MSWR Ghana | PMC Solid Waste Management | घाना देशालाही पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची भुरळ! 

Categories
Breaking News PMC देश/विदेश पुणे
Spread the love

MSWR Ghana | PMC Solid Waste Management | घाना देशालाही पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची भुरळ!

|पुणे मनपाकडून प्रेरणा घेऊन घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा करणार

MSWR Ghana | PMC Solid Waste Management | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व कचरा वेचकांचे कामकाज पाहणीसाठी Ministry of Sanitation and Water Resources (MSWR), Ghana यांचे पुणे दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अक्वेटी सॅम्पसन, संचालक, पर्यावरण व आरोग्य विभाग, आरोग्य व जलसंसाधन मंत्रालय यांनी “आम्हाला पुणे महानगरपालिका व कचरावेचकांचे काम बघून लक्षणीय अनुभव आला. आमच्या देशात साप्ताहिक संकलन होते. परंतु दररोज दारोदार संकलन नक्कीच प्रभावी आहे. आणि म्हणूनच हे मॉडेल आर्थिक, पर्यावरणीय व सामाजिक अशा सर्व पातळ्यांवर शाश्वत ठरते. गेल्या दोन दिवसांत आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. यातून प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या देशातील घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा करणार आहोत, असे मत व्यक्त केले. (MSWR Ghana | PMC Solid Waste Management)

Ministry of Sanitation and Water Resources (MSWR), Ghana यांचेमार्फत इनफॉर्मल वेस्ट पिकर्स सेवकांना शासकीय यंत्रणेशी जोडून शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा राबविण्याच्या अनुषंगाने The Greater Accra Resilient Integrated Development (GARID) या उपक्रमाच्या मध्यमातून पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन व कचरा वेचकांचे दैनंदिन कामकाज पाहणीसाठी दिनांक ५ जुलै २०२३ ते ८ जुलै २०२३ या कालावधी पुणे दौ-याचे आयोजन करण्यात आले.

घानामधील अधिकाऱ्यांनी धनकवडी व सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयामधील क्षेत्रभेटीमध्ये दारोदार कचरा संकलन, कंपोस्टिंग व बायोगॅस प्रकल्प, रिसायकलिंगसाठी शेड, सहकारी तत्वावर चालणारे स्क्रॅप शॉप या ठिकाणी भेट देऊन कचरावेचकांसोबत संवाद साधला. तसेच पुणे मनपाच्या हस्तांतरण व प्रक्रिया केंद्रांना देखील भेट दिली. पुण्यातील शाश्वत घनकचरा व्यवस्थापन मॉडेलबद्दल तपशीलवार माहिती देत डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा व आशा राऊत, उपायुक्त, विभागप्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी घानामधील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. (PMC Pune News)

६ जुलै रोजी या सर्व अधिका-यांसाठी मनपा मुख्य इमारत याठिकाणी सादरीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. कुणाल खेमनार , अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ)(IAS Dr Kunal Khemnar) ,  आशा राऊत, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन (Deputy Commissioner Asha Raut), डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, स्वच्छ संस्थेचे हर्षद बर्डे व इतर सदस्य तसेच घाना देशातील विविध अधिकारी इ.उपस्थित होते. अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी सर्व मान्यवर अधिका-यांना भेटवस्तू देऊन स्वागत केले व पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विषयक सविस्तर सादरीकरण करण्यात आले. (Pune Municipal Corporation News)

घाना देशातील अधिका-यांनी पुणे शहराचा अभ्यास करून त्यांच्या देशातही असंघटित कचरावेचकांना सोबत घेऊन काम करावे आणि अशीच सक्षम यंत्रणा उभी करावी व कचरा व्यवस्थापनाबद्दल कायदा, नियम व योजना आखताना अनेक पिढ्या कष्ट करत असलेल्या कचरावेचकांना केंद्रस्थानी ठेवून, त्यांना सोबत घेऊन त्या पुढे न्याव्यात अशी आमची इच्छा आहे, असे यावेळी  विद्या नाईकनवरे, स्वच्छ बोर्ड सदस्य यांनी सांगितले.

—-

News Title | MSWR Ghana | PMC Solid Waste Management | Ghana is also fascinated by Pune Municipal Corporation’s solid waste management!