Dr.  Babasaheb Ambedkar’s jayanti celebration in America

Categories
Breaking News cultural social देश/विदेश

 Dr.  Babasaheb Ambedkar’s jayanti celebration in America

 America (Jersey City, NJ) – On the occasion of Dr Babasaheb Ambedkar’s birth anniversary, a large-scale Jayanti Mahotsav was celebrated in America by the Ambedkar International Mission.
On this occasion, a special flag hoisting ceremony was held at City Hall in Jersey City.  Along with the national flag of America, the blue flag symbolizing social equality was also hoisted in decoration during this ceremony.  So it was a joyous moment of solidarity with the city’s egalitarian principles.  Councilwoman Mira Prinz-Erey and Councilman James Solomon were present at the event.  Dr.  This flag hoisting ceremony is held every year on the occasion of Ambedkar Jayanti.  This is the third year of the flag hoisting.  Dr.  Ambedkar International Mission (AIM), the oldest organization of Ambedkari people outside India, organized the event in collaboration with Jersey City Hall.

Dr Ambedkar Jayanti 2024 | बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त  शहरातील जयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलीस प्रशासन व महापालिकेची बैठक संपन्न! 

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Dr Ambedkar Jayanti 2024 | बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त  शहरातील जयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलीस प्रशासन व महापालिकेची बैठक संपन्न!

 

Dr Ambedkar Jayanti 2024 |पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation (PMC) प्रतिवर्षी १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांची जयंती साजरी करण्यात येते. सन २०२४ च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरातील जयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलीस प्रशासन व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची शनिवार,  रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पुणे इमारत) येथे आयोजित करण्यात आली होती. (Pune PMC News)

सदर बैठकीस मा.डॉ. राजेंद्र भोसले, प्रशासक तथा महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई), रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), सर्व परिमंडळाचे उपायुक्त, सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे मा सहाय्यक महापालिका आयुक्त
मा. माधव जगताप, उप आयुक्त (अतिक्रमण/परवाना व आकाशचिन्ह विभाग),  अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (पथ विभाग), नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता( पाणीपुरवठा विभाग)  प्रतिभा पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी, पोलीस उपायुक्त (झोन २) आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
the karbhari - Dr babasaheb ambedkar jayanti
सदर बैठकीत भारतरत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२४ रोजी करावयाच्या व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जयंती मंडळांनी केलेल्या सुचनांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे व्यवस्था करण्याच्या आदेश देण्यात आले.
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाबाहेर व उद्यानाच्या परिसरात सावली मंडप टाकणेची व्यवस्था करण्यात यावी. तसेच उद्यानामधील फरशीवर मेटींग टाकण्यात यावे.
२. वाहतुकीचा होऊ नये या दृष्टीने नियोजन करणे.
३. उद्यानातील पुतळा होर्डिग्जमुळे झाकला जाणार नाही याची काळजी घेणे.
४. निवडणूक आदर्श आचार संहितेचे पालन करून संबंधीत संघटना यांचेशी चर्चा करून होर्डिंग्जला
बंधन घालावे. आचार संहितेचा विचार करून होर्डिंगना नियमित परवानगीचा आग्रह धरणे.
५. अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून ती काढणे.
६. अतिक्रमण विभागाचा एक फिक्स पॉईट ठेवणे. (ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय व अतिक्रमण विभाग यांचे संयुक्तपणे)
७. उद्यान परिसरापासून १०० मिटर परिघामध्ये कोणीही अन बनविण्यासाठी सिलेंडरचा वापर करणार नाही याची दक्षता घेणे व प्रतिबंध करणे.
८. अॅम्ब्युलन्स व व्हीआयपी वाहनांसाठी मार्ग मोकळा ठेवणे.
९. उद्यानाच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
१०. यासाठी यावर्षी ६ पिण्याने पाण्याचे टैंकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच आवश्यकतेनुसार पाण्याचे टैंकर वाढवावे.
११. नागरिकांना पिण्याचे पेपर ग्लास पुरविणे.
१२. दिनांक १० एप्रिल २०२४ ते दिनांक १६ एप्रिल २०२४ पर्यंत उद्यान व आजूबाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे.
१३. उद्यानाकडे जाणारे सर्व रस्त्यांची स्वच्छता राखणे.
१४. जीपीओकडून येणाऱ्या रस्त्यालगत मोबाईल टॉयलेट व पोर्टेबल टॉयलेटची व्यवस्था करणे ( पोर्टेबल टॉयलेट प्रत्येकी ८ सीट्सचे व वेळोवेळी साफसफाई करून स्वच्छता राखणे.)

१५. परिसर स्वच्छतेच्या कामी स्वतंत्र टीम तीन शिफ्टमध्ये नियोजित करणे.
१६. उद्यान मेरीची स्वच्छतेची विशेष काळजी घेणे, सदर ठिकाणी वाहण्यात येणारे पुष्पहार काढून घेऊन पुतळा नियमितपणे स्वच्छ राखावा.
१०. हवामान खात्याने केलेल्या अंदाजानुसार शहरामध्ये उष्माघाताची शक्यता विचारात घेऊन उद्यान परिसरात फिरता दवाखाना- क्लिनिक तसेच २ वाहिका २ डॉक्टर फार्मासिस्ट व महाय्यक यांची नियुक्ती करणे.
१८. उद्यानाच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था, तसेच माईक-माउंट स्पीकर तसेच जनरेटर अपनी व्यवस्था करण्यात यावी.
१९. १४ एप्रिल रोजी उद्यानासमोरील रस्त्यावरील लोखंडी रेलिंग काढण्यात यावे.
२०. उद्यान परिसरात तिन्ही लिफ्टमध्ये आवश्यक सुरक्षा रक्षकांचा बंदोबस्त ठेवावा.
२१. उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंगसाठी आवश्यक उपाययोजना करावी.
२२. उद्यान परिसरात येणारे व्हीआयपी वाहने व अत्यावश्यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका यांचे संचलन (ये-जा करणेकामी योग्य ती व्यवस्था मार्गिका तयार करून ठेवणे.
२३. उद्यान परिसरातील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावेत
२४. उद्यानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील राडारोडा उचलण्यात यावा.
२५. फुटपाथ स्वच्छ ठेवण्यात यावेत, त्यावरील निघालेले लावून घ्यावेत
२६. वरील सर्व काम झाल्याचे खात्री करण्यासाठी खाते प्रमुखांनी प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन कामाची पाहणी करावी.
२७. उद्यान परिसरात आवश्यक ती रंगरंगोटी तसेच मेघडंबरीची साफसफाई करणेत यावी.
२८. उद्यानातील झाडांचा अडथळा होणार नाही अशा पद्धतीने झाडांचे ट्रिमिंग करण्यात यावे.
२९. उद्यानातील परिसर जयंतीपूर्वी व जयंतीनंतर स्वच्छ करून घेण्यात यावा.
३०. उद्यानाच्या ठिकाणी अग्रिशामक दलाची एक गाडी सर्व साधनांसह ठेवण्यात यावी. तसेच नजिक शामक केंद्र येथे एक गाडी स्टैंडबाय सर्व इडिपमेंटसह तयार ठेवावी.
३१. सर्व परिमंडळाचे मा. उपायुक्त आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या मा. सहाय्यक महापालिका आयुक्त यांनी दिलेले काम पूर्ण झाले आहे याची खातरजमा करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करावी.
३२. पुणे शहरात ज्या परिसरात भारतरत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते तेथे सहाय्यक महापालिका आयुक्त यांनी क्षेत्रीय स्तरावर नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता योग्य ती व्यवस्था करावी.
होर्डिंग्ज लावताना आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाच्या बतीने देण्यात आले. तसेच होर्डिंग्ज अथवा साउन्ड लावताना पूर्व परवानगी घेण्यात यावी याबाबतदेखील
सुचीत केले.

Dr Ambedkar Jayanti 2024 | PMC | आंबेडकर जयंतीच्या तयारीच्या निमित्ताने 13 एप्रिल च्या मध्यरात्री पर्यंत का कामे करत बसता? | महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना परखड सवाल

Categories
Breaking News PMC social पुणे

Dr Ambedkar Jayanti 2024 | PMC | आंबेडकर जयंतीच्या तयारीच्या निमित्ताने 13 एप्रिल च्या मध्यरात्री पर्यंत का कामे करत बसता?

| महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना परखड सवाल

Dr Ambedkar Jayanti 2024 – (The Karbhari News Service) – 14 एप्रिल अर्थात  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (Bharatratna Dr Babasaheb Ambedkar) यांच्या जयंतीच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने पुणे स्टेशन परिसरात कार्यक्रम घेतला जातो. मात्र या तयारीची कामे ही 13 एप्रिलच्या मध्यरात्री पर्यंत चालतात. अधिकाऱ्यांच्या या कामाच्या पद्धती बाबत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी चांगलाच समाचार घेतला. तसेच सर्व मूलभूत सुविधा विषयक कामे 10 एप्रिल पर्यंत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. (Pune Municipal Corporation (PMC)
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महापालिका आयुक्तांनी आज विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली. महापालिकेच्या वतीने पुणे स्टेशन परिसरात डॉ बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या ठिकाणी पालिकेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी कसे नियोजन असेल, याबाबत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी सादरीकरण केले. (Pune PMC News)
यानंतर महापालिका आयुक्तांनी विविध सूचना केल्या. पुतळा परिसरातील रेलिंग काढून तिथे नागरिकांना बसण्याची व्यवस्था करा. टँकर चे पाणी देण्यापेक्षा कुणी स्वयंसेवी संस्था पाणी देण्यास तयार आहे का, याची माहिती घ्या. टॉयलेट ची दुरवस्था असते. त्यात स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्व मूलभूत सुविधा द्या, असे सांगितले. तसेच दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो हे माहित असताना जयंतीच्या आदल्या रात्री पर्यंत का कामे करत बसता, असा परखड सवाल करत ही कामे 10 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

| मोबाईल बंद ठेवाल तर कारवाई करू – आयुक्त

दरम्यान महापालिका आयुक्तांनी विविध अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या नेमून दिल्या आहेत. त्यांनी सर्व कामे पार पाडायची आहेत. ऐन वेळेला कुणी अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने फोन बंद ठेवला तर त्यावर कारवाई करू. असा इशारा देखील आयुक्त डॉ भोसले यांनी दिला.