Media Tower | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीडिया टॉवर गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Media Tower | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीडिया टॉवर गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन

| पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी सहकार्य करू | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

Media Tower | महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (Maharashtra Rajya Marathi Patrakar Sangh) यांच्यावतीने साकारण्यात येणाऱ्या ‘मीडिया टॉवर’ (Media Tower) या खाजगी तत्वावरील गृहनिर्माण प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. पत्रकारांना (Journalist) स्वस्तातील घरे मिळावीत यासाठी गृहकर्जावरील व्याजावर सवलत देण्याची योजना आणण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे प्रतिपादन श्री.फडणवीस यांनी यावेळी केले.

हॉटेल जे.डब्ल्यु.मेरिएट येथे आयोजित या कार्यक्रमास पीएमएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, दै.पुढारीचे समूह संपादक डॉ.योगेश जाधव, दै.लोकमतचे संपादक संजय आवटे, दै.सकाळचे संपादक सम्राट फडणीस, भगवती ग्रुपचे बाबासाहेब औटी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते.

नवी दिशा देणारा प्रकल्प पुण्यात उभारला जात असल्याचे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील इतर शहरात असे प्रकल्प होतांना पहायला मिळतील. पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांची स्वत:ची हक्काची घरे आढळून येत नाही.  त्यामुळे मोहिम म्हणून पत्रकारांच्या घराचा प्रकल्प हाती घ्यावा लागेल. माध्यमांची संख्या आणि प्रकार वाढले आहेत. सर्वसामान्य घरातील तरुण-तरुणी या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या जीवनात स्थैर्य येणे ही महत्वाची बाब आहे. माध्यमे स्वतंत्र आणि नि:ष्पक्ष राहण्यासाठी माध्यम संस्थेतील शेवटच्या घटकांना सामाजिक सुरक्षा द्यावी लागेल, असे ते म्हणाले.

पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर करण्यात आला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व पत्रकारांना लागू करण्यात आली आहे, त्याची व्याप्ती वाढवून त्यांचे कुटुंबियही या योजनेच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे. म्हाडाच्या लॉटरीतही पत्रकारांना मुंबईत घरे मिळाली. मात्र पत्रकारांच्या वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात ही संख्या कमी आहे. महापालिका आणि पीएमआरडीएने नियमात बसवून घरांची किंमती कमी करण्याबाबत  विचार करावा. मीडिया टॉवरसाठी जागा मिळविणे महत्वाची बाब असून महसूली मुख्यालयी असे प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक असल्यास स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येईल.

पुणे येत्या काळात देशातील महत्वाचे औद्योगिक केंद्र असेल

येत्या २० वर्षातील देशाचे ग्रोथ इंजिन होण्याची पुण्याची आणि पीएमआरडीएची क्षमता आहे. नव्या युगाचे उद्योग समाविष्ट करण्याची क्षमता असणारे हे शहर आहे.म्हणून रिंगरोडसारखे विकासाचे प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. पुण्याच्या वेगवान विकासासाठी नवे विमानतळ आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना याबाबतच्या शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यात येईल. विमानतळासाठी जमीन दिलेल्यांना समृद्ध होण्याचा अनुभव होईल, असे पॅकेज देण्यात येईल. पुण्याच्या  विकासासाठी जनआंदोलन उभे राहण्याची गरज आहे. देशाचे येत्या काळातील महत्वाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख प्रस्थापित होईल.

यावेळी श्री.जाधव, श्री.आवटे, श्री.फडणीस, श्री.औटी, श्री.भोकरे, श्री. जोशी यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

Chief Electoral Officer | मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे दिला जाणार पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे दिला जाणार पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार

लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणुका, मतदान, मतदार नोंदणी या अत्यावश्यक बाबी आहेत. निवडणुका नि:पक्षपाती आणि पारदर्शक वातावरणात पार पाडणे ही निवडणूक कार्यालयाची जबाबदारी आहे. मात्र, ही जबाबदारी पार पाडत असताना प्रसारमाध्यमांचे आणि विविध स्वयंसेवी संर्स्थांचे निवडणूक आयोगाला सहकार्य लाभत असते. हे लक्षात घ्ज्ञेवून यंदापासून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने पत्रकार आणि सामाजिक संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधीच्या माहितीचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार दिला जाणार आहे, तर मतदार जागृतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मतदार मित्र पुरस्कार दिला जाणार आहे. दहा हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. हे पुरस्कार २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनाच्य कार्यक्रमात वितरीत केले जातील. पत्रकार आणि स्वयंसेवी संस्था या पुरस्कारासाठी स्वत: अर्ज करू शकतात. त्यासाठी मतदार नोंदणी, मतदान, निवडणुका यासंबंधी गेल्या वर्षभरातील आपल्या कार्यालयाचा अहवाल स्वरूप माहिती आणि छायाचित्रांसह आपला अर्ज democracybook2022@gmail.com या ई- मेल आयडीवर अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी प्रणव सलगरकर (मोबाईल क्रमांक ८६६९०५८३२५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kamal Khan : ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन

Categories
Breaking News social देश/विदेश

ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन

सर्व स्तरातून शोक व्यक्त

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने आज लखनौमध्ये त्यांचे निधन झाले असल्याची माहिती आहे. घरी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कमाल खान आपल्या रिपोर्टिंगच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. ते एनडीटीव्हीचे लखनौ (उत्तरप्रदेश) प्रतिनिधी होते. 1960 साली जन्मलेल्या कमाल खान यांनी केलेली अनेक वार्तांकनं चर्चेत राहिली. आपल्या जवळपास तीन दशकाच्या पत्रकारितेच्या काळात त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली. भाषेवर त्यांचे खूप चांगले प्रभूत्व होते.

 

उत्तर प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी कमाल खान यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. मायावतींनी म्हटले आहे की, एनडीटीव्हीचे प्रतिष्ठित आणि नावाजलेले पत्रकार कमाल खान यांचे अचानक निधन झाले.

 

ही अत्यंत दु:खद आण पत्रकारिता विश्वाची मोठी हानी आहे. त्यांच्या परिवार आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत. मायावती यांच्यासह अनेक दिग्गजांनी कमाल खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.