HSC Results | बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार

बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. आता, उद्या म्हणजे बुधवार दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार असल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता चांगलीच उत्सुकता लागली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन हा निकाल पाहता येईल.

बारावीचे निकाल जाहीर करताना यंदा दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी ३०:३०:४० असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण (३०%), अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (३०%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (४० %) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे.

कोरोना महामारीमुळे यंदा विद्यार्थ्यांनी घरातून शिक्षण घेतले. ऑनलाईन क्लासच्या उपस्थितीत गतवर्षी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला होता. मात्र, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्यात आल्या. त्यामुळे, यंदाच्या निकालाची विद्यार्थ्यांना अधिकची उत्सुकता आहे.

Varsha Gaikwad : Sports Marks : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

मुंबई :- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री  वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण बाधित होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्यात येत आहेत. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना सन 2021-22 या वर्षाकरिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. तसेच इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सन 2021-22 करिता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचे मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. ही सवलत केवळ सन 2021-22 च्या परीक्षेकरिताच देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.