PMC E-Waste Collection | पुणे महानगरपालिकेमार्फत माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC E-Waste Collection | पुणे महानगरपालिके कडून  माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन

PMC E- Waste Collection- (The Karbhari News Service) – महाराष्ट्र शासनाच्या सन २०२४ च्या माझी वसुंधरा अभियान (Majhi Vasundhara Abhiyan) अंतर्गत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation (PMC) २२ एप्रिल  ते २८ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये स्वच्छता अभियान सिंगल युज प्लास्टिक बंदी अंमलबजावणी बाबत जनजागृती व कारवाई, ई-कचरा संकलन मोहीम अशा विविध स्वच्छता विषयक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने दिनांक २७ रोजी १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत ई-कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले.प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांतर्गत ५ आरोग्य कोठ्या निश्चित करून त्याठिकाणी ई-कचरा संकलन केंद्र उभारण्यात येऊन स.१०.०० ते ०१.०० या वेळेत ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. (PMC Solid Waste Management Department)

यामध्ये पुणे महापालिकेच्या सोबत, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था आणि आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्ह या सामाजिक संस्था अभियानामध्ये सहभागी झाल्या होत्या.

या अभियानाचा उद्देश म्हणजे ई-कचरा व प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येविषयी जनजागरण करणे आणि जास्तीत जास्त रिसायकलिंग होण्याच्या दृष्टीने संकलनाची नियोजित व्यवस्था लावणे हा आहे. अभियानानंतर भविष्यात शहरामध्ये  कायमस्वरूपी संकलन केंद्र चालवले जातील असा प्रयत्न केलाजाणार आहे. याद्वारे ई-कचरा व प्लास्टिकच्या समस्येवर तोडगा निघून कचरा शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लागू शकेल.

२७ एप्रिल रोजी १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत घेण्यात आलेल्या ई-कचरा संकलन मोहिमेद्वारे एकूण ३५१.३५ किलो ई-कचरा संकलित करण्यात आला व सदरील ई-कचरा पुणे महानगरपालिकेमार्फत ऑथराईज्ड रीसायक्लर्सकडे सुपूर्त करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.