Congress Bhavan : P. Chidambaram : केंद्रिय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

काँग्रेसच्या थोर नेत्यांनी दिलेले योगदान आजच्या युवा पिढीला पोहचवा

– मा. खा. पी. चिदंबरम

 

     राज्यसभेचे खासदार व माजी केंद्रिय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज काँग्रेस भवन येथे भेट देवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांना पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देवून सत्कार केला.

आपल्या प्रास्ताविक भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, माजी अर्थमंत्री, राज्यसभेचे खासदार पी. चिदंबरम यांनी आज ऐतिहासिक काँग्रेस भवनला भेट दिली आहे. पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना देशाच्या अर्थव्‍यवस्थेची चांगली प्रगती झाली. जी. एस. टी. ची संकल्पना त्यांची होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले.

      आपले मनोगत व्‍यक्त करताना पी. चिदंबरम म्हणाले की, ‘‘मी स्वत:ला भाग्यशाली समजतो की मी या ऐतिहासिक काँग्रेस भवनला भेट दिली. आज काँग्रेस पक्षाची सत्ता काही मोजक्या राज्यांमध्येच आहे. महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेत आहोत. नुकतेच पक्ष संघटनेच्या निवडणुकीसाठी डिजिटल सभासद नोंदणीची प्रक्रिया पार पडली आहे. लवकरच बुथ, ब्लॉक व शहर कार्यकारिणीचे निवडणुका होतील. त्यानंतर प्रदेश कार्यकारिणी आणि नंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची निवडणूक होईल. लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाने पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि तसा ठराव करण्यात आला. पं. जवाहरलाल नेहरू अगदी लहान वयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले. आज ६०% मतदार युवक आहेत. पक्षातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना बळकट करण्याचे काम हाती घ्यावे. आज काँग्रेस पक्षाला हाडाच्या कार्यकर्त्याची गरज आहे. कार्यकर्त्यांमुळे आपण निवडणुक जिंकतो आणि सत्तेत येतो. आजच्या पिढीला महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती नाही. केंद्रातील सरकार इतिहासातून या थोर नेत्यांनी केलेले कार्य संपविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने आजच्या युवा पिढीला काँग्रेसच्या थोर नेत्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली पाहिजे.’’

      यावेळी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अनंत गाडगीळ, ॲड. अभय छाजेड, रमेश अय्यर, चंद्रशेखर कपोते, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, पुजा आनंद, शानी नौशाद, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे, नुरूद्दीन सोमजी, रजनी त्रिभुवन, शिलार रतनगिरी, सुजित यादव, सचिन आडेकर, ॲड. अनिल कांकरिया, ॲड. निलेश बोराटे, ॲड. शाहिद अख्तर, ॲड. जाधव, ॲड. राहुल ढाले, गौरव बोराडे, सुमित डांगी, राहुल तायडे, मीरा शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply