Water Reservation | पुणे शहरासाठी 7 टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्याची महापालिकेची मागणी | पाटबंधारे विभागाला महापालिकेने पाठवले पत्र

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

पुणे शहरासाठी 7 टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्याची महापालिकेची मागणी

| पाटबंधारे विभागाला महापालिकेने पाठवले पत्र

पुणे | ‘अलनिनो’ वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आगामी कालावधीत राज्यामध्ये टंचाईची परिस्थिती उद्भवू नये यासाठी सरकारने प्रत्येक महापालिकेला पाण्याचा आपत्कालीन आराखडा बनवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने देखील हा आराखडा बनवला आहे. दरम्यान महापालिकेने 15 ऑगस्ट पर्यंतच्या पाण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार महापालिकेला 7 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. एवढे पाणी खडकवासला प्रकल्पातून आरक्षित ठेवण्याची मागणी महापालिका प्रशासनकडून पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफीक महासागरातील “अलनिनो” या समुद्र प्रवाहाच्या सक्रीयतेमुळे देशातील मान्सुन पर्जन्यावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जुन,२०२३ नंतर देखील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक राहील. तसेच चालु उन्हाळयात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याच्या संभावना आहेत. तीव्र उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ह्रास विचारात घेता, अचानकरित्या पाणीसाठा खालवू शकतो. या परिस्थितीत आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थितीपेक्षा गंभीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मंत्री मंडळ सचिव
भारत सरकार व मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी आपत्कालीन पाणी आराखडा बनवण्याचे निर्देश दिले आहेत.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला ज्या धरणात होत आहे, त्या धरणाचे पाणी त्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसासठी आरक्षित करण्याबाबत संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने त्या विभागातील जलसंपदा विभागास कळवावे. असे सरकारने आदेशात म्हटले आहे.
त्यानुसार महापालिकेने पाटबंधारे विभागाला पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे कि, सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेमार्फत पुणे शहरासाठी सरासरी १४७० एम.एल.डी. प्रतिदिन याप्रमाणे पाणवठा केला जात आहे. त्यानुसार 15 ऑगस्ट २०२३ अखेर पुणे शहरासाठी एकुण सुमारे ७.टी.एम.सी. आहे. तरी खडकवासला प्रकल्पामधून पुणे शहरासाठी ७.टी.एम.सी. पाणी आरक्षित करावे. यावर आता कालवा समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. अशी माहिती पाणी पुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
—–