PMC Additional Commissioner | मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या पेक्षा माझी सेवाज्येष्ठता वरिष्ठ! | श्रीनिवास कंदूल यांनी अतिरिक्त आयुक्त पद देण्याची प्रधान सचिवांकडे केली मागणी

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

PMC Additional Commissioner | मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या पेक्षा माझी सेवाज्येष्ठता वरिष्ठ!  | श्रीनिवास कंदूल यांनी अतिरिक्त आयुक्त पद देण्याची प्रधान सचिवांकडे केली मागणी

PMC Pune Additional Commissioner  | पुणे | पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) पद यावरून  महापालिकेत (Pune Municipal Corporation) जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. उपायुक्त रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी या पदावर दावा केल्यानंतर आता या पदावरून नवीनच कलाटणी मिळाली आहे. विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल (Chief Engineer Shrinivas Kandul) यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना (Chief Secretary) पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी दावा केला आहे कि मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांच्या पेक्षा माझी सेवाज्येष्ठता वरिष्ठ आहे. त्यामुळे हे पद मलाच देण्यात यावे. अशी मागणी कंदूल यांनी केली आहे. दरम्यान या पदावरून महापालिका अधिकाऱ्यांमध्येच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. (PMC Pune)
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (Pune Municipal Corporation Additional Commissioner) पदावर  महापालिकेचा अधिकारी पदोन्नतीच्या माध्यमातून येणार आहे. यासाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी महापालिका सामान्य प्रशासन विभागाने (PMC Général Administration Department) राज्य सरकारकडे पाठवली आहे. यामध्ये नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला आणि विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांचा समावेश आहे. मात्र या यादीवर उपायुक्त रमेश शेलार (Ramesh Shelar) यांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर आता कंदूल यांनी आपल्यालाच पद मिळावे अशी मागणी केली आहे. (Pune Municipal Corporation)

कंदूल यांनी प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रानुसार  शासन निर्णयानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त पदासाठी पुणे महानगरपालिकेच्या सेवेतील शासन निर्णयात नमूद केलेली आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकाऱ्यांची सूची तयार करताना सेवा जेष्ठता दाखविण्यात आलेली आहे. त्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची सेवा जेष्ठता माझ्या पेक्षा वरिष्ठ असल्याचे दाखविण्यात आले ते चुकीचे आहे.  यांचे ग्रेड पे S-23 असून जे पद कार्यकारी अभियंता यांचा सम कक्षात आहे. कारण कार्यकारी अभियंता यांचे ग्रेड पे S-23 आहे. म्हणून मुख्य अभियंता यांचे अनुभव विचारात घेताना कार्यकारी अभियंता या पदाचे अनुभव विचारात घ्यावा. कारण मुख्य लेखापाल व कार्यकारी अभियंता (S-23) ही पदे उप आयुक्त (S-23) या पदाशी समकक्ष आहेत.

कंदूल यांनी पत्रात पुढे म्हटले आहे कि, श्री व्ही. जी. कुलकर्णी मुख्य अभियंता यांची सेवा निवृती ऑक्टोबर २०२३ मध्ये आहे. तसेच श्री श्रीनिवास बोनाला मुख्य अभियंता यांची निवृती माहे जुलै २०२४ मध्ये असून ते अतिरिक्त महापालिका आयुक्त या पदावर इच्छुक नाही. त्यामुळे मी सर्वात जेष्ठ असल्याने माझ्या नावाचा विचार करण्यास विनंती आहे. मी सन १९८९ ते १९९९ या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र शासन पाटबंधारे खाते येथे सहाय्यक अभियंता श्रेणी २ या पदावर १० वर्षे कार्यरत होतो. पूर्वी नगर उप अभियंता हे पद विद्युत विभागाकडे खाते प्रमुख म्हणून होते. मी कार्यकारी अभियंता (नगर उप अभियंता) या पदावर दिनांक २९/१०/१९९९ पासून २५/०७/२०११ अखेर सलग १० वर्षे ९ महिने कार्यरत होतो. तदनंतर मी पदोन्नतीने अधिक्षक अभियंता या पदावर दिनांक २६/०७/२०११ पासून ०३/०४/२०१८ अखेर सलग ६ वर्ष ९ महिने कार्यरत होतो. तदनंतर दि. ०४/०४/२०१८ पासून पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागामध्ये मुख्य अभियंता (विद्युत) हे नव निर्मित पद निर्माण झालेनंतर आज अखेर म्हणजे सलग ५ वर्षे ६ महिने मुख्य अभियंता (विद्युत) या पदावर कार्यरत आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता (S-23) हे पद उप आयुक्त (S-23) या पदाशी समकक्ष विचारात घेता तसेच पुणे मनपा मध्ये विद्युत विभागाचे खाते प्रमुख (नगर उप अभियंता (विद्युत)) या श्रेणी १ चे पदावर दिनांक २९/१०/१९९९ रोजी माझी सरळ सेवेने नियुक्ती झाल्याने माझा २४ वर्षे इतका प्रदीर्घ अनुभव विचाराधीन आहे.

तरी वरील सर्व बाबींचा विचार करून गुणवत्ता, शैक्षणिक पात्रता (B.E. & MBA) व क्षमता इ. बाबींचा विचार करून मुख्य अभियंता पदावर झालेला अन्याय दूर करून यापुढे अतिरिक्त महापालिका आयुक्त या पदावर पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील मुख्य अभियंता पदावरील (S-27) अधिकाऱ्यांची सेवाजेष्ठता तयार करताना दि. २९/१०/१९९९ रोजी पासून कार्यकारी अभियंता (S-२३) पदावरील अनुभवाचा विचार करून सेवा जेष्ठता यादी तयार करावी. अशी मागणी कंदूल यांनी केली आहे.

——