PMPML Retired Employees | पीएमपी मधील सेवानिवृत्त सेवक उद्यापासून करणार आंदोलन | जाणून घ्या कारण

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMPML Retired Employees | पीएमपी मधील सेवानिवृत्त सेवक उद्यापासून करणार आंदोलन | जाणून घ्या कारण

7th Pay Commission Latest News | पी.एम.पी.एम.एल. मधील सेवानिवृत्त सेवकांना (PMPML Retired Employees) ७ व्या वेतन आयोगाचा फरक (7th Pay Commission Difference) त्वरित मिळावा, म्हणून  स्वारगेट येथील मुख्य प्रशासकीय बिल्डिंग दरवाजासमोर सेवानिवृत्त सेवक उद्यापासून आमरण उपोषण करणार आहेत. अशी माहिती ज्येष्ठ सेवानिवृत्त सेवक हरु महाले, अशोक बालवे, राजेंद्र ओतारी यांनी दिली. (PMPML Pune)
सेवानिवृत्त सेवकांनी दिलेल्या निवेदनानानुसार पी.एम.पी.एम.एल.मधील सेवानिवृत्त सेवकांना ७व्या वेतन आयोगाचा फरक तात्काळ मिळावा म्हणून प्रशासनास योग्य ते पत्रव्यवहार करून आंदोलन सुध्दा करण्यात आले होते. परंतु प्रशासनास जाग येत नसल्याने 8 फेब्रुवारी रोजी पुन्हा मागणी पत्र देण्यात आलेले आहे. मात्र पी.एम.पी.एम.एल. प्रशासन यावर कोणतेही ठोस निर्णय घेत नाही. प्रशासन फक्त आम्ही दोन्ही महापालिकेकडे अंदाजपत्रकात मागणी कळवली आहे, तेवढेच सांगत आहेत.
देशामध्ये लोकसभेची निवडणूक असल्याने आदर्श आचारसंहिता लागणार आहे. सेवानिवृत्त सेवकांची उपासमार व वाढता जनक्षोभ विचारात घेवून उद्यापासून  स्वारगेट येथील मुख्य प्रशासकीय बिल्डिंग दरवाजासमोर स्थगित केलेले  आमरण व चक्री उपोषण करणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. निवडणूकीची पार्श्वभूमी विचारात घेता सदर रक्कम आपत्कालीन निधीतून वर्गीकरणाद्वारे दोन्ही म.न.पा. कडून रक्कम उपलब्ध करून घेण्यात यावी. सर्व सेवानिवृत्त सेवकांना त्वरित चेक अदा करण्यात यावेत अशी मागणी ज्येष्ठ सेवानिवृत्त सेवक हरु महाले, अशोक बालवे , राजेंद्र ओतारी, यांनी मागणी केली असून ते उपोषणास बसणार असल्याने सर्व कामगार बंधूंनी हजर राहून पाठींबा द्यावा अशी विनंती केली आहे.