Anantrao Pawar College | अनंतराव पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वृत्तपत्रांचे वाटप

Categories
Breaking News cultural Education पुणे

अनंतराव पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वृत्तपत्रांचे वाटप

१५ ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अनंतराव पवार महाविद्यालयात  मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. कलाम साहेबांच्या प्रतिमेस मा. प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी या होत्या. यावेळी उपप्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, डॉ. प्रवीण चोळके, ग्रंथपाल प्रा. अविनाश हुंबरे, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. अविनाश हुंबरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी वाचन प्रेरणा दिनाविषयी माहिती देऊन या दिनाचे औचित्य साधून मराठी आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा. प्राचार्य यांनी डॉ. कलाम साहेबांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात, त्यांची कष्ट करण्याची असणारी तयारी आणि त्यामध्ये असणारे सातत्य याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राचार्य पुढे म्हणाल्या की, डॉ.कलाम साहेबांच्या एकेका विधानातून आपणास प्रेरणा मिळत असते, त्यांचे प्रत्येक पुस्तक आपणास प्रेरणादायी आहे. डॉ. कलाम साहेबांच्या दृष्टिकोनातून युवा वर्गाची शक्ती आणि युवा वर्गाकडून असणाऱ्या अपेक्षा याविषयी मा. प्राचार्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. दत्तात्रय फटांगडे यांनी कलाम साहेबांच्या जीवनाचा जीवनकार्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर कोमल रामतीर्थे (द्वितीय वर्ष वाणिज्य), आदित्य गायकवाड (प्रथम वर्ष कला), अनुजा टेकाळे (प्रथम वर्ष कला) या विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम साहेबांच्या कार्यावर, त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर, त्याचबरोबर वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व सांगताना एक पुस्तक कितीतरी मित्रांपेक्षाही अधिक जवळचा मित्र होऊ शकते याविषयी विद्यार्थ्यांनी आपले मत मांडले.

यावेळी विद्यार्थ्यांना वाचनाची अभिरुची निर्माण व्हावी, आपल्या दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचनाने व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना विविध वृत्तपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच मराठी विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ‘सृजन भित्तीपत्रका’चे प्रकाशन मा. प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याचबरोबर ग्रंथालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या संदर्भ ग्रंथांचा, कोशवाङ्मयाचा, अवांतर वाचनाच्या पुस्तकांचा, विश्वकोशाचा परिचय व्हावा या उद्देशाने ग्रंथालय विभागामध्ये ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते.

या प्रदर्शनाचा विद्यार्थी – प्राध्यापक यांनी लाभ घेऊन उत्सुकतेने ग्रंथांची पाहणी केली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मराठी आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैष्णवी ववले, आरती गोपालघरे, मुक्ता काकडे, तन्वी वाल्हेकर, श्रुती जगताप, कुशल पैठणे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. समन्वयक – सूत्रसंचालक म्हणून डॉ. गणेश चौधरी यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आभार प्रा.अश्विनी जाधव यांनी मानले.

Anantrao Pawar College : अनंतराव पवार महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Categories
Education पुणे

अनंतराव पवार महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

पुणे : जिल्हा शिक्षण मंडळाच्या पिरंगुट येथील अनंतराव पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासाठी  सकाळी  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांनी केले. प्रास्ताविकामधून त्यांनी महाविद्यालयाच्या उत्तरोत्तर विकासाची वाटचाल नमूद केली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी हा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ महत्त्वाचा ठरत असतो. यातूनच प्रेरणा घेत विद्यार्थी आपल्या भविष्याची वाटचाल करत असतो, असे मत प्रतिपादन केले.

दत्ता कोहिनकर आणि  मकरंद टिल्लू यांनी आपल्या खुमासदार शैलीत तणावमुक्तीसाठी विविध प्रात्यक्षिके करत, हास्याचे फवारे उडवत उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला. यावेळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांची साथ देत प्रतिसाद दिला.  मकरंद टिल्लू यांनी आपल्या मनोगतातून पाणी गळती बंद करून पाणी बचत करण्याचे आवाहनही केले. उपकुलसचिव  मुंजाजी रासवे म्हणाले की, अत्यंत ग्रामीण भागामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने शैक्षणिक साधने उपलब्ध करून दिली आहेत, या साधनांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयापर्यंत गेले पाहिजे. यापुढे ते म्हणाले की, आपण नेहमी आपल्या मनात चांगले विचार घेऊनच कार्यप्रवण राहिले पाहिजे. यावेळी महाविद्यालयात विविध विद्याशाखांमध्ये, विविध उपक्रमांमध्ये विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा, प्रशासकीय सेवकांचा मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी अंजनवेलचे संचालक राहुल जगताप यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. समारंभासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समिती प्रमुख आणि सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मिनाली चव्हाण, डॉ. श्रीकांत देशमुख यांनी केले; तर डॉ. प्रवीण चोळके यांनी आभार मानले.

दत्ता कोहिनकर म्हणाले, आपण शरीर व मनाकडे लक्ष द्यावे. आपले अंतर्मन चोवीस तास कार्य करत आहे. यशस्वी जीवनासाठी जसा विचार कराल तशी कृती करणे महत्त्वाचे म्हणून विचार बदला आयुष्य बदलेल.

मकरंद टिल्लू  म्हणाले,  व्यसन करायला लोक लाजत नाहीत; आपण हसायला का लाजावे, यामुळे तणावमुक्ती साधली जाते, माणूस एकमेव प्राणी आहे की तो विचारांचा रवंथ करतो, त्यामुळे यशस्वी होतो.

या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे उप-कुलसचिव  मुंजाजी रासवे,  मकरंद टिल्लू (प्रसिद्ध लेखक, एकपात्री हास्य कलाकार, लाफ्टर योगा ट्रेनर),  दत्ता कोहिनकर (माईंड पावर ट्रेनर) उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी, सुनीलभाऊ चांदेरे (अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), उपप्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, डॉ. प्रवीण चोळके, मा. श्री. सुरज गोळे,  मोहन गोळे, अंजनवेलचे संचालक  राहुल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष  राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदमसाहेब, सहसचिव . एल. एम. पवार, खजिनदार मोहनराव देशमुख, सहसचिव प्रशासन  ए. एम. जाधव यांचे अनमोल सहकार्य मिळाले.