Tag: water reservation
पुणे शहरासाठी 7 टीएमसी पाणी आरक्षित ठेवण्याची महापालिकेची मागणी
| पाटबंधारे विभागाला महापालिकेने पाठवले पत्र
पुणे | ‘अलनिनो’ वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आगामी कालावधीत राज्यामध्ये टंचाईची परिस्थिती उद्भवू नये यासाठी सरकारने प्रत्येक महापालिकेला पाण्याचा आपत्कालीन आराखडा बनवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने देखील हा आराखडा बनवला आहे. दरम्यान महापालिकेने 15 ऑगस्ट पर्यंतच्या पाण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार महापालिकेला 7 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. एवढे पाणी खडकवासला प्रकल्पातून आरक्षित ठेवण्याची मागणी महापालिका प्रशासनकडून पाटबंधारे विभागाकडे करण्यात आली आहे.
भारत सरकार व मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी आपत्कालीन पाणी आराखडा बनवण्याचे निर्देश दिले आहेत.
पाणी कोटा १६.५२ TMC करण्याची महापालिकेची पाटबंधारे कडे मागणी
| औद्योगिक पाणी वापराचे बिल महापालिका देणार नाही
पुणे महापालिका प्रशासनाने (PMC Pune) जलसंपदा विभागाला (Dept of water resources) पाण्याचे अंदाजपत्रक (Water Budget) सादर करत २०.३४ TMC पाण्याची मागणी केली होती. त्यावर जलसंपदा विभागाने महापालिकेला फक्त १२.४१ TMC पाण्याचा कोटा (reservation) मंजूर केला होता. यामुळे महापालिकेची चांगलीच अडचण झाली होती. दरम्यान महापालिकेने औद्योगिक पाणी वापर (Industrial water use) होत नाही असा मुद्दा उपस्थित केला आहे. शिवाय त्याचे बिल देखील न देण्याचा इरादा जाहीर केला आहे. त्यामुळे आता पाणी कोटा १२.४१ TMC ऐवजी १६.५२ TMC करण्याची मागणी पुणे महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे केली आहे. शिवाय इथून पुढे औद्योगिक पाणी वापराचे बिल न पाठवता फक्त अशुद्ध पाण्याचे बिल पाठवावे, असे देखील महापालिकेने म्हटले आहे. (Pune municipal corporation)
पुणे महापालिका हद्दीत 34 गावांचा झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरता शहराला आता 20.34 टीएमसी पाण्याची आवश्यकता भासेल म्हणून पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट सादर करत मागणी केली होती. सद्यस्थितीत शहराला जलसंपदा विभागाकडून 14.61 टीएमसी पाणी आरक्षित केले गेले आहे. जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. त्यानुसार जलसंपदाविभागाने महापालिकेला पत्र पाठवत 2022-23 वर्षासाठी फक्त 12.41 TMC पाणी मंजूर केले होते. महापालिकेला वर्षाला 20 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. जास्तीचे पाणी हवे असेल तर त्यासाठी तीन पट दर द्यावा लागेल, असे ही जलसंपदा विभागाने म्हटले आहे. मात्र जलसंपदा विभागाच्या या भूमिकेने आता पुणे महापालिकेची चांगलीच अडचण वाढली होती. त्यावर महापालिकेने पाणी वापराचा व्यवस्थित अभ्यास करून नवीन मागणी केली आहे. (Department of water resources)
काय आहे महापालिकेची मागणी?
पुणे महानगरपालिकेस खडकवासला इरिगेशन डिव्हिजन, पुणे मार्फत प्राप्त झालेल्या बिलांमध्ये १२.४१ TMC पाणी कोटा ग्राह्य धरून बिल आकरण्यात आले आहे. महापलिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पाटबंधारे विभागाकडून पुणे महानगरपालिकेचा पाणी कोटा १२.४१ TMC ऐवजी १६.५२ TMC करणेबाबत पाटबंधारे विभागास अवगत केले आहे. MWRRA व CPHEEO मॅन्युअल नुसार लोकसंख्येच्या प्रमाणात पुणे मनपासाठी मान्य करावयाचा सन २०२२-२३ चा कोटामध्ये पाटबंधारे विभागाने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार १६.५२ TMC पाणीकोटा मान्य करून बिलाची आकारणी करणेत यावी. (Pune municipal corporation)
पुणे महानगरपालिकेचा वाणिज्य व ओद्योगिक पाणी वापराबाबत तपासणी केली असता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १९६ अनु.क्र. २ नुसार केवळ घरगुती वापराकरीताच पाणी उपलब्द करून दिले जात असून धंद्याच्या किंवा विक्रीच्या प्रयोजनासाठी शहरातील कोणत्याही रहिवाश्यास पुणे महानगरपालिकेमार्फत पाणी पुरविले जात नाही. पुणे मनपाने यापूर्वीही पाणी वापराची विगतवारी सादर केली असून सन २०२२-२३ साठी पाणी वापराची त्यानुसार पुणे महानगरपालिकेस अशुद्ध पाण्याचे बिल आकरण्यात यावे. (PMC Pune)
महापालिकेने मागितलेला दुरुस्त पाणी कोटा असा आहे
घरगुती वापर १०.६९ TMC
समाविष्ट गावे ०.९९ TMC
फ्लोटिंग लोकसंख्या ०.१२ TMC
Tanker द्वारे पाणी ०.०३ TMC
शैक्षणिक, व्यावसायिक व १.३९ TMC
औद्योगिक (घरगुती)
वहन घट २०% ३.३१ TMC
एकूण १६.५२ TMC
पाणी आरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करा
| पाटबंधारे विभागाचे महापालिकेला आदेश
विविध प्रकल्पांमधून मंजूर असल्याने म.ज.नि.प्रा.चे मापदंडाप्रमाणे पाणीवापर आहे किंवा नाही व त्यानुसार आकारणी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने सर्व मंजूर पाणीआरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करावा. तसेच दरानुसार विविध प्रकल्पातून केलेला पाणीवापर एकत्रित करून जास्तीच्या पाणीवापरावर अनुज्ञेय दराने पाणीपट्टी पुणे महानगरपालिकेस भरणा करणे अनिवार्य राहील. असे आदेश पाटबंधारे विभागाने महापालिकेस दिले आहेत.
पाटबंधारे पुणे मंडळांतर्गत बिगरसिंचन पाणीवापर ग्राहकांच्याबाबत काही ग्राहकांनी जसे कि पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कोका कोला कंपनी, पिरंगुट इ. ग्राहकांनी त्यांच्या पाणीमागणीच्या अनुषंगाने विविध प्रकल्पांतून पाणी आरक्षित केले आहे. पुणे म.न.पा.स देखील जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पातून पाणी आरक्षणास मंजूरी आहे. यामध्ये खडकवासला, पवना, भामा आसखेड चा समावेश आहे.
अनामत रक्कम भरून संबंधित विभागाकडे करारनामे संबंधित संस्थेस करावे लागतात. म.ज.नि.प्रा. आदेश दि. २९.०३.२०२२ मधील निर्देशानुसार बिगरसिंचन ग्राहकांच्या पाणीवापरानुसार आकारणी दर केले आहेत.