Pune Municipal Corporation | क्षेत्रीय कार्यालयांनी बांधलेल्या मिळकतींची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नाही!

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | क्षेत्रीय कार्यालयांनी बांधलेल्या मिळकतींची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नाही!

| मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाने  मागवली सर्व खात्याकडून माहिती

 

Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिका (PMC Pune) मालमत्ता व्यवस्थापन विभागामार्फत (PMC Property Management Department) अॅमिनिटी स्पेस, विकसकामार्फत मिळालेल्या सदनिका इ. ताब्यात घेण्यात येतात. तसेच भूमी संपादन विभागामार्फत जागा महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात येतात. मात्र महापालिकेच्या मिळकतीची (PMC Own Properties) संकलित माहितीच मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे नाही. खास करून क्षेत्रीय कार्यालयाकडून (PMC Ward Offices) ज्या मिळकती बांधल्या गेल्या आहेत. त्याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे उपायुक्त महेश पाटील (Deputy Commissioner Mahesh Patil) यांनी सर्व विभागाकडून महापालिकेच्या मिळकतीची माहिती मागवली आहे. (Pune Municipal Corporation)
महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींची माहिती मालमत्ता व व्यवस्थापन कार्यालयामार्फत संकलित करण्यात येते. त्यानंतर अशा मिळकतींचे रस्तारुंदीतील बाधित नागरिकांचे पुनर्वसन व मिळकत वाटप नियमावली २००८ नुसार भाडे तत्वावर मिळकत वाटप नियमावली २००८ चे तरतुदीनुसार वाटप केले जाते. संपादित केलेल्या जागा व अॅमिनेटीज स्पेस आणि विकसकाकडून मिळालेल्या सदनिका अशा मिळकतींवर पुणे महानगरपालिकेची मालकी असते. अशा मिळकतींचे रस्ता बाधित नागरिकांचे पुनर्वसन व मिळकत वाटप नियमावली २००८ नुसार भाडे तत्वावर वाटप केले जाते. तसेच काही मिळकती झोनिपु, चाळ विभाग, भवन रचना, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन व सर्व क्षेत्रिय कार्यालय यांना त्यांचे मागणीनुसार व कामकाजाच्या सोयीनुसार हस्तांतरित केलेल्या आहेत. क्षेत्रिय कार्यालये यांनी परस्पर बांधलेल्या मिळकतींची माहिती मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे संकलित नाही. (PMC Pune News)
अशा प्रकारे हस्तांतरण केलेल्या पुणे महानगरपालिकेच्या मिळकतींची माहिती तसेच क्षेत्रिय कार्यालयांनी बांधलेल्या मिळकती व त्यांचा विनियोग याचीही माहिती संकलित असणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांचे विनियोगाचा आढावा घेणे शक्य होणार आहे. याकामी मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून आपले विभागाकडे हस्तांतरित केलेल्या सदनिका, गाळे, मोकळ्या जागा इत्यादीची अद्ययावत माहिती व क्षेत्रिय कार्यालयांनी बांधलेली मिळकतींची माहिती त्वरित पाठविण्यात यावी. असे आदेश उपायुक्त महेश पाटील यांनी सर्व विभागांना दिले आहेत. (Pune Municipal Corporation News)
——–
News Title | Pune Municipal Corporation | The municipal corporation does not have the information of the income generated by the regional offices!