Private Bus Travels | खासगी बस, ट्रॅव्हल्स चालकांकडून सणाच्या कालावधीत होणारी बेकायदेशीर भाडेवाढ लूट थांबवा 

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

Private Bus Travels | खासगी बस, ट्रॅव्हल्स चालकांकडून सणाच्या कालावधीत होणारी बेकायदेशीर भाडेवाढ लूट थांबवा

| काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे मागणी

| कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

 

Private Bus Travels | पुणे : खासगी बस वाहतूक, ट्रॕव्हल्सकडून सणाच्या काळात अवास्तव प्रवास भाडे आकारून होणारी आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी (Mohan Joshi) यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी करण्यात आली.

प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर (RTO Sanjay Bhor) यांना बेकायदा भाडे आकारणी विरोधात कारवाई करावी,अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, संजय बालगुडे ,प्रशांत सुरसे शाबीर खान ,चेतन अग्रवाल,प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, प्रविण करपे, सुरेश कांबळे, ॲड अनिल अहिर, सुरेश राठोड, प्रकाश जगताप,राजु घाटोळे,ॲड निलेश गौड,स्वाती शिंदे, अंजली सोलापुरे, मोना गायकर,आदी उपस्थित होते.

यामागणीबाबत बोलताना मोहन जोशी म्हणाले, “दिवाळी सणासाठी पुण्यातून बाहेरगावी खाजगी बस आणि ट्रॅव्हल्स कंपन्यामार्फत जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात विद्यार्थी आणि नोकरदार अधिक आहेत. सणाच्या तोंडावर केलेली ही भरमसाठ भाडेवाढीने दिवाळीचा प्रवासाचा आनंद निघून जातो.तसेच खाजगी वाहनांना खाजगी बसेस आणि ट्रॅव्हल्सला भाडे निश्चिती मोटार ॲक्ट नुसार करण्यात आली असून ती एसटी भाड्यापेक्षा 50 टक्के अधिक आहे म्हणजेच जे एसटीचे भाडे 200 असेल तर तिकीट हे तीनशे रुपये खाजगी बस चालकांना घेता येते त्यामुळे वेळीच प्रशासनाने यात लक्ष घालावे आणि अकारण भाडेवाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी.”

प्रशासनाने संबंधितांवर योग्य वेळेत कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यान मार्फत स्ट्रिंग ऑपरेशन केले जाईल असा इशाराही दिला.

तसेच क्षमतेपेक्षा होणारी जादा वाहतूक अनधिकृत बस थांबे यासह प्रवाशांची सुरक्षा याविषयी चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी करण्याचे आश्वासन दिले.तसेच चार पथकांद्वारे तपासणी केलीजाईल ,असे सांगितले.भाडेवाढ करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनी तसेच बसेस वर तात्काळ कारवाई करण्यात येईल,असे आश्वासन दिले.
शिवाय प्रवासी मार्गदर्शक हेल्प लाईन चालू करण्याचे मान्य केले.
————————-

काँग्रेसच्या मागण्या

– ज्यादा भाडे आकारणी करणाऱ्या बस चालकांची नोंदणी रद्द करा.
– नियमानुसार भाडे आकारणी दरपत्रकाची जागृती करणारे फलक लावा.
– तक्रार आल्यास शहानिशा करून प्रवाशाला २४ तासात न्याय द्या.
– पथक तयार करून भाडे आकारणीतील अनियमितता तपासा.
– अवास्तव भाडे आकारणाऱ्या बस, ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवा