Prithviraj Sutar : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाली फराळाचे आयोजन  : शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार यांचा उपक्रम 

Categories
cultural PMC पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाली फराळाचे आयोजन

: शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार यांचा उपक्रम

पुणे : दरवर्षी प्रमाणे शिवेसना गटनेते आणि स्थानिक नगरसेवक  पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या वतीने व श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या सहकार्याने  मनपाच्या आरोग्य विभाग,कीटक विभाग, ड्रेनेज, पाणीपुरवठा, विद्युत, अतिक्रमण, उद्यान, भवन, गवनी, श्वानपथक अशा विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या पंधरा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. अशी माहिती गटनेता पृथ्वीराज सुतार यांनी दिली.

सर्व कर्मचारी वर्षभर रात्रं-दिवस जनतेची सेवा करीत असतात.  आपल्या सर्वांना त्यांनी वर्षभर कामासाठी केलेल्या सहकार्याची आठवण म्हणून अशा या कौटुंबिक दिवाळी फराळाचे आयोजन करण्याचा मूळ हेतू असतो. यावर्षी कोरोनाच्या आपत्कालीन संकटामध्ये या सर्व विविध विभागांच्या कोविड योध्यांनी आपले सेवा-कार्य बजावून समाजाला सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य पार पाडले, त्यांच्या या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सर्वांना दिवाळीच्या निमित्ताने फराळ व ड्रायफ्रूट बॉक्सचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना विभागप्रमुख-भारत सुतार व श्री शिवसाम्राज्य प्रतिष्ठान(ट्रस्ट) चे अध्यक्ष-सुमित माथवड उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धर्मराज सुतार, शिवराज सुतार, सुधीर वरघडे, गजानन सातपुते,जितेंद्र खुंटे,अनिल भगत, हेमंत मोहोळ, गणेश घोलप, नचिकेत गुमटकर,आकाश सुतार,आप्पा वाघ, विशाल उभे,महेश चव्हाण,योगेश चौधरी, संजय घारमाळकर, सुयोग बांदल, शरद डहाळे, सागर आगरकर, मनोज आल्हाट, केदार तपस्वी, प्रशांत पाटील, अभिजित चव्हाण, संजय डाळिंबकर, निलेश मिस्त्री, सुरज अवधुत, राकेश क्षत्रिय, सचिन डाळिंबकर,संजय डाळिंबकर,योगेश क्षीरसागर, निलेश मिस्त्री, भूषण माथवड, परेश नारकर, आदित्य भगत, सुंदर खुडे, अशोक चंदनकेरी, शशिकांत नाकते, अरुण घोरवडे, अरुण सरोदे यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल भगत यांनी केले व धर्मराज सुतार यांनी आभार मानले.

Pawar Family : Baramati : पवार कुटुंबियांच्या दिवाळी कार्यक्रमात अजित पवार का नव्हते? शरद पवार यांनी सांगितले हे कारण 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पवार कुटुंबियांच्या दिवाळी कार्यक्रमात अजित पवार का नव्हते?

शरद पवार यांनी सांगितले नेमके कारण

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दरवर्षी कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करतात. तसेच दिवाळी पाडव्यादिवशी पवार कुटुंबीय बारामतीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार करत असतात. यावर्षीही दिवाळी पाडव्यानिमित्त आज सकाळी पवार कुटुंबीयांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, तसेच रोहित पवार उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. दरम्यान, अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत म्हणाले की, अजित पवार यांच्या ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर अजितदादा यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी दिवाळीनिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी येणे टाळले. अजित पवार यांच्या ताफ्यामधील दोन वाहन चालक आणि तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे पवार कुटुंबाकडून दिवाळी निमित्त होणाऱ्या भेटीगाठीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र शरद पवार यांनी याबाबत स्वत: स्पष्टीकरण देत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. पवार कुटुंबीय हे दरवर्षी दिवाळी पाडव्या दिवशी बारामती येथील निवास्थानी ग्रामस्थ, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असतात. यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

Sharad Pawar : शरद पवार म्हणतात, पेट्रोल डिझेल च्या दराबाबत आम्ही सरकार सोबत : राज्यात दर अजून कमी होण्याची चिन्हे

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

पेट्रोल डिझेल च्या दराबाबत आम्ही सरकार सोबत : शरद पवार

: राज्यात दर अजून कमी होण्याची चिन्हे

बारामती : केंद्राने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशातील जनतेला दिलासा दिला आहे. दिवाळीची भेट म्हणून पंतप्रधान मोदींनी पेट्रोल आणि डिझेल किंमतीच्या दरात कपात केली आहे. पेट्रोल पाच आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातही यांचे दर कमी होणार का? यावर जनतेचे लक्ष लागून आहे. त्यातच राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलवर भाष्य केले आहे. याबाबत आम्ही राज्य सरकारसोबत बोलत असल्याचे पवार म्हणाले आहेत. बारामतीत स्नेहमेळाव्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

पवार म्हणाले, पेट्रोल डिझेलच्या दराबाबत नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी आम्ही राज्य सरकार सोबत बोलत आहोत. सरकारला याबाबत मार्ग काढण्यास निश्चितच सुचवलेलं आहे. परंतु केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीची जे देणं लवकर द्यावं. ते दिल्यानंतर लोकांना मदत करण्याचा निर्णय घेणे शक्य होईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

”सद्यस्थितीत आपण हळूहळू संकटातून बाहेर निघत आहोत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर नेहमीचा कारभार करू. गेल्या दोन वर्षात जे आर्थिक नुकसान झालं ते भरून काढू, अर्थव्यवस्था समाजव्यवस्था सावरण्याची काळजी घेणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.”

लोकांच्या आग्रहामुळे आम्हाला हा कार्यक्रम घ्यावा लागला

”महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आले. त्यामुळे आपल्याला काही पथ्य पाळावी लागली. आता हे संकट हळूहळू कमी होत आहे. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर राज्य सरकारने अनेक दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचा परिणाम होऊन कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत लोकांना भेटावं की नाही भेटावं या विचारात आम्ही होतो. पण लोकांच्या आग्रहामुळे आम्हाला हा कार्यक्रम घ्यावा लागला. कोरोनाबद्दलची संपूर्ण खबरदारी घेऊन शुभेच्छा देण्या घेण्याचा कार्यक्रम पार पडतोय.”