PMC Pune Employees | कर्मचारी मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी पुणे महापालिका धोरण तयार करणार 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

PMC Pune Employees | कर्मचारी मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी पुणे महापालिका धोरण तयार करणार

| कर्मचारी एकजुटीने देणार लढा

PMC Pune Employees | पुणे | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना त्रयस्थ व्यक्तीकडून मारहाण आणि अरेरावी करण्याच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे. अशा घटना रोखण्यासाठी आता महापालिका एक धोरण (Policy) बनवणार आहे. विधी विभागाच्या (PMC Law Department) साहाय्याने याबाबत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि संघटनांना महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी तसे आश्वासन दिले आहे. (PMC Pune Employees)
पुणे महापालिकेतील अतिक्रमण विभागातील (PMC Encroachment Department) अधिकाऱ्यांना नुकतीच मारहाण करण्यात आली. याबाबत निषेध नोंदवण्यासाठी महापालिकेच्या सर्व कर्मचारी संघटना महापालिका भवनातील हिरवळीवर एकत्र आल्या होत्या. याआधी देखील कर्मचाऱ्यांना मारहाण अरेरावी करण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर आळा घालण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी नगर अभियंता प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare), विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल (Shrinivas Kandul), उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap), उप अभियंता सुनील कदम (Sunil Kadam), पीएमसी एम्प्लोइज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर तसेच सर्व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
भविष्यकाळात कुठल्याही कर्मचाऱ्याबाबत अशी घटना घडली तर सर्वांनी एकी दाखवणे आवश्यक आहे. त्या कर्मचाऱ्याला एकटे वाटते कामा नये. संबंधित विभाग तसेच विधी विभागातील वकिलांचे सहकार्य द्यायला हवे, असा सूर या चर्चेतून निघाला. त्यानंतर कर्मचारी आणि संघटनांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची भेट घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी आश्वासन दिले कि याबाबत एक धोरण तयार केले जाईल. त्यासाठी विधी विभागाचे सहकार्य घेतले जाणार आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण हा मुद्दा महापालिकेशी सम्बंधित असतो. त्यामुळे याबाबत गंभीरपणे पाऊल उचलायला हवे आहे.
—-
News Title | PMC Pune Employees | Pune Municipal Corporation will prepare a policy to prevent incidents of beating employees