Women Safety | Pune Police WhatsApp Number | पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिस आयुक्त झाले सक्रिय | सूचना करण्यासाठी नागरिकांना दिला whatsapp नंबर

Categories
Breaking News social पुणे

Women Safety | Pune Police WhatsApp Number | पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिस आयुक्त झाले सक्रिय | सूचना करण्यासाठी नागरिकांना दिला whatsapp नंबर

Women Safety | Pune Police WhatsApp Number | पुणे शहरात सदाशिव पेठेत एका मुलीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या घडलेल्या घटनेनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar) यांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी 8975953100 हा व्हॉटस्‌ अप नंबर (Pune Police WhatsApp Number) जाहीर केला असून त्यावर महिलांच्या सुरक्षेसंदर्भात (Women Safety) सूचना आणि अभिप्राय देण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबत इतर घटनांचा आढावा घेऊन सूचनांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच तातडीच्या सेवेसाठी 112 नंबरवर संपर्क करावा, असे सांगितले आहे. (Women Safety | Pune Police WhatsApp Number)

 यानंबरवर व्हॉटस्‌ऍपवर पुणेकर नागरिक महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सूचना देऊ शकतात. यावर प्राप्त तक्रार व मेसेज संबंधित पोलीस स्टेशन, दामिनी पथक आणि गुन्हे शाखेचे पथक यांच्याकडे देण्यात येतील. या मेसेजच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईवर पोलीस आयुक्त कार्यालयातून देखरेख ठेवली जाईल. नागरिकांशी मैत्रीपूर्व अभिप्राय उपक्रम राबवावा, अशा हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आपण त्यांच्या गरजा आणि समस्या जोपर्यंत जाणून घेऊन शकत नाहीत. तोपर्यंत त्यावर उपाय शोधू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांचा सहभाग घेण्यात आला आहे. (Pune Police)

शहरात युपीएससी परीक्षा पास झालेल्या एका तरुणीचा तीच्या मित्राने राजगडला नेऊन खून केला होता. या घटनेनंतर संगणक अभियंता असलेल्या महिलेवर रिक्षा चालकाने आडबाजूला नेऊन अतिप्रसंग करण्याची घटना घडली. तर नुकतीच एका तरुणीच्या मागे तिचा माजी प्रियकर कोयता घेऊन मागे लागलेली घटना घडली. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी तिचे प्राण वाचवल्यावर ही घटना देशभर चर्चीली गेली होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

——

News Title | Women Safety | Pune Police WhatsApp Number | Police Commissioner became active regarding safety of women in Pune city WhatsApp number given to citizens for notification

Pune Girl Attack | कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या युवकांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाखांची बक्षिसे

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Pune Girl Attack | कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या युवकांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाखांची बक्षिसे

| पीडित तरुणीलाही मुख्यमंत्र्याच्या वतीने पाच लाखाची मदत

Pune Girl Attack |  पुणे शहराच्या मध्यवस्तीत झालेल्या कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेजपाल जवळगे (Lejpal Javalage), हर्षद पाटील (Harshad Patil) व दिनेश मडावी (Dinesh Madavi) या जिगरबाज तरुणांना  मुख्यमंत्र्यांनी (CM Maharashtra) प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. सारसबाग जवळील शिवसेना भवनात (Shivsena Bhavan Pune) पक्षाच्या प्रवक्त्या डॉ.ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) व शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (City President Pramod Bhangire) यांच्या हस्ते ही रक्कम या जिगरबाज तरुणांना  सुपूर्द करण्यात आली. (Pune Girl Attack)
यावेळी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी या तरुणांशी संवाद ही साधला. तरुणांनी दाखवलेलं धैर्य अतुलनीय असून या आर्थिक मदतीतून त्यांना पुढील शैक्षणिक परिक्षा देण्यासाठी निश्चितच पाठबळ मिळेल असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी या तरुणांना दिला.  पिडीत तरुणीलाही तिच्या पुढील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची भरीव आर्थिक मदत करण्यात आली. पिडीत तरुणीला ही मदत तिच्या घरी जावून देण्यात आली. (Shivsena Pune)
तसेच तरुणीला मदत करण्यासाठी तिच्या सोबत आलेल्या मित्रालाही पंचवीस हजाराची मदत व होणाऱ्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च  शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे. यानंतर शिवसेनेच्या  वतीने शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेत शहरातील  महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना राबवित महिला सुरक्षा धोरण ठरविण्याची मागणी  करण्यात आली. पुणे शहर शिवसेनेच्या वतीने  महिलांच्या सुरक्षेसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येत असून शिवसेना मध्यवर्ती  कार्यालयात महिला मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पुण्यात नोकरीच्या निमित्ताने  व अभ्यास करण्यासाठी आलेल्या तरुणींना सुरक्षित वाटावे यासाठी पोलीस आयुक्तांनी तातडीने उपाययोजना राबवाव्या असेही पक्षाच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या.
यावेळी  सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, युवासेना राज्य सचिव किरण साळी, महिला आघाडी अध्यक्ष लीना ताई पानसरे, पूजा रावेतकर, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे,शहर संघटक प्रमोद प्रभुणे,श्रीकांत पुजारी,शहर समन्वयक शंकर संगम, नवनाथ निवंगुणे, धनंजय जाधव, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर,राजाभाऊ भिलारे, विकी माने, श्रद्धा शिंदे, सुदर्शना त्रिगुणाईत,श्रुती नाझीरकर, सुरेखा कदम, कांचन दोडे व अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——
News Title | Pune Girl Attack |  15 lakhs rewards on behalf of the Chief Minister to the youth who saved the life of the girl in the Koyta attack

NCP Pune Agitation | राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Agitation | राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

| गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची केली मागणी

NCP Pune Agitation | राज्यात होणाऱ्या अत्याचाराच्या व गंभीर गुन्ह्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून राज्यातील महिला, तरुणी व विद्यार्थी हे असुरक्षित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसाढवळ्या खून, दरोडे व प्राणघातक हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात एकाच आठवड्यात एमपीएससी (MPSC) करणाऱ्या दोन मुलींसोबत (Pune Girl Attack) असे प्रकार घडले. यात दर्शना पवार नावाच्या मुलीला आपला जीव गमावावा लागला, तर काल झालेल्या दुसऱ्या हल्ल्यातील ती तरुणी थोडक्यात बचावली. राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळण्यास असमर्थ ठरणाऱ्या गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनांची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुडलक चौक येथील आंदोलनात करण्यात आली. (NCP Pune Agitation)
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ” शहराला राज्याची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर म्हणून नावलौकिक आहे. परंतु गेल्या काही दिवसात विद्यार्थिनींवर होणारे हल्ले आणि कोयता गॅंगचा उच्छाद यासाठी पुणे शहर कूप्रसिद्ध होत आहे, याला सर्वस्वी जबाबदार स्वतःला आधुनिक पुण्याचे शिल्पकार म्हणून घेणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. आदरणीय अजितदादा या शहराचे पालकमंत्री असताना दर आठवड्याला प्रशासकीय बैठका घेऊन कायदा सुव्यस्थतेचा आढावा घेत असत, फडणवीस सरकार आल्यापासून अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या बैठका पालकमंत्र्यांनी घेतल्या आहेत. दररोज पुणे शहरात ठिक- ठिकाणी खून,लुटमार, प्राणघातक हल्ले, दहशत माजविणाऱ्या टोळ्या अशा विविध बातम्या पाहायला मिळतात. परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधील गृहमंत्री अथवा पालकमंत्री या घटनांकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मुळात या सरकारचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, याबाबत आम्हाला शंका आहे. ज्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, महिला बालकल्याण मंत्री देखील पुरुषच आहे अशा लोकांकडून महिलांच्या सुरक्षेची अपेक्षा ठेवणे गैर आहे. गृहमंत्र्यांनी तातडीने झालेल्या घटनांची जबाबदारी स्वीकारत आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे आवाहन आम्ही या निमित्ताने करत आहोत, अन्यथा या पुढील काळात पुन्हा अशा घटना घडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.
या आंदोलन प्रसंगी  प्रशांत जगताप, सुषमा सातपुते, किशोर कांबले, महेश हांडे, गणेश नलावडे, करीम शैख, शिवानी मालवदकर, दीपक कामठे, सानिया झुंझारराव, संदीप बालवडकर आदि कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
——
News Title | NCP Pune Agitation |  As the question of law and order in the state came to the fore, the Nationalist Congress Party protested in Pune

Pune Girl Attack | महिला आयोगाचे पोलिसांना सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश

Categories
Breaking News Political social पुणे

Pune Girl Attack | महिला आयोगाचे पोलिसांना सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश

Pune Girl Attack | पुण्यात आज सकाळी एम पी एस सी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनी वर तिच्याच मित्राने प्राणघातक हल्ला (Attack on Girl) केल्याची घटना घडली. राज्य महिला आयोगाकडून (State Commission for women) पोलिसांना (Pune Police) याबाबत सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली. (Pune Girl Attack)

चाकणकर यांनी सांगितले कि, सुदैवाने विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झालेली नाही. स्थानिकांनी केलेल्या मदतीमुळे तिचा जीव वाचला आणि आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून आज संध्याकाळी तिला डिस्चार्ज मिळेल. राज्य महिला आयोगाकडून पोलिसांना याबाबत सद्यस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त स्वतः या प्रकरणाच्या तपासावर लक्ष देऊन आहेत. विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू. काही दिवसांपूर्वीच दर्शना पवार या तरुणीचा अशाच प्रकरणात जीव गेला. एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर असलेला तणाव, कुटुंबापासून दूर असल्याने जाणवणारा एकाकीपणा, विद्यार्थ्याचे आपापसातील संबंध या सगळ्याच विषयांबद्दल समुपदेशन होणं गरजेचं आहे. मुलीने लग्नाला किंवा प्रेमाला नकार दिल्याने हिंसेच्या वाटेने मुलांनी जाणं हे धोकादायक आहे. या सगळ्या बाबतीत त्यांचं कौन्सिलिंग करणं काळाची गरज आहे. यासाठी शासनाने, संबंधित यंत्रणेने जागरूक होत पावलं उचलणं गरजेचं आहे. असे चाकणकर यांनी म्हटले आहे. (Pune News)
——
News Title | Pune Girl Attack |  Commission for Women directed to submit update report to police