Katraj Vikas Aghadi Agitation | कात्रजच्या विविध प्रश्नासाठी 31 ऑगस्ट ला जनआंदोलन

Categories
Breaking News PMC social पुणे

Katraj Vikas Aghadi Agitation | कात्रजच्या विविध प्रश्नासाठी 31 ऑगस्ट ला जनआंदोलन

| कात्रज विकास आघाडी करणार आंदोलन

Katraj Vikas Aghadi Agitation | कात्रज व परीसरांतील नागरीकांच्या समस्या (Katraj Issues) विषयी पुणे महानगरपालिका प्रशासनालावेळोवेळी पत्रांव्दारे व वैयक्तिक भेटून समस्या, तक्रारी सांगण्यात आल्या आहेत. परंतु कोणत्याही स्वरूपाची योग्य ती कार्यवाही व उपाययोजना पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासन मार्फत करण्यात येत नाही. वारंवार सांगूनही कात्रज व परीसरांतील सामान्य नागरीकांच्या प्रश्नांकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट ला जनआंदोलन (Agitation) करण्याचा निर्णय कात्रज विकास आघाडीने (Katraj Vikas Aghadi) घेतला आहे. दरम्यान आंदोलनापासून  या आघाडीला परावृत्त करावे, असे पत्र भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) पुणे महापालिकेला दिले आहे. (Katraj Vikas Aghadi Agitation)

कात्रज विकास आघाडीच्या पत्रानुसार कात्रज कोढवा रोड (Katraj-Kondhwa Road) परीसरांत मागील १५ दिवसात रोजच्या वाहतुक कोंडीमुळे ३ नागरीकांचे बळी व २५ ते ३० नागरीक जखमी झालेले आहेत. प्रशासन आजपर्यंत किडया मुंग्याच्या नजरेने कात्रजकरांकडे पाहत आहे. प्रशासन कात्रजकरांच्या जीवाशी खेळ करत आहे. याच कात्रज व परीसरांतील नागरीकांना प्रशासन महसुलांच्या नावाखाली फक्त लुबाडत आहे. परंतु त्याच सामान्य जनतेचे प्रश्न व विकासकामे मार्गी लावण्याची वेळ येते, त्यावेळी मात्र अधिकारी वर्ग त्या स्थळांची पाहणी करतात. व खोटे लिखित आश्वासन देवून कात्रज करांकडे पाठ फिरवतात, पुणे महानगरपालिकेस फक्त कात्रजकरांचा पैसा हवा आहे. परंतुत्याच्या समस्या त्याच्या जिवाशी होणा-या खेळाचे काही देणे घेणे नाही. पैसा कात्रजकरांचा व विकास कामे पेठा मधील असा खेळ प्रशासन करीत आहे. (PMC Pune News)
आम्ही आजपर्यंत कात्रज व परीसरांचे प्रश्न विकासकामे लोकशाहीच्या मार्गाने लढा देत मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत. परंतु आपल्या नाकर्त्या प्रशासनाला हे मान्य नाही म्हणूनच गुरूवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी कात्रज चौक येथे कात्रजकरांना होणा-या या नाहक त्रासामुळे आता हि आमची आर पार ची लढाई चे आंदोलन असेल. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस कोणतीही विपरीत घटना घडलेस आपण सर्वस्वी जबाबदार रहाल. असा इशारा देण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation News)

पोलिस काय म्हणतात?

आंदोलना दरम्यांन कात्रज विकास आघाडीचे वतीने रास्तारोको आंदोलन करून त्यादरम्यांन ठिय्या आंदोलन करणेत येणार असले बाबत माहिती मिळाली असुन त्यावेळी १००० ते १२०० जनसमुदाय जमण्याची शक्यता असुन आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणेची शक्यता नाकरता येत नाही. तरी आपले संबधित विभागांचे अधिकारी याचे मार्फत आंदोलन कर्ते याचेशी चर्चा करून त्यांना आंदोलना
पासून परावृत्त करणे बाबत अवगत करावे. असे पुणे पोलिसांनी महापालिकेला कळवले आहे.
——–
News Title | Katraj Vikas Aghadi Agitation | Mass movement on August 31 for various issues of Katraj