Ayodhya tour | Raj Thackeray | अयोध्या दौऱ्याबाबत उद्या राज ठाकरे काय बोलणार? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

अयोध्या दौऱ्याबाबत उद्या राज ठाकरे काय बोलणार?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी (ता.२२) पुण्यात जाहीर सभा होत आहे. पुण्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. मनसेकडून (mns) या सभेचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

  या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर राज ठाकरे उद्या पुण्यात काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे. मनसे या सभेचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

गणेश कला क्रीडा मंच सभागृहात सकाळी दहा वाजता राज ठाकरेंची सभा होणार आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पुण्यातील सभेसाठी पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे.

राज ठाकरे यांनी आज संत साहित्याचे अभ्यासक, इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. मराठीतील संत साहित्याची परंपरा तसंच महाराष्ट्राचा इतिहास यांबाबत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. पक्षाचे नेते अनिल शिदोरे हेसुद्धा याप्रसंगी उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला, याचं कारणही राज ठाकरे रविवारी होणाऱ्या पुण्यातील सभेत सांगणार आहेत. राज ठाकरेंचा (Raj Thackeray) दौरा स्थगित केल्यावरून राजकारण तापले आहे. सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

राज ठाकरेंच्या या निर्णयाबाबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी ठाकरेंना डिवचलं आहे. “आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती..” असं म्हणत राऊतांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

राऊत म्हणाले, “अयोध्या दौरा रद्द करण्यामागे काय अडचणी आहेत ते माहित नाही. पण, भाजपने असे का करावे? भाजप प्रत्येकवेळी महाराष्ट्रातील नेत्यांना वापरून घेत आहे. त्यातलाच हा प्रकार दिसतोय. यातून काही लोकांना शहाणपण आले तर बरं होईल. आपण वापरले जातोय हे काही लोकांना उशिरा कळतं. कारण यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं होतंय,” 

“राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यासाठी मदत लागली असती तर आम्ही नक्कीच त्यांना मदत केली असती,” असेही संजय राऊत म्हणाले.