune. Speaking to ‘The Karbhari’ news agency, the newly appointed city president Deepak Mankar said that party building will be emphasized through this. The issue in the city will be closely watched. Priority will be given to the issues of civic amenities especially the youth. It will be our endeavor to go down to the bottom and do justice to the last element. Work will be started accordingly. The city executive will also be formed soon. Ajit Pawar will come to Pune on July 8. The next direction will be decided by holding a meeting at this time.

—-

Deepak Mankar | Ajit Pawar | अजित पवारांनी दीपक मानकर यांच्याकडे दिली पुण्याची जबाबदारी | पक्ष बांधणीवर जोर देण्याचा मानकरांचा मानस! 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Deepak Mankar | Ajit Pawar | अजित पवारांनी दीपक मानकर यांच्याकडे दिली पुण्याची जबाबदारी

| पक्ष बांधणीवर जोर देण्याचा मानकरांचा मानस!

Deepak Mankar | Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार (NCP Ajit Pawar Camp) गटाच्या पुणे शहर अध्यक्षपदी दीपक मानकर (City President Deepak Mankar)!यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील  तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी तसे पत्र मानकर यांना दिले आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दीपक मानकर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. दीपक मानकर यांनी सांगितले कि या माध्यमातून पक्ष बांधणीवर जोर दिला जाणार आहे. तसेच शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Deepak Mankar | Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी पुण्याची जबाबदारी माजी उपमहापौर दीपक मानकर (Former Deputy Mayor of PMC Deepak Mankar) यांच्याकडे दिली आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अजित पवारांच्या जवळचे मानले जायचे. असे असले तरी जगताप हे शरद पवार यांना समर्थन देत आहेत. तर दीपक मानकर हे अजित पवार यांच्या गटासोबत गेले आहेत. (NCP Crisis)

अजित पवार यांनी 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाकडे दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. तसेच बहुमताने अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून नेमल्याचेही त्या पत्रात म्हटले आहे. त्यानंतर अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटाकडून नवीन नेमणुका करण्याचे काम जोरदार सुरु आहे. (NCP Pune Ajit Pawar Camp)

त्यात पुण्यात मानकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेशी (thekarbhari.com) बोलताना नवनियुक्त शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले कि, या माध्यमातून पक्ष बांधणीवर जोर दिला जाणार आहे. शहरातील प्रश्नाकडे बारकाईने लक्ष दिले जाईल. खासकरून नागरी सुविधा युवा वर्गाच्या प्रश्नांना प्राथमिकता दिली जाणार आहे. तळागाळापर्यंत जाऊन शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यानुसार काम सुरु केले जाणार आहे. लवकरच शहराची कार्यकारिणी देखील तयार केली जाईल. अजित पवार हे 8 जुलै ला पुण्यात येणार आहेत. यावेळी बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

—-

News Title | Deepak Mankar Ajit Pawar Ajit Pawar gave the responsibility of Pune to Deepak Mankar Mankar intends to emphasize party building!

Deepak Mankar | तरूणांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देते | दीपक मानकर

Categories
cultural Political पुणे

Deepak Mankar | तरूणांच्या  चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देते – दीपक मानकर

| सनी मानकर आणि गिरीश गुरनानी यांच्या नोकरी महोत्सवामुळे अनेक कुटुंबांना मिळाला आधार

Deepak Mankar |  नोकरी मिळाल्याचा आनंद तरूणांच्या चेहऱ्यावरील पाहिल्यावर खऱ्या अर्थाने वाढदिवस सार्थकी झाला असे वाटते. हा आनंद सनी आणि गिरीश यांनी दिला असून, असा स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनी अनुकरण करावे, असा भावना राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी उपमहापौर दीपक मानकर (former Deputy mayor of pune Deepak Mankar) यांनी व्यक्त केले.

दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेश प्रभारी सनी मानकर आणि कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी आयोजीत नोकरी महोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार ऍड. वंदना चव्हाण, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा ,युवक शहर अध्यक्ष किशोर कांबळे, कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Deepak Mankar Birthday)

केंद्र सरकार रोजगार घालवते तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देते, ही कौतुकास्पद बाब आहे, असे ऍड. वंदना चव्हाण यांनी सांगितले.

सनी आणि गिरीश हे नेहमी समाजाला उपयोगी असे उपक्रम घेत असतात, सध्या रोजगार महोत्सव ही गरज असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.

या महोत्सवात 540 तरूणांनी रजिस्टेशन करून मुलाखती दिल्या. त्यातील 95 तरूणांना तात्काळ नोकरीची संधी मिळाली, तर अन्य तरूणांचे दुसऱ्या फेरीत नोकरी संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सनी मानकर आणि गिरीश गुरनानी यांनी दिली.

Deepak Mankar News | दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त 6 मे ला नोकरी महोत्सवाचे आयोजन | गिरीश गिरनानी व सनी मानकर यांचा पुढाकार

Categories
Breaking News Political social पुणे

दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे गिरीश गुरनानी व सनी मानकर यांच्यावतीने नोकरी महोत्सवाचे 6 मे रोजी आयोजन

पुणे : राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे पुणे शहराचे नेते व माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे गिरीश गुरनानी आणि सनी मानकर यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे गिरीश गुरनानी आणि सनी मानकर यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.

गिरीश गुरनानी, सनी मानकर म्हणाले, दीपक भाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही दिनांक 6 मे 2023 सकाळी 9.00 वा, उत्सव मंगल कार्यालय, कोथरूड, पुणे. येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची हमखास संधी मिळणार आहे.

या नोकरी महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी ऑनलाईन फॉर्म भरून आपली नाव नोंदणी करावी. अथवा तुम्ही रोजगार मेळाव्याच्या दिवशी मेळाव्याच्या ठिकाणीही नोंदणी करू शकता. अशी माहिती गुरनानी, मानकर यांनी दिली आहे.

अर्जाचे_संकेत_स्थळ :
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिलेल्या QR Code चा वापर करावा अथवा दिलेल्या लिंकचा वापर करावा.
https://shorturl.at/mHRW9
अथवा तुम्ही रोजगार मेळाव्याच्या दिवशी मेळाव्याच्या ठिकाणीही नोंदणी करू शकता.अधिक माहितीसाठी संपर्क:-7387281150 (केतन), 9579032641(सचिन) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गुरनानी यांनी केले आहे.