Hanuman Jayanti : Raj Thackeray : राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती ; मात्र राज काहीच न बोलण्याने चर्चांना उधाण 

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती ; मात्र राज काहीच न बोलण्याने चर्चांना उधाण

पुणे : जय श्रीराम, जय हनुमानच्या घोषणेने पुण्यातील खालकर चौक खालकर चौकातील हनुमान मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आज हनुमान जयंती निमित्त (hanuman jayanti) मारुती मंदिरात साडे सातच्या सुमारास महाआरती पार पडली. यासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र यावेळी राज ठाकरे काहीच न बोलण्याने चर्चांना उधाण आले आहे.

दुपारपासून मंदिर परिसरात ढोलताशा, झांज पथक सुरू होते. ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचे स्वागत करण्यात आले. महाआरतीनंतर हनुमान चालिसा पठणही झाले. खालकर चौकात सगळीकडे हिंदूजननायक राज ठाकरे असे फलक लावले होते. त्या फलकावर मागे मारूती पुढे राज ठाकरे दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मशिदीवरील भोंग्यांवरून वाद सुरू आहे.

राज ठाकरे आंबा महोत्सवानंतर महाआरतीला जाणार होते पण अचानक त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे सरळ महाआरतीसाठी खालकर चौकात आले होते आणि मारुती मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी हनुमान चालिसा छापलेल्या लहान पुस्तिकांचे जनसमूदायाला वाटप ही करण्यात आले होते. खालकर चौकात मनसैनिकानी मोठी गर्दी केली होती.

NCP Pune : Inter-religious harmony : जातीयवादाच्या आरोपाला राष्ट्रवादी सर्वधर्मसमभाव जपत उत्तर देणार 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

जातीयवादाच्या आरोपाला राष्ट्रवादी सर्वधर्मसमभाव जपत उत्तर देणार

पुण्यात राष्ट्रवादीकडून परिसंवाद यात्रेत सर्वधर्मसमभाव जपला जाणार

: मुस्लीम बांधवा कडून हनुमान जयंती तर हिंदू बांधवा कडून रोजा इफ्तार च्या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जातीयवादाचे आरोप होत आहेत. मात्र याकडे फार लक्ष न देता राष्ट्रवादी कॉंग्रेस सर्वधर्मसमभाव जपण्याचा प्रयत्न करताना दिसते आहे. पुणे राष्ट्रवादी कडून  उद्या  परिसंवाद यात्रा आयोजित केले आहे. याच यात्रेच्या समारोपात राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून एक अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्लीम बांधवा कडून हनुमान जयंती तर हिंदू बांधवा कडून रोजा इफ्तार च्या कार्यक्रमाचे आयोजन उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले  आहे. अशी माहिती पुये राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

याबाबत जगताप यांनी सागितले कि,

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवार संवाद यात्रा उद्या दिनांक १६ एप्रिल  रोजी पुणे शहरात येत असून दुधाने लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलहेब,  खासदार सुप्रिया सुळे,राज्यमंत्री  दत्तात्रय भरणे, खासदार वंदना चव्हाण,खासदार डाॅ. श्री. अमोल कोल्हे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, १६ एप्रिल २०२२ चे असे असतील कार्यक्रम

सकाळी :१०.०० ते ११.०० वा.
शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ आढावा बैठक.

११.०० ते १२.३० वा.
कोथरुड विधानसभा मतदार संघ आढावा बैठक.

दुपारी :१२.३०ते०१.३०वा.
कसबापेठ विधानसभा मतदार संघ आढावा बैठक.

दुपारी ०२.०० ते ०३.३० वा.
खडकवासला विधानसभा मतदार संघ आढावा बैठक.

दुपारी ०४ ते ०५
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अर्बन सेलच्या वतीने “अर्बन कनेक्ट” या ॲपचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

सायंकाळी ०५.०० ते ०६.००
पुणे शहरजिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व विधानसभा मतदार संघ कार्यकारणी आढावा बैठक.

सायंकाळी ०६.०० ते ०७.३० वा.
पुणे ग्रामीण जिल्हाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकारणी आढावा बैठक.

सायंकाळी ०७.०० वाजता.
दुधाने लॉन्स जवळील हनुमान मंदिर येथे सर्वधर्मीय बांधवांकडून हनुमान जयंतीची आरती व रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.