Prashant Jagtap : पुण्याच्या राजकारणातील शुभ्र नेता म्हणजे प्रशांत जगताप  : शांतीलाल सुरतवाला यांचा लेख वाचा

Categories
Political पुणे
Spread the love

पुण्याच्या राजकारणातील शुभ्र नेता म्हणजे प्रशांत जगताप

: शांतीलाल सुरतवाला

पुण्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. पक्ष नवीन होता, नवीन माणसं शोधायची होती काम करणाऱ्या तरुणांना जवळ करायचं होतं. नवीन सभासद नोंदणीचे काम सुरू केल्यावर लक्षात आलं सर्वात जास्त सभासद नोंदणी प्रशांत जगताप यांनी केली. जवळ-जवळ 1800 सभासद प्रशांत जगताप यांनी नोंदवले होते. ज्यांनी सभासद नोंदणी मध्ये काम केला आहे त्यालाच 1800 सभासद नोंदणी करणे किती जिकिरीचे आहे ते कळते.

ज्या वयात लोक वॉर्डात काम करतात त्या वयात ना. अजित दादांशी बोलून प्रशांत जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्याच्या चिटणीस पदी निवड केली. माझ्या कार्यकाळात कार्यरत तरुण पुढे महानगरपालिकेतील दिसला. नगरसेवक म्हणून पुण्याच्या नजरेत भरला आणि बोलता बोलता साहेब आणि मा. अजित दादा यांचे मन जिंकून महापौर झालेला पहिला मिळाला. राजकारणात पाठीवर थाप टाकणारे कमी असतात व शिंतोडे उडवणारे अधिक असतात. प्रशांत जगताप यांनी त्यांच्या विरोधकांना सुद्धा शिंतोडे उडवण्याची संधी दिली नाही. आज राजकारणात शुभ्र नेत्यांची आवश्यकता आहे. हीच वेळ आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी साथ देण्याची.

मोठ्या लोकांचे फोन यायला लागली की छोट्या लोकांचे फोन स्वीकारत नाही. प्रशांत जगताप यांना अपवाद आहे. माझा फोन घेतला नाही असे सांगणारा एकही तळागाळातला कार्यकर्ता सापडणार नाही. व्यसन नसल्यामुळे ताकदीने दिवसातून 16 ते 18 तास काम करणारा नेता आहे हे माझे निरीक्षण.

शांतीलाल सुरतवाला
माजी महापौर, पुणे

Leave a Reply