Katraj Vikas Aghadi Agitation | कात्रजच्या विविध प्रश्नासाठी 31 ऑगस्ट ला जनआंदोलन

Categories
Breaking News PMC social पुणे

Katraj Vikas Aghadi Agitation | कात्रजच्या विविध प्रश्नासाठी 31 ऑगस्ट ला जनआंदोलन

| कात्रज विकास आघाडी करणार आंदोलन

Katraj Vikas Aghadi Agitation | कात्रज व परीसरांतील नागरीकांच्या समस्या (Katraj Issues) विषयी पुणे महानगरपालिका प्रशासनालावेळोवेळी पत्रांव्दारे व वैयक्तिक भेटून समस्या, तक्रारी सांगण्यात आल्या आहेत. परंतु कोणत्याही स्वरूपाची योग्य ती कार्यवाही व उपाययोजना पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासन मार्फत करण्यात येत नाही. वारंवार सांगूनही कात्रज व परीसरांतील सामान्य नागरीकांच्या प्रश्नांकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट ला जनआंदोलन (Agitation) करण्याचा निर्णय कात्रज विकास आघाडीने (Katraj Vikas Aghadi) घेतला आहे. दरम्यान आंदोलनापासून  या आघाडीला परावृत्त करावे, असे पत्र भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) पुणे महापालिकेला दिले आहे. (Katraj Vikas Aghadi Agitation)

कात्रज विकास आघाडीच्या पत्रानुसार कात्रज कोढवा रोड (Katraj-Kondhwa Road) परीसरांत मागील १५ दिवसात रोजच्या वाहतुक कोंडीमुळे ३ नागरीकांचे बळी व २५ ते ३० नागरीक जखमी झालेले आहेत. प्रशासन आजपर्यंत किडया मुंग्याच्या नजरेने कात्रजकरांकडे पाहत आहे. प्रशासन कात्रजकरांच्या जीवाशी खेळ करत आहे. याच कात्रज व परीसरांतील नागरीकांना प्रशासन महसुलांच्या नावाखाली फक्त लुबाडत आहे. परंतु त्याच सामान्य जनतेचे प्रश्न व विकासकामे मार्गी लावण्याची वेळ येते, त्यावेळी मात्र अधिकारी वर्ग त्या स्थळांची पाहणी करतात. व खोटे लिखित आश्वासन देवून कात्रज करांकडे पाठ फिरवतात, पुणे महानगरपालिकेस फक्त कात्रजकरांचा पैसा हवा आहे. परंतुत्याच्या समस्या त्याच्या जिवाशी होणा-या खेळाचे काही देणे घेणे नाही. पैसा कात्रजकरांचा व विकास कामे पेठा मधील असा खेळ प्रशासन करीत आहे. (PMC Pune News)
आम्ही आजपर्यंत कात्रज व परीसरांचे प्रश्न विकासकामे लोकशाहीच्या मार्गाने लढा देत मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत. परंतु आपल्या नाकर्त्या प्रशासनाला हे मान्य नाही म्हणूनच गुरूवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी कात्रज चौक येथे कात्रजकरांना होणा-या या नाहक त्रासामुळे आता हि आमची आर पार ची लढाई चे आंदोलन असेल. या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेस कोणतीही विपरीत घटना घडलेस आपण सर्वस्वी जबाबदार रहाल. असा इशारा देण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation News)

पोलिस काय म्हणतात?

आंदोलना दरम्यांन कात्रज विकास आघाडीचे वतीने रास्तारोको आंदोलन करून त्यादरम्यांन ठिय्या आंदोलन करणेत येणार असले बाबत माहिती मिळाली असुन त्यावेळी १००० ते १२०० जनसमुदाय जमण्याची शक्यता असुन आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणेची शक्यता नाकरता येत नाही. तरी आपले संबधित विभागांचे अधिकारी याचे मार्फत आंदोलन कर्ते याचेशी चर्चा करून त्यांना आंदोलना
पासून परावृत्त करणे बाबत अवगत करावे. असे पुणे पोलिसांनी महापालिकेला कळवले आहे.
——–
News Title | Katraj Vikas Aghadi Agitation | Mass movement on August 31 for various issues of Katraj

Health Minister Dr. Tanaji Sawant | आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी पुणे महापालिका आयुक्तांना दिले हे आदेश

Categories
Breaking News PMC Political पुणे

Health Minister Dr. Tanaji Sawant | आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी पुणे महापालिका आयुक्तांना दिले हे आदेश

Health Minister Dr. Tanaji Sawant | कात्रज परिसरातील (Katraj Area) नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्यांचे सुशोभीकरण आणि लाईट व्यवस्था करण्यासाठी 3 कोटी 63 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत (Health Minister Dr. Tanaji Sawant)यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांना दिले आहेत. (Health Minister Dr. Tanaji Sawant)
मंत्र्यांच्या पत्रानुसार कात्रज मोरे बाग परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार १. सरहद चौक ते कात्रज पार्लर – ३ ते वंडरसिटी बाह्यवळण मार्ग या रस्त्यांचे डांबरीकरण व सुशोभिकरण करणे, २. कात्रज पार्लर ३ ते सावंत विहार या रत्यांचे रुंदीकरण, डांबरीकरण व सुशोभिकरण करणे ३. सावंत विहार फेज-३ ते अहिल्यादेवी होळकर उद्याण या रस्त्याचे कॉक्रिटीकरण, सुशोभिकरण व लाईट व्यवस्था करणे ही विकास कामे सन २०२३-२०२४ या अर्थसंकल्पीय वर्षात समाविष्ट  करणेबाबत संदर्भीय पत्रान्वये कळविणेत आलेले होते. तसेच या  कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत महापालिका आयुक्तांना कळविणेत आलेले होते. (PMC Road Department)

त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने प्रत्यक्ष पाहणी करुन रक्कम रु.२,८२, ८२, ७५३ /- इतक्या रकमेचा आराखडा तयार केलेला आहे तसेच विद्युत विभाग यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रक्कम रु.८०,६७,३९४/- इतक्या रकमेचा आराखडा तयार केलेला आहे. (Pune Municipal Corporation)
तरी, विभागाने तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे उपरोक्त विकास कामास रक्कम रु.३,६३,५०,१४७/- इतका निधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. (PMC Pune)
News Title | Health Minister Dr. Tanaji Sawant Health Minister Dr Tanaji Sawant gave this order to Pune Municipal Commissioner

Water Closure | शनिवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद

Categories
Breaking News PMC social पुणे

कात्रज, कोंढवा परिसरात शनिवारी पाणीपुरवठा बंद

पुणे महानगरपालिका समान पाणीपुरवठा प्रकल्प विभागामार्फत कोंढवा बुद्रुक येथील केदारेश्वर साठवण टाकी व कात्रज येथील महादेव मंदिर साठवण टाक्यामध्ये येणारे पाणी मोजणेकामी राजीव गांधी पंपिंग स्टेशन कात्रज येथे १२९६ मि.मी. व्यासाच्या दाब जलवाहिनीवर पाण्याचे फ्लो मीटर बसविणेचे काम २५/०२/२०२३ वार शनिवार रोजी हाती घेण्यात येत असून या दिवशी बाधित होणारे भागास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

| पाणीपुरवठा बंद असणारा भाग
कात्रज गावठाण, गुजरफाटा, निंबाळकर वस्ती, उत्कर्ष सोसायटी, भूषण सोसायटी, ओमकार सोसायटी, राजस सोसायटी, वरखडे नगर, माउली नगर, शिवशंभोनगर, गोकुळनगर, सुखसागर नगर भाग-१ व २, साईनगर, गजानननगर, काकडे वस्ती, गंगाधाम शत्रुंजय रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, टिळेकर नगर येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक गावठाण, श्रद्धानगर, पुण्यधाम आश्रम रस्ता, तालाब कंपनी परिसर, लक्ष्मीनगर, आंबेडकर नगर, खडीमिशन परिसर, बधेनगर, येवलेवाडी मुख्य रस्ता,
राजीव गांधीनगर, अप्पर इंदिरानगर परिसराचा काही भाग,

Katraj Traffic | कात्रज परिसरातील वाहतूक कोंडी वरून धिक्कार आंदोलन  | नाना भानगिरे यांच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्र्यांशी झाला संवाद 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

कात्रज परिसरातील वाहतूक कोंडी वरून धिक्कार आंदोलन

| नाना भानगिरे यांच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्र्यांशी झाला संवाद

कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीसोडविण्यासाठी मेट्रो, उड्डाणपूल आणिग्रेड सेपरेटर या तिन्ही प्रकल्पांचा एकात्मिक वाहतूक आराखडा करण्यातयावा, यांसह पाणी, डीपी रस्ते, आरक्षितजागा आणि वाढलेला कर अशाविविध मागण्यांसाठी रविवारी सकाळीशेकडो नागरिकांनी कात्रज विकासआघाडीच्या नेतृत्त्वाखाली ‘धिक्कारआंदोलन’ केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे संवाद साधूनसर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यातआले. यामध्ये बाळासाहेबांची शिवसेनेचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे (city president Nana Bhangire) यांचा पुढाकार महत्वाचा ठरला.
कात्रजमधील विविध समस्यांच्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी कात्रज विकासआघाडी तयार केली आहे. रविवारीविविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. विविध मागण्यांचेफलक हातात घेऊन सकाळी शेकडोनागरिक चौकात एकत्र आले होते.या वेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचेशहरप्रमुख प्रमोद भानगिरे तेथे आले. त्यांनी नागरिकांच्या मागण्यांबाबत फोनद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद घडवून आणला. यानंतर ‘धिक्कार आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे विकास आघाडीचे प्रमुख नमेश बाबर यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान चौकात मोठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

(Katraj Traffic agitation)
आंदोलकांच्या मागण्या काय? 
कात्रज वंडर सिटी ते कात्रज- कोंढवा रस्त्यावरील चालू असलेल्या उड्डाणपुलाचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. ते त्वरित थांबवावे. भविष्याचा वेध घेऊन मेट्रो, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर या तिन्ही प्रकल्पांचा एकात्मिक वाहतूक आराखडा (डीपीआर) करण्यात यावा. कात्रजसाठी सुरक्षित जागेत ‘महावितरण’चे अति उच्चदाब उपकेंद्र उभारावे, २४ तास पाणीपुरवठा योजना मार्गी लावावी, पालिकेत समावेश झालेल्या गावांना पायाभूत सुविधा द्याव्यात, वाढवण्यात आलेला कर कमी
करावा, अशा अनेक मागण्या या वेळी करण्यात आल्या.
मुख्यमंत्र्यांचा नागरिकांशी  संवाद
आंदोलनादरम्यान बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख भानगिरे यांनी नागरिकांचा आक्रोश प्रमोद पाहून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला आणि माहिती दिली. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलकांशी संवाद साधला. ‘चांदणी चौकामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न जसा सोडवला,
तसा कात्रज चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडवावा, नागरिकांना मूलभूत सुविधा द्याव्यात, महापालिकेचा वाढीव कर कमी करावा, अशा अनेक मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. यावर शिंदे यांनी सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन वाहतूक कोंडीसह सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.

corporators in Katraj : कात्रज मधील दोन नगरसेवक कशामुळे भांडले? : Video वायरल!

Categories
Breaking News PMC Political पुणे

कात्रज मधील दोन नगरसेवक कशामुळे भांडले?

पुणे : पुण्यातील कात्रज येथील प्रभाग क्र ३८ अंतर्गत उत्कर्ष सोसायटीच्या ३० फूट मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये वाद जुंपला. या दोघांमध्ये थेट रस्त्यावरच वाद विवाद सुरू झाल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी दोघांनी भूमिपूजन करा पण वाद करू नका असे सांगितले.

याविषयी अधिक माहिती अशी की, उत्कर्ष सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम व भाजप नगरसेविका मनिषा कदम यांनी डांबरीकरण कामासाठी निधी आपणच मंजूर केला असल्याचे सांगताना दोघांमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.