PMPML : Hemant Rasane : Standing Commitee : पीएमपी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा मार्ग मोकळा 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

पीएमपी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा मार्ग मोकळा

: दर माह दिले जाणार 6 कोटी

पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणे सुरु झाले आहे. मात्र पीएमपी च्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. याबाबत वारंवार मागणी देखील केली गेली. याची दखल घेत स्थायी समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा केला आहे. वाढीव वेतनासाठी संचलन तुटीमधून 6 कोटी रुपये दरमहा अग्रीम स्वरूपात देण्यात येणार आहेत. शिवाय पुढील पाच वर्ष बजेट मध्ये प्रति वर्ष 52 कोटींची तरतूद देखील जाणार आहे. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

: स्थायी समितीने ही उपसूचना मान्य केली

पी.एम.पी.एम.एल.ची सद्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, सातवा वेतन आयोग धर्तीवर सुधारीत वेतन अदा करणेकामी र.रू.६.०० कोटी प्रतिमहा पुढील वर्षी देण्यात येणा-या संचलन तूटीमधून अग्रिम स्वरूपात देणेस त्याचप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणीची थकबाकी देणेकामी पुणे मनपा हिश्याची रक्कम अंदाजे र.रु.२६१.७६ कोटी होत आहेत. सदरची थकबाकी ७ हफ्त्यात देणेकामी पुढील ५ वर्षाच्या
अंदाजपत्रकात र.रू.७२.३६ कोटी प्रतिवर्ष इतकी तरतूद करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
 पुणे महानगर परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस, पी.एम.पी.एल कामगार युनियन च्या वतीने पुणे महानगरपालिकेस घेराव घालण्यात आला होता. पुणे महानगरपालिका कर्मचारी यांच्या प्रमाणे पीएमपीएल कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा ही ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होती. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीमधील सदस्यांनी ठराव दिला होता, त्यानुसार स्थायी समितीने कामगारांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी ६  कोटी रुपये दिले.
: दिपाली प्रदीप धुमाळ  विरोधीपक्ष नेत्या, पुणे मनपा.

Leave a Reply