PMC : नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही होते की नाही? याकडे ही आयुक्तांचे लक्ष 

Categories
Breaking News PMC पुणे

नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही होते की नाही? याकडे ही आयुक्तांचे लक्ष

: खाते प्रमुखांना वेळोवेळी अहवाल देण्याचे आदेश

पुणे : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रशासक पदाचा कारभार हाती घेतल्यापासून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यास प्राथमिकता दिली आहे. त्यानुसार नागरिकांना भेटण्याची वेळ देखील देण्यात आली आहे. तसेच नागरिकांची तक्रार संबंधित विभागाकडे पाठवण्यात येते. त्यावर खात्याकडून कार्यवाही होते कि नाही, यावर देखील आयुक्त लक्ष देत आहेत. सर्व खाते प्रमुखांना  तक्रारींचे निराकरण केल्याबाबत वेळोवेळी अहवाल देण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.

: खाते प्रमुखांना असे आहेत आदेश

महापालिका आयुक्त कार्यालयामध्ये महापालिका आयुक्त यांना समक्ष भेटून नागरिकांनी सादर केलेल्या तक्रार अर्ज । निवेदन हे पुढील कार्यवाहीसाठी संबंधित खात्याकडे पाठविण्यात आलेले आहेत. तथापि सदर तक्रार अर्ज | निवेदन यावर झालेल्या कार्यवाही बाबतचे पूर्तता अहवाल महापालिका आयुक्त यांचे अवलोकनार्थ त्वरित सादर करणे आवश्यक आहे. तरी नागरिकांचे तक्रार अर्ज | निवेदन यावर केलेल्या कार्यवाहीचे अहवाल महापालिका आयुक्त कार्यालयाकडे संबंधित खातेप्रमुख यांनी वेळोवेळी त्वरित सादर करावेत.

Citizens’ complaints : महापालिकेचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारी गंभीरपणे घेत नाहीत : अतिरिक्त आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारी गंभीरपणे घेत नाहीत

: अतिरिक्त आयुक्तांनी सुनावले

पुणे : महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी तक्रार व्यवस्थापन प्रणाली (Complaint Management System) विकसित करण्यात आली आहे. मात्र  असे निदर्शनास आले आहे की बरेच विभाग नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत नाहीत.  संबंधित अधिकारी यांचेकडून काम न करता तक्रारी बंद केल्या जात आहेत तसेच वेळच्या वेळी संबंधित अधिकारी यांना Assign केल्या जात नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून  सर्व खातेप्रमुख यांनी तक्रार व्यवस्थापन प्रणालीची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची दक्षता घ्यावी. असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

तक्रार व्यवस्थापन प्रणालीबाबत खालीलप्रमाणे गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत.

१) अधिकारी सेवक यांच्याकडून तक्रारी काम न करता किंवा अर्धवट काम करून बंद केल्या जातात.
२) अधिकारी सेवकांकडून स्वत:कडील तक्रार असली तरी तक्रार दुसऱ्या अधिकारी / खात्याला पाठविण्यासाठी Reception User ला पाठवून वेळकाढूपणा केला जातो.
३) तक्रार बंद करण्याचा अधिकार फक्त संबंधित अधिकारी यांना आहे परंतु काही अधिकारी Reception User यांना तक्रार बंद करण्यास सांगतात व त्यामध्ये काम केल्याबाबतचा सविस्तर शेरा टाकला जात नाही.
४) बहुतेक खात्यामध्ये तक्रार व्यवस्थापन प्रणालीसाठी Reception User नेमलेले नाहीत.
५) नेमलेल्या Reception User युजर यांना खात्यामधील अधिकारी व त्यांच्याकडील कार्यक्षेत्र याबाबतची माहिती नसते.
६) काही खात्यांमध्ये Reception User नेमलेले आहेत परंतु तक्रारी वेळच्या वेळेत संबंधित अधिकारी यांना Assign केल्या (पाठविल्या) जात नाहीत.
७) खात्यामधील अधिकारी सेवकांच्या बदली झाल्यास Reception User यांच्याकडून अधिकारी सेवकांना तक्रारी प्राप्त होण्यासाठी Ladder वेळच्या वेळी अद्यावत करण्यात येत नाही.
या  बाबी अत्यंत गंभीर असून यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण होत आहे व जनमानसामध्ये महानगरपालिकेची प्रतिमा मलीन होत आहे. तरी खातेप्रमुख / विभागप्रमुख / महापालिका सहायक आयुक्त यांनी तक्रार व्यवस्थापन प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करणेसाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. असे आदेशात म्हटले आहे.

१) सर्व खातेप्रमुख / विभागप्रमुख यांनी प्रलंबित तक्रारीचे संबंधित अधिकारी यांचेमार्फत जागेवर निराकरण झाल्याची खातरजमा करून प्रणालीमध्ये तक्रार बंद करणेबाबतची कार्यवाही करावी. तसेच आपल्या स्तरावर वेळोवेळी तक्रारींचा आढावा घ्यावा व तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
२) तक्रार प्राप्त झालेले अधिकारी / सेवक यांनी काम न करता किंवा अर्धवट काम केले असल्यास तक्रार बंद केल्यास तसेच स्वत:कडील तक्रार विनाकारण Reception User पाठवून विनाकारण वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकारी सेवकांवर कारवाई करावी.
३) प्रणालीमधील जुन्या तक्रारी त्वरित निरस्त करण्यात याव्यात जुन्या तक्रारी निरस्त करण्यास अडचण | शंका असल्यास Feedback Monitoring Cell (FMC) कक्षाकडे ०२०-२५५०६६१४ या क्रमांकावर संपर्क करावा.
४) तक्रार प्राप्त होणाऱ्या अधिकारी यांनीच “PMC Officer Connect” मोबाईल तक्रार अपमार्फत तक्रार बंद करून त्याबाबत नागरिकाचे समाधान होईल अशा प्रकारे शेरा टाकून तक्रार बंद करणेबाबत सूचना द्याव्यात.
५) Feedback Monitoring Cell (FMC) मार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणेस संबंधित अधिकारी यांना सूचना द्याव्यात.
६) ज्या सेवकांना आपल्या खात्याकडील सर्व कामकाजाची तसेच सर्व अधिकारी व त्यांचे कार्यक्षेत्र या बाबतची माहिती असेल अशाच सेवकांची Reception User म्हणून नेमणूक करावी.
७) Reception User यांना तक्रार व्यवस्थापन प्रणालीमध्ये खात्याचे लॉगीनमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी त्याच दिवशी संबंधित अधिकारी यांना Assign करणेबाबत सूचना द्याव्यात.
८) खात्यामधील तक्रार प्रणाली संबंधित अधिकारी यांच्या बदली झाल्यास Ladder अद्यावत करणेबाबत Reception User यांना सूचना द्याव्यात.
तरी सर्व संबंधित खातेप्रमुख / विभागप्रमुख / महापालिका सहायक आयुक्त यांनी उपरोक्त सूचनांप्रमाणे त्वरित कार्यवाही करावी व तक्रारी प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, याबाबतच्या कामकाजाबाबतचा
आमचे स्तरावर आढावा घेण्यात येईल. असे आदेशात म्हटले आहे.