Pune Metro Service | गणेशोत्सवात पुणे मेट्रोची दिवाळी | साडे नऊ लाखाहून अधिक लोकांचा प्रवास | दीड कोटी पर्यंत मिळाले उत्पन्न

Categories
Breaking News social पुणे
Spread the love

Pune Metro Service | गणेशोत्सवात पुणे मेट्रोची दिवाळी | साडे नऊ लाखाहून अधिक लोकांचा प्रवास | दीड कोटी पर्यंत मिळाले उत्पन्न

| गणेशोत्सवात पुणे व पिंपरी चिंचवडकरांची मेट्रोला पसंती

Pune Metro Service | गणेशोत्सवाच्या (Pune Ganeshotsav) काळात मेट्रोतून प्रवासाला पुणे व पिंपरी चिंचवडकरांची पसंती दिली आहे. दिनांक १८ते २८ सप्टेंबर या काळात पिंपरी चिंचवड स्थानक (Pune Metro Stations) ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर ४,०५,२८० प्रवास झाला आणि यातून ६३,२३,७१८/- रुपये इतके उत्पन्न मिळाले. तर वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर ५,५६,०८२ प्रवास झाला आणि यातून ७७,४७,३३६/- रुपये इतके उत्पन्न मिळाले. २८ सप्टेंबर रोजी पुणे मेट्रोमधून जास्त प्रवास होणारी स्थानके अनुक्रमे पीएमसी, डेक्कन जिमखाना, पीसीएमसी, वनाझ आणि गरवारे कॉलेज ही आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोने प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रोच्या वेळेमध्ये वाढ केली होती. अशी माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली. (Pune Metro Service)
ऑगस्ट २०२३ या महिन्यात एकूण प्रवास २१,१६,७७२ इतका होता आणि यातून ३,२५,८८,९००/- इतके उत्पन्न मिळाले. तर सप्टेंबर २०२३ या महिन्यात (२८ तारखेपर्यंत) १९,१३,२२७ इतका प्रवास होऊन यातून २,८१,८९, ७६०/- इतके उत्पन्न मिळाले.
ऑगस्ट महिन्यातील सर्वात जास्त प्रवास (१,६९,५१२) आणि उत्पन्न (३०,६३,३५०/-) हे दिनांक १५ ऑगस्ट २३ या दिवशी होते. सप्टेंबर महिन्यातील सर्वात जास्त प्रवास (१,६३,२२७) आणि उत्पन्न (२५,४८,३८४/-) हे काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिनांक २८ सप्टेंबर २३ या दिवशी होते. (Pune Metro News)
दिनांक १ ऑगस्ट २३ रोजी पुणे मेट्रोच्या मार्गांचे विस्तारीकरण झाल्यापासून दिनांक २८ सप्टेंबर २३ पर्यंत पिंपरी चिंचवड स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावर  १६,८९,८५८ प्रवास झाला आणि यातून २,६७,४४,३०४/- रुपये इतके उत्पन्न मिळाले. वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गावर २२,७४,१९७ प्रवास झाला आणि यातून ३,२२,४२,६६५/- रुपये इतके उत्पन्न मिळाले.
पुणे मेट्रोचे पुढील मार्ग सुरू झाल्यापासून पालकमंत्री मा. चंद्रकांत दादा यांनी मेट्रोमधून दोन वेळा प्रवास केला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पालकमंत्री महोदय यांनी वनाज ते पीएमसी असा प्रवास केला. यावेळी त्यांच्या बरोबर महा मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर आणि महा मेट्रो चे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे होते. पालकमंत्री महोदय यांनी मेट्रो प्रवासादरम्यान मेट्रो मधील स्वछतेचे कौतुक केले.