Sevice Month | Pune Municipal Corporation |  १५ सप्टेंबरपर्यंतच्या नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्याचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Sevice Month | Pune Municipal Corporation |  १५ सप्टेंबरपर्यंतच्या नागरिकांच्या प्रलंबित  अर्जांचा निपटारा करण्याचे आदेश

| महापालिका  सेवा महिना राबविणार

 

Service Month | Pune Municipal Corporation | राज्य शासनाने यावर्षी १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत सेवा महिना (Service Month) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत महापालिकेच्या (PMC Pune Website) संकेत स्थळावर तसेच कार्यालयांकडे प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचा आणि तक्रारींचा विशेष मोहिम राबवून निपटारा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरीत करण्याचे आदेशही अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade ) यांनी दिले आहेत.

 

राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत यासाठी २०१५ मध्ये आपले सरकार सेवा पोर्टल सुरू केले आहे. त्या माध्यमातून जनेतेची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतू या पोर्टलचा आढावा घेतल्यानंतर तसेच मंत्रालय स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणार्‍या तक्रारींचे अवलोकन केल्यानंत सक्षम प्राधिकार्‍यांकडून विहित काल मर्यादीत संबधित अर्जांचा निपटारा होत नसल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने मागीलवर्षी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला होता. याला नंतर ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देउन अनेक प्रलंबित अर्ज व तक्रारींचा निपटारा केला होता. यंदाही १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान सेवा महिना आयोजीत करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने याच पार्श्‍वभूमीवर १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या विविध विभागाकडील प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी सेवा महिन्यांचे आयोजन केले आहे. (Pune PMC – Service Month)

प्रामुख्याने आपले सरकार वेब पोर्टलवरील महापालिकेशी संबधित अर्ज, डी.बी.टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्रांवरील सर्व सेवा, सर्व विभागांकडील अर्ज, मालमत्ता कराची आकारणी व मागणी पत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळजोडणी देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, जन्म मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, लसीकरण, महिला बचत गटांना परवानगी देणे व रोजगाव उपलब्ध करून देणे यासंदर्भातील अर्जांचा प्रामुख्याने निपटारा करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation)

यासाठी मुख्य विभागाने क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांकडून माहिती संकलित करणे, मोहिमेची माहिती भरण्याकरिता व अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र नोडल अधिकार्‍याची नेमणूक करण्याचे आदेश बिनवडे यांनी दिले आहेत. या मोहिमेच्या अंबलबजावणीसाठी
सर्व विभाग प्रमुखांची २६ सप्टेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. सेवा महिना संपल्यानंतर सर्व विभागप्रमुखांनी १५ सप्टेंबरपर्यंत प्रलंबित असलेल्या अर्जांची तसेच निपटारा केलेल्या अर्जांचा अहवाल तसेच
अर्ज प्रलंबित राहीले असल्यास सकारण अहवाल सादर करावा, असे बिनवडे यांनी आदेशात नमूद केले आहे. (PMC Pune News)


News title | Service Month | Pune Municipal Corporation | Order to dispose of applications of citizens up to 15th September