PMC Solid Waste Management Department | घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तपदी संदीप कदम!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Solid Waste Management Department | घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तपदी संदीप कदम!

PMC Solid Waste Management Department  | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) घनकचरा विभागाच्या उपायुक्तपदी  संदीप कदम (Deputy Commissioner Sandeep Kadam) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कदम यांच्याकडे परिमंडळ 4 च्या उपायुक्त पदाचा पदभार होता. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दरम्यान घनकचरा विभागात उपायुक्त पदी असणाऱ्या आशा राऊत (Deputy commissioner Aasha Raut) यांना अजून कुठला पदभार देण्यात आलेला नाही. (PMC Solid Waste Management Department)
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार परिमंडळ 4 चा पदभार आता प्रसाद धर्मराज काटकर यांच्याकडे देण्यात आला आहे. काटकर हे प्रतिनियुक्तीने महापालिकेत आले आहेत. त्यांना 26 जुलै लाच महापालिकेत नियुक्त करून घेण्यात आले आहे. सद्य स्थितीत काटकर हडपसर क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम पाहत होते. आता त्यांना परिमंडळ 4 चे उपायुक्त करण्यात आले आहे. तर या पदावर काम करणाऱ्या संदीप कदम यांना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त करण्यात आले आहे. (PMC Pune)
दरम्यान घनकचरा विभागाच्या उपायुक्त पदी काम करणाऱ्या आशा राऊत यांना महापालिका आयुक्तांनी अजून कुठलाही पदभार दिलेला नाही. त्यांच्याकडे कुठले खाते दिले जाणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. (Pune Municipal Corporation)
—-
News Title | PMC Solid Waste Management Department | Sandeep Kadam as Deputy Commissioner of Solid Waste Management Department!

MSWR Ghana | PMC Solid Waste Management | घाना देशालाही पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची भुरळ! 

Categories
Breaking News PMC देश/विदेश पुणे

MSWR Ghana | PMC Solid Waste Management | घाना देशालाही पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची भुरळ!

|पुणे मनपाकडून प्रेरणा घेऊन घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा करणार

MSWR Ghana | PMC Solid Waste Management | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन व कचरा वेचकांचे कामकाज पाहणीसाठी Ministry of Sanitation and Water Resources (MSWR), Ghana यांचे पुणे दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अक्वेटी सॅम्पसन, संचालक, पर्यावरण व आरोग्य विभाग, आरोग्य व जलसंसाधन मंत्रालय यांनी “आम्हाला पुणे महानगरपालिका व कचरावेचकांचे काम बघून लक्षणीय अनुभव आला. आमच्या देशात साप्ताहिक संकलन होते. परंतु दररोज दारोदार संकलन नक्कीच प्रभावी आहे. आणि म्हणूनच हे मॉडेल आर्थिक, पर्यावरणीय व सामाजिक अशा सर्व पातळ्यांवर शाश्वत ठरते. गेल्या दोन दिवसांत आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. यातून प्रेरणा घेऊन आम्ही आमच्या देशातील घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा करणार आहोत, असे मत व्यक्त केले. (MSWR Ghana | PMC Solid Waste Management)

Ministry of Sanitation and Water Resources (MSWR), Ghana यांचेमार्फत इनफॉर्मल वेस्ट पिकर्स सेवकांना शासकीय यंत्रणेशी जोडून शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा राबविण्याच्या अनुषंगाने The Greater Accra Resilient Integrated Development (GARID) या उपक्रमाच्या मध्यमातून पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन व कचरा वेचकांचे दैनंदिन कामकाज पाहणीसाठी दिनांक ५ जुलै २०२३ ते ८ जुलै २०२३ या कालावधी पुणे दौ-याचे आयोजन करण्यात आले.

घानामधील अधिकाऱ्यांनी धनकवडी व सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयामधील क्षेत्रभेटीमध्ये दारोदार कचरा संकलन, कंपोस्टिंग व बायोगॅस प्रकल्प, रिसायकलिंगसाठी शेड, सहकारी तत्वावर चालणारे स्क्रॅप शॉप या ठिकाणी भेट देऊन कचरावेचकांसोबत संवाद साधला. तसेच पुणे मनपाच्या हस्तांतरण व प्रक्रिया केंद्रांना देखील भेट दिली. पुण्यातील शाश्वत घनकचरा व्यवस्थापन मॉडेलबद्दल तपशीलवार माहिती देत डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा व आशा राऊत, उपायुक्त, विभागप्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी घानामधील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. (PMC Pune News)

६ जुलै रोजी या सर्व अधिका-यांसाठी मनपा मुख्य इमारत याठिकाणी सादरीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. कुणाल खेमनार , अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ)(IAS Dr Kunal Khemnar) ,  आशा राऊत, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन (Deputy Commissioner Asha Raut), डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, स्वच्छ संस्थेचे हर्षद बर्डे व इतर सदस्य तसेच घाना देशातील विविध अधिकारी इ.उपस्थित होते. अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी सर्व मान्यवर अधिका-यांना भेटवस्तू देऊन स्वागत केले व पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विषयक सविस्तर सादरीकरण करण्यात आले. (Pune Municipal Corporation News)

घाना देशातील अधिका-यांनी पुणे शहराचा अभ्यास करून त्यांच्या देशातही असंघटित कचरावेचकांना सोबत घेऊन काम करावे आणि अशीच सक्षम यंत्रणा उभी करावी व कचरा व्यवस्थापनाबद्दल कायदा, नियम व योजना आखताना अनेक पिढ्या कष्ट करत असलेल्या कचरावेचकांना केंद्रस्थानी ठेवून, त्यांना सोबत घेऊन त्या पुढे न्याव्यात अशी आमची इच्छा आहे, असे यावेळी  विद्या नाईकनवरे, स्वच्छ बोर्ड सदस्य यांनी सांगितले.

—-

News Title | MSWR Ghana | PMC Solid Waste Management | Ghana is also fascinated by Pune Municipal Corporation’s solid waste management!

 

PMC Pune RRR Centers |जुनी पुस्तके, कपडे, साहित्य जमा करणाऱ्या नागरिकांचा पुणे महापालिकेकडून सन्मान 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune RRR Centers |जुनी पुस्तके, कपडे, साहित्य जमा करणाऱ्या नागरिकांचा पुणे महापालिकेकडून सन्मान

PMC Pune RRR Centers | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने RRR केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. पुणे शहरातील (Pune City) नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर  वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी “रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल” सेंटर्स (Reduce, Reuse, Recycle centers) म्हणजेच RRR केंद्रे स्थापन करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुर्नवापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्त करणे हा RRR केंद्रे उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यानुसार यामध्ये जुनी पुस्तके, कपडे, साहित्य जमा करणाऱ्या नागरिकांचा पुणे महापालिकेकडून (PMC Pune Solid Waste Management) सन्मान करण्यात आला आहे. अशी माहिती महापलिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune RRR Centers)

 

RRR केंद्रे २० मे  पासून  ०५ जून  पर्यंत रोज स. ७.०० ते दु.१.०० या वेळेत नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. डॉ. हेगडेवार क्रीडांगण, गणपतीमंदिराशेजारी, कल्याणीनगर, जुने औंध क्षेत्रिय कार्यालय ब्रेमन चौक व शरदचंद्र पवार उद्योग भवन या ठिकाणचे RRR सेंटर्स हे कायमस्वरूपी नागरिकांसाठी खुले असणार आहेत. (PMC Pune Marathi news)


घनकचरा विभागाच्या माहितीनुसार  २० मे २०२३ रोजी १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत स्थापित सर्व RRR केंद्रांचे उद्घाटन  महापालिका आयुक्त (PMC commissioner Vikram Kumar) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बर्निंग घाट आरोग्य कोठी येथील केंद्राचे उद्घाटन डॉक्टर कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त इस्टेट (Additional Commissioner Dr Kunal Khemnar) यांचे शुभहस्ते करण्यात आले. औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ब्रेमन चौक येथील केंद्राचे उद्घाटन प्रसंगी आशा राऊत, उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन (Deputy Commissioner Asha Raut), संदीप खलाटे, महापालिका सहाय्यक आयुक्त (PMC Assistant Commissioner Sandip khalate), औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय, डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ संस्थेच्या श्रीमती लक्ष्मी नारायण व  अमोघ भोंगळे व इतर समन्वयक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आपल्याकडील जुनी पुस्तके कपडे व इतर साहित्य जमा केले व साहित्य जमा केलेल्या नागरिकांचे पुणे महानगरपालिकेमार्फत सत्कार देखील करण्यात आले. (Pune Municipal Corporation News)
ह्या व्यतिरिक्त 5 जून पर्यंत शहरातील विविध १७० ठिकाणी तात्पुरते सब सेंटर सुरू असतील, व त्या परिसरात दारोदारी जनजागृती केली जाईल व नागरिकांचे साहित्य स्वीकारले जाईल. सब सेंटर चे ठिकाण व तारीख मनपा संकेत स्थळावर प्रसिद्ध केले आहेत. वयोवृद्ध नागरिक किंवा ज्या नागरिकांना घराबाहेर निघण्यास शक्य नाही, त्यांच्या घरातून साहित्य संकलन करण्यासाठी फिरती RRR केंद्रे सुरू असतील. त्या साठी अपल्या परिसरातील सब सेंटर incharge ला संपर्क करावे. मनपा संकेत स्थळावर उपलब्ध (किंवा ९७६५९९९५०० ला संपर्क करावे ) असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Pune news)

—-
News Title | PMC Pune RRR Centers | Citizens who collect old books, clothes, materials are honored by Pune Municipal Corporation

Pune Waste Management | PMC pune | पुणे महापालिकेने 26 टन प्लास्टिक बॉटल जमा केल्या | महापालिका आता या प्लास्टिकचे काय करणार? जाणून घ्या सर्व काही

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Waste Management | PMC pune | पुणे महापालिकेने 26 टन प्लास्टिक बॉटल जमा केल्या | महापालिका आता या प्लास्टिकचे काय करणार? जाणून घ्या सर्व काही

Pune waste Management | PMC Pune | महापालिकेने (Pune Municipal Corporation) प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यासाठी जाहीर केलेल्या प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धेला पुणेकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 26 टन प्लास्टिक बाटल्या (plastic bottles) जमा झाल्या आहेत. या प्लास्टिक चे महापालिका काय करणार? असा प्रश्न तुम्हांलाही पडला असेल. चला जाणून घेऊया महापालिका या प्लास्टिक चे काय करणार ते! (PMC pune waste management)

शहरातील प्लास्टिक कचऱ्याच्या संकलनास चालना मिळावी व नागरीकांना प्लास्टिक कचरा संकलनाची सवय लागावी, यासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी एक फेब्रुवारी रोजी ‘प्लास्टिक कचरा संकलन स्पर्धे’ची ( Plastic waste collection competition) घोषणा केली होती. कमिन्स इंडिया या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्यांना स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्‍ट्रिक बाइक अशा स्वरूपाची बक्षिसेही अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी जाहीर केले होते. वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. (PMC pune news)
याबाबत महापालिका घनकचरा विभागाच्या प्रमुख आशा राऊत (Deputy commissioner of PMC pune) यांनी सांगितले कि, महापालिकेकडे 26 टन प्लास्टिक जमा झाले आहे. आम्ही यातून म्युरल्स बनवणार होतो. मात्र यासाठी बराच वेळ जाणार होता. त्यामुळे आम्ही दुसरे मार्ग शोधत होतो. त्यानुसार आता यातील 10 टन प्लास्टिक महापालिकेच्या पथ विभागाला दिले जाणार आहे. रस्ता तयार करताना पथ विभाग प्लास्टिक चा वापर करून plastic  granules डांबरात मिक्स करून ते रस्ता बनवण्यासाठी वापरले जाणार आहे. तसे पत्र देखील आम्ही पथ विभागाला दिले आहे. उपायुक्त आशा राऊत यांनी पुढे सांगितले कि, उर्वरित 16 टन प्लास्टिक हे टी शर्ट बनवण्यासाठी वापरले जाणार आहे. याबाबत आम्ही Feel Good Eco Nurture संस्था सोबत चर्चा केली होती. त्यानुसार ते पालिकेला 1600 टी शर्ट तयार करून देणार आहेत. प्रत्येक टी शर्ट साठी 250/- चा खर्च येईल. हे टी शर्ट आम्ही महापालिकेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात वापरणार आहोत. लवकरच हे टी शर्ट महापालिकेला मिळतील. (PMC solid waste management department)
प्लास्टिक ला प्रतिबंध बसावा, या हेतूने महापालिकेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी प्लास्टिक चा वापर टाळणे आवश्यक आहे. जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल.
आशा राऊत, उपायुक्त, घनकचरा विभाग, पुणे मनपा.

—-
Pune Waste Management | PMC Pune | Pune Municipal Corporation (PMC) collected 26 tons of plastic bottles What will the municipality do with this plastic now? Know everything