Nitesh Rane’s tongue slipped : नितेश राणेंची जिभ घसरली  : एमआयएम च्या प्रस्तावावरून अश्लील विधान

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

नितेश राणेंची जिभ घसरली 

: एमआयएम च्या प्रस्तावावरून अश्लील विधान

उस्मानाबाद : एमआएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी आम्हाला सोबत घ्या, असा प्रस्ताव महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) दिला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून एकमेकांवर टीका केली जात आहे. यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची जीभ घसरली असून त्यांनी तुळजापूर मंदिराच्या आवारातच अश्लील विधान केलं आहे.

एमआयएमकडून महाविकास आघाडीला आघाडीचा प्रस्ताव (AIMIM Offer To Mahavikas Aghadi) आला असून त्यावर आपली प्रतिक्रिया काय? असा प्रश्न नितेश राणेंना विचारण्यात आला. ”एमआयएमने महाविकास आघाडीतील तीन पक्षांना लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी लग्न आणि हनीमून करावा की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांच्या घरातील हा विषय आहे”, असं नितेश राणे यावेळी म्हणाले. त्यानंतर त्यांनी अतिशय अश्लील विधान केलं.

Sharad Pawar : AIMIM : एमआयएम सोबत जाण्याबाबत शरद पवारांनी केले महत्वाचे वक्तव्य 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

एमआयएम सोबत जाण्याबाबत शरद पवारांनी केले महत्वाचे वक्तव्य

पुणे : कुणी कुठल्या पक्षासोबत जायचं हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु ज्यांच्यासोबत जायचंय त्या पक्षाने तरी होकार दिला पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून अशा प्रकारचा राजकीय निर्णय राज्याला घेण्याचा अधिकार देत नाही. राज्याला या निर्णयाबाबत राष्ट्रीय समितीने स्पष्ट करेपर्यंत कोणत्याही राज्यात अशा प्रकारची भुमिका ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रात गेली दोन दिवस जो एमआयएमबाबत ज्या बातम्या येतायत. तो पक्ष निर्णय नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘एमआयएम’सोबत जाण्याची शक्यता नसल्याचे सांगितले.

एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी ‘एमआयएम’ला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याचे आवाहन आघाडीच्या नेत्यांना केले आहे .या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चेला पवार यांनी राष्ट्रवादीच्या वतीने पूर्ण विराम दिला आहे. माळेगाव येथील निवासस्थानी रविवारी (दि २०)सायंकाळी पत्रकारांशी पवार बोलत होते.

Uddhav Thackeray’s first reaction : एमआयएम  च्या प्रस्तावानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

एमआयएम  च्या प्रस्तावानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली असल्याने सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे. जलील यांच्या प्रस्ताव महाविकास आघाडीने अमान्य केला असला तरी मात्र ते आग्रही आहेत. जलील यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार आहेत. मात्र या भेटीआधीच उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी हा एमआयएमचा कट असल्याचं सांगत तो उधळून लावण्याचं आवाहन केलं.

उद्धव ठाकरेंनी बैठकीदरम्यान सांगितलं की, “शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा”. तसंच यावेळी त्यांनी मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाने केलेल्या युतीची आठवण करुन देत म्हटलं की, “मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत”.

आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे असंही स्पष्ट सांगितलं. यावेळी त्यांनी जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार राहा असं आवाहन केलं.

संजय राऊतांची प्रतिक्रिया

या बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “भाजपाने एमआयएमला शिवसेनेची बदनामी करण्याची सुपारी दिली आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसंच काही झालं तरी एमआयएमसोबत युती होणार नाही हे स्पष्ट केलं. शिवसेना कधीही हिंदुत्व सोडणार नाही असं संजय राऊतांनी यावेळी खडसावून सांगितलं. हा भाजपाच्या व्यापक कटाचा भाग असल्याचंही ते म्हणाले.

२२ ते २५ मार्च शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान

राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसंच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेनं “शिवसंपर्क अभियान” सुरू केलं आहे. या अभियानाचा पहिला टप्पा २२ ते २५ मार्च दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकुण १९ जिल्ह्यात सुरू होणार आहे. या १९ जिल्ह्यात शिवसेनेचे १९ खासदार शिवसंपर्क अभियान सुरू करणार आहेत. पहिल्या टप्यातील १९ जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकार्यांची १२ जणांची टीम कार्यरत असणार आहे.

शिवसंपर्क अभियानाच्या मार्फत शिवसेना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत राज्यात शिवसेना करत असलेल्या विकास कामांची माहिती पोहचवणार आहे.

AIMIM : PMC Election : AIMIM संपूर्ण पुणे शहरातून लढविणार निवडणूक!

Categories
Breaking News PMC Political पुणे

AIMIM संपूर्ण पुणे शहरातून लढविणार निवडणूक!

शहर कोअर कमेटी ची माहिती

 

पुणे : प्रभागरचना जाहीर होताच AIMIM पक्षाने आपली भूमिका ठामपणे मांडली असून ए. एम. आय. ए. एम. पक्ष ताकतीने संपूर्ण प्रभागातून निवडणूक लढणार आहे. अशी माहिती शहर कोअर कमिटीच्या वतीने देण्यात आली.

AIMIM पक्षाने २०१७ साली देखील पुणे महानगरपालिकेची निवडणुक लढवली होती व पहिल्याच निवडणुकीत पक्षाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते. आणि या पक्षाचे नगरसेवक ही निवडून आले आहेत यांचा एक नगरसेवक पुण्यातून निवडून आल्यामुळे आता २०२२ ची येणाऱ्या पुणे महानगरपालिकेची निवडणूक देखील (AIMIM पक्ष पूर्ण ताक्तीनिशी संपूर्ण पुणे शहरात पुणे शहर कोअर कमेटी सरफराज शेख, हलीम शेख, डॅनिअल लांडगे व अबू सुफीवान कुरेशी यांच्या नेतृत्वात लढविणार आहे.

निवडणुकीचे स्टार प्रचारक म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार  असदुद्दीन ओवैसी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील , महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, महाराष्ट्र महासचिव अकिल मुजावर, धुळे विधानसभा आमदार फारूक शहा, मालेगाव विधानसभा आमदार मुफ्ती इस्माईल  हे उपस्थित राहणार आहेत.

शहरात अनेक समस्या, प्रश्न जसेच्या तसे आहेत जे सत्ताधारी व विरोधी पक्ष देखील सोडवु शकले नाहीत. त्यामुळे जनतेला एक नवा पर्याय म्हणून ऑल इंडिया मजलिस-ए-इतेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्ष सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर शिक्षण, आरोग्य या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे.

व्यामुळे प्रभाग रचना कशीही असली तरी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्ष पूर्ण ताकतीने निवडणूक लढवणार आहे व पक्षाच्या वतीने सुशिक्षित, शहराच्या व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असणान्या व जनसंपर्क असणाऱ्या उमेदवारांना संधी देऊन जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.