Pune Girl Attack | महिला आयोगाचे पोलिसांना सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

Pune Girl Attack | महिला आयोगाचे पोलिसांना सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश

Pune Girl Attack | पुण्यात आज सकाळी एम पी एस सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनी वर तिच्याच मित्राने प्राणघातक हल्ला (Attack on Girl) केल्याची घटना घडली. राज्य महिला आयोगाकडून (State Commission for women) पोलिसांना (Pune Police) याबाबत सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली. (Pune Girl Attack)

चाकणकर यांनी सांगितले कि, सुदैवाने विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झालेली नाही. स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे तिचा जीव वाचला आणि आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून आज संध्याकाळी तिला डिस्चार्ज मिळेल. राज्य महिला आयोगाकडून पोलिसांना याबाबत सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त स्वतः या प्रकरणाच्या तपासावर लक्ष देऊन आहेत. विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू. काही दिवसांपूर्वीच दर्शना पवार या तरुणीचा अशाच प्रकरणात जीव गेला. एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर असलेला तणाव, कुटुंबापासून दूर असल्याने जाणवणारा एकाकीपणा, विद्यार्थ्याचे आपापसातील संबंध या सगळ्याच विषयांबद्दल समुपदेशन होणं गरजेचं आहे. मुलीने लग्नाला किंवा प्रेमाला नकार दिल्याने हिंसेच्या वाटेने मुलांनी जाणं हे धोकादायक आहे. या सगळ्या बाबतीत त्यांचं कौन्सिलिंग करणं काळाची गरज आहे. यासाठी शासनाने, संबंधित यंत्रणेने जागरूक होत पावलं उचलणं गरजेचं आहे. असे चाकणकर यांनी म्हटले आहे. (Pune News)
——
News Title | Pune Girl Attack |  Commission for Women directed to submit update report to police