Pune Property tax Bill | पुणेकरांना मिळकतकराची 12 लाख बिले वाटपाची प्रक्रिया सुरु! | मिळकतकर विभागाचे नियोजन तयार

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Pune Property tax Bill  | पुणेकरांना मिळकतकराची 12 लाख बिले वाटपाची प्रक्रिया सुरु!

| मिळकतकर विभागाचे नियोजन तयार

PMC Property tax Bill – (The Karbhari News Service) – नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरु झाले आहे. त्यानुसार महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाने (PMC Property tax Department) मिळकतकराची बिले देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. महापालिकेची जुनी हद्द आणि समाविष्ट 11 गावांत मिळून एकूण 12 लाख बिले देण्यात येणार आहेत. आगामी काही दिवसांत ही बिले नागरिकांना मिळतील. (Pune Municipal Corporation (PMC)
प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडून सांगण्यात आले कि सुरुवातीला महापालिकेकडून एसएमएस आणि ई मेल च्या माध्यमातून नागरिकांना बिले दिली जातात. त्यानुसार आगामी दोन दिवसांत नागरिकाना ही बिले मिळतील. तसेच बिले प्रिंटिंग ला देखील पाठवण्यात आली आहेत. त्यानुसार प्रिंटेड बिले देखील लवकरच पाठवली जातील. जवळपास 12 लाख बिले आहेत. दरम्यान समाविष्ट 23 गावांची बिले या बिलांनंतर दिली जाणार आहेत.
सरत्या आर्थिक वर्षात प्रॉपर्टी टॅक्स विभागाने 2273 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. याने विकासकाम करताना मदत होणार आहे. दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात टॅक्स भरल्यानंतर नागरिकांना बिलात 5-10% सूट दिली जाते. याचा फायदा घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.