PMC Pune Scholarship | १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय मार्गी लावण्याची मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

PMC Pune Scholarship | १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय मार्गी लावण्याची मागणी

| माजी नगरसेवकांनी  अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे केली मागणी

PMC Pune Scholarship | १०वी व १२वी च्या परिक्षेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून (Pune municipal corporation) शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र अजूनही काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. याबाबत शिष्यवृत्तीचा विषय मार्गी लावण्याची मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार (Additional commissioner Dr Kunal Khemnar)  यांच्याकडे केली आहे.  PMC Pune Scholarship news

माजी नगरसेवकांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार  अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांची भेट घेऊन पुणे महानगरपालिकेच्या सामाजिक विकास विभागाकडून १०वी व १२वी च्या परिक्षेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देत असलेली शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्ष संपले तरीही काही विद्यार्थ्यांना अजून मिळालेली नाही याकडे त्यांचे लक्ष वेधून निवेदन दिले. समाज विकास विभागाच्या गलथान कारभारामुळे आणि विद्यार्थ्यांच्या विषयी असलेल्या अनास्थेमुळे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली किती जणांना दिली नाही दिली नसेल तर का दिली नाही याबाबत खात्यामध्ये पूर्णपणे गोंधळ आहे खाते प्रमुख आपली जबाबदारी बँकांच्या तांत्रिक बाबींवर ढकलत आहेत. अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी सोमवारी याबाबत बैठक लावून शिष्यवृत्तीचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन आम्हाला दिले. असे माजी नगरसेवकांनी म्हटले आहे. (PMC Pune News)