Pune Property Tax Auction | व्यावसायिक मिळकतीच्या लिलावातून महापालिकेला 18 लाख 74 हजारांचे उत्पन्न! 

Categories
PMC social पुणे
Spread the love

Pune Property Tax Auction | व्यावसायिक मिळकतीच्या लिलावातून महापालिकेला 18 लाख 74 हजारांचे उत्पन्न!

Pune Property Tax Auction | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) बुधवारी ५३ व्यावसायिक मिळकतींचा लिलाव ठेवण्यात आला होता.  एका व्यावसायिक मिळकतीची लिलावात (Commercial Property auction) विक्री झाली असून, त्यापोटी महापालिकेस 18 लाख 74 हजार रुपये मिळणार आहेत. संबंधित खरेदीदाराने 20% रक्कम भरली आहे. बाकी रक्कम आगामी 15 दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (Pune Municipal Corporation Property Tax Department)
पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून (PMC Property tax Department) कर वसुलीवर जोर देण्यात आला आहे. विविध कारणामुळे पुणेकर टॅक्स भरण्याबाबत उदासीन आहेत. त्यामुळे वसुली करण्यासाठी उपाय करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून व्यावसायिक मिळकती (Commercial Properties) सील केल्या जात आहेत. त्यापैकी एकूण 200 मिळकतीचा लिलाव केला जाणार आहे. (PMC Property Tax)
महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 1900 कोटी हुन अधिक उत्पन्न मिळाले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात मात्र विभागाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण समाविष्ट गावांतील नागरिक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच व्यावसायिक मिळकत धारक देखील टॅक्स भरत नाहीत. विभाग प्रमुखानी खात्याला जास्तीत जास्त वसूली करण्याबाबत आदेश दिले आहेत. (Pune Property tax).

पहिल्या लिलावात 32 मिळकती महापालिकेने विक्रीसाठी काढल्या होत्या. यात एकही मिळकत विक्री झाली नाही.  तर 22 मिळकतधारकांनी महापालिकेचे पैसे भरले. त्यानंतर पालिकेने बुधवारी 53 मिळकतींचा लिलाव ठेवला होता. याची थकबाकी 14 कोटी होती. यात चार लोकांनी पैसे भरले. त्याची महापालिकेला 19 लाखांची रक्कम मिळाली. बाकी 49 पैकी 1 मिळकत विकली गेली. त्याचे महापालिकेला 18 लाख 74 हजार मिळणार आहेत. शिल्लक राहिलेल्या मिळकतीचा पुन्हा लिलाव केला जाणार आहे. असे देशमुख यांनी सांगितले.