Prevent accidents : रहदारीच्या चौकातील अपघात रोखणार महापालिका  : पायलट प्रोजेक्ट वर काम सुरु 

Categories
PMC social पुणे

रहदारीच्या चौकातील अपघात रोखणार महापालिका

: पायलट प्रोजेक्ट वर काम सुरु

: सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक – पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र लेन

 

पुणे : महापालिका हद्दीत अशी काही ठिकाणे आणि चौक आहेत, जिथे वारंवार अपघात घडत राहतात. यामुळे नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. मात्र आगामी काळात अशा घटना घडू नयेत म्हणून महापालिका प्रशासनाने गंभीरपणे पावले उचलली आहेत. उंड्री चौकात वाहतूककोंडी पादचारी आणि वाहनचालकांसाठी प्रायोगिक तत्त्वार सुरक्षित प्रवास उपक्रम हाती घेतला आहे, त्यामध्ये वाहनचालक-पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग तयार केला आहे. दरम्यान गेल्या 15 दिवसापासून यावरील अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. त्यामुळे शहरात आणखी 5 ठिकाणी पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहेत. अशी माहिती महापालिका पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.

सेव्हलाईफ फाउंडेशन व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उंड्री चौकामध्ये प्रायोगिक तत्त्वार सुरू केलेल्या प्रायोगिक प्रकल्पाची पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी नुकतीच पाहणी केली. याप्रसंगी मनापा अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, संस्थेचे प्रमुख पियुष तिवारी, मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे,  उपस्थित होते.

दांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका हद्दीतील अपघात रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यानुसार पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येत आहेत. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. त्यामुळे शहरात आणखी दोन ठिकाणी म्हणजे खराडी बायपास आणि वैदूवाडी परिसरात हे पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहेत.  पुढी आठवड्यापासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून पावसाळ्यापूर्वी चर्चा करून आराखडे निश्चित केले जातील.  कामाची अंमलबजावणी पावसाळ्यावर अवलंबून असेल आणि त्याला विलंब होऊ शकतो. हे झाल्यानंतर महापालिका पक्के काम करणार आहे. त्यासाठी NHAI शी देखील आम्ही चर्चा करणार आहोत.