Road Works | रिईनस्टेटमेंट च्या नावाखाली चुकीची कामे | कॉंग्रेसचा आरोप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

रिईनस्टेटमेंट च्या नावाखाली चुकीची कामे | कॉंग्रेसचा आरोप

रस्त्याची निकृष्ट कामे करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करा

: कॉंग्रेसची महापालिका अतिरिक्त आयुक्ताकडे मागणी

पुणे | सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण न करण्याची मागणी कॉंग्रेसच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवाय  निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदार व अधिकारी याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

याबाबत कॉंग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी अतिरिक्त आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार  मध्यवर्ती भागामध्ये ड्रेनेज,२४-७ पाणी पुरवठा, यांचीं कामे चालू आहेत.हि कामे करीत असताना रस्त्यावर राडारोडा,पाईप,माती य तश्याच आहेत. हि कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे च पाहायला मिळत आहे. मनपा ने दिलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्याचे वर्तमानपत्रातून अनेक वेळा दिसून येत आहे, या कामाच्या ठिकाणी अनेक वेळा अपघात सुद्धा झाले आहेत,रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे याचा नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पुणे मनपा मुळे नागरिकांचा जीवीतास धोका निर्माण झाला आहे, अशी परीस्थीती शहरात आहे. नागरिकांनी याची तक्रार मनपा च्या पथ आणि ड्रेनेज विभाग याच्याकडे करून सुद्धा त्याच्याकडे अधिकारी कानाडोळा करून संबधित ठेकेदार यांना पाठीशी घालून कामे निकुष्ट दर्जाची करून घेत आहेत. यामुळे पावसाळ्यात रस्ते खचणे,रस्त्यावर पाणी साचणे हे प्रकार घडणार आहेत.

बालगुडे निवेदनात म्हटल्यानुसार रिईनस्टेटमेंट च्या नावाखाली चुकीची कामे केली जात आहेत. शहरातील खोदाई झालेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्या ऐवजी त्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रीट केले जाते.हे व्यवस्थित केले जात नाही. यामुळे रोड खचणे व त्यावर डांबर टाकणे असा प्रकार पथ विभाग आणि ड्रेनेज विभाग यांच्याकडून होत आहे,एक काम दोन ते तीन वेळा करण्याचे प्रकार घडत आहे. या विषयी आपणकडे २७-१-२०२२ रोजी तक्रार केलेली आहे.तरी यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

Mukta Tilak : Prabhag no 15 : आपल्या प्रभागातील रस्त्यांची कामे आणि खर्चाची आमदार मुक्ता टिळक यांनी मागवली माहिती 

Categories
Breaking News PMC Political पुणे

आपल्या प्रभागातील रस्त्यांची कामे आणि खर्चाची आमदार मुक्ता टिळक यांनी मागवली माहिती

पुणे : प्रभाग क्रमांक 15 मधील रस्त्यांच्या कामावरून स्थायी समिती(Staning Commitee) विरुद्ध आमदार मुक्ता टिळक(MLA Mukta Tilak) असा वाद पाहायला मिळाला होता. आमदार टिळक यांनी स्थायी समिती कामे अडवत असल्याचा आरोप केला होता. त्यांनतर आता आमदार टिळक यांनी प्रभाग 15 मधील रस्त्यांची कामे, खर्च आणि तरतुदीची माहिती महापालिका प्रशासनाकडे(PMC) मागितली आहे.

: कुठली माहिती मागवली?

शिवाजी रस्ता डांबरीकरण करण्यासाठी आमदार मुक्ता टिळक यांनी स्थायी समितीकडे वर्गीकरण करण्या संदर्भात प्रस्ताव दिला होता. मात्र समितीने तो दोन महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. समितीच्या या भूमिकेमुळे वादंग निर्माण झाले होते. आमदार टिळक यांनी स्थायी समिती कामे अडवत असल्याचा आरोप(Allegation) केला होता. त्यांनतर आता आमदार टिळक यांनी प्रभाग 15 मधील रस्त्यांची कामे, खर्च आणि तरतुदीची माहिती महापालिका प्रशासनाकडे मागितली आहे.

टिळक यांच्या पत्रानुसार माझ्या प्रभाग क्र. १५ मधील छ. शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर आणि कुमठेकर रस्ता या मुख्य रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्ती बाबत खालील माहिती(Information) मिळावी.

१) वर उल्लेख केलेल्या मुख्य रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्ती आणि डांबरीकरणासाठी प्रत्येकी किती खर्च अपेक्षित आहे?
२) या खर्चासाठी प्रत्येक रस्त्यास किती निधि उपलब्ध आहे?
३) आवश्यक निधि उपलब्ध नसल्यास त्याची पूर्तता कुठून करण्यात येणार आहे अथवा केलेली आहे. तरतूद केली असल्यास कधी करण्यात आली आहे?
4) वर उल्लेख केलेल्या मुख्य रस्त्यांच्या दुरुस्ती आणि डांबरीकरणासाठीच्या निविदा प्रक्रियेच्या सद्यस्थितीची माहिती मिळावी.
वर उल्लेख केलेल्या विषयांबाबत संपूर्ण माहिती ३ दिवसात लेखी स्वरुपात मिळावी. असे ही पत्रात म्हटले आहे.

Deepali Dhumal : Road Works : रस्ते खोदाईस परवानगी देताना रस्ते पूर्ववत करण्याची अट घाला  : विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

Categories
PMC Political पुणे

रस्ते खोदाईस परवानगी देताना रस्ते पूर्ववत करण्याची अट घाला

: विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची आयुक्तांना मागणी

पुणे : शहरातील रस्ते, पाण्याची पाईप लाईन, विद्युत, ड्रेनेज, भूमिगत केबल आदि कामांसाठी खोदाई केली जाते. या सर्व कामांमध्ये अनेकदा पाण्याची पाईप लाईन ,ड्रेनेज लाईन ,तुटतात किंवा फुटतात परंतु त्या योग्य पद्धतीने दुरुस्ती केल्या जात नाही,अथवा त्या दुरुस्त न करताच तश्याच ठेवल्या जातात. यामुळे नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे विविध कारणासाठी रस्त्यांची खोदाईस परवानगी देतांना व खोदाई नंतर रस्ते पूर्ववत वदुरुस्ती करताना रस्ते पूर्वी होते तसेच करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात यावी. अशी मागणी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

: नागरिकांना नाहक त्रास

याबाबत धुमाळ यांनी महापालिका आयुक्त यांना एक पत्र दिले आहे. त्यानुसार  शहरातील रस्ते, पाण्याची पाईप लाईन, विद्युत, ड्रेनेज, भूमिगत केबल आदि कामांसाठी खोदाई केली जाते.सदर कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यासाठी अनेकदा सिमेंट कोन्क्रीटचा वापर केला जातो परंतु जे रस्ते डांबरी करण केलेले आहेत असे रस्तेही कॉंक्रीट द्वारेच पूर्ववत केले जातात त्यामुळे सदर रस्त्यान मध्ये उंचवटा किंवा खोलगट भाग निर्माण होतो व अनेकदा सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. तसेच फुटपाथ व ब्लॉक बसविलेल्या ठिकाणी रस्ते खोदाई नंतर अशाच प्रकारे कॉंक्रीट द्वारेच पूर्ववत केले जाते. त्यामुळे फुटपाथही नागरिकांना वापरास सुलभ राहत नाही. या सर्व कामांमध्ये अनेकदा पाण्याची पाईप लाईन ,ड्रेनेज लाईन ,तुटतात किंवा फुटतात परंतु त्या योग्य पद्धतीने दुरुस्ती केल्या जात नाही,अथवा त्या दुरुस्त न करताच तश्याच ठेवल्या जातात. पत्रात पुढे म्हटले आहे कि विविध कामांसाठी रस्ते खोदाई परवानगी देताना ठराविक मुदतीची अट घातली जाते ; परंतु मुदत संपल्यानंतर ही सदर काम चालू ठेवले जाते. तसेच कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या जीवितास धोका होणार नाही नया साठी आवश्यक खबरदारी घेतली जात नाही.या सर्व बाबतीत संबधीत ठेकेदार व अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.
या रस्ते खोदाई परवानगी देताना नियम व अटींमध्ये खोदाई नंतर रस्ते पूर्ववत करताना डांबरी रस्ते डांबरीकरण करून व सिमेंट रस्ते कॉंक्रीटीकरण करून तसेच फुटपाथ व पेविंग ब्लॉकचे रस्ते पेविंग ब्लॉकनेच दुरुस्त करणे बाबत समावेश करणे आवश्यक आहे.
तरी विविध कारणासाठी रस्त्यांची खोदाई केल्यानंतर रस्ते पूर्ववत व दुरुस्ती करताना ठेकेदारास रस्ते पूर्ववत करतांना पूर्वी होते तसेच करण्याची अट घालण्यात यावी. अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

corporators in Katraj : कात्रज मधील दोन नगरसेवक कशामुळे भांडले? : Video वायरल!

Categories
Breaking News PMC Political पुणे

कात्रज मधील दोन नगरसेवक कशामुळे भांडले?

पुणे : पुण्यातील कात्रज येथील प्रभाग क्र ३८ अंतर्गत उत्कर्ष सोसायटीच्या ३० फूट मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनावरून स्थानिक नगरसेवकांमध्ये वाद जुंपला. या दोघांमध्ये थेट रस्त्यावरच वाद विवाद सुरू झाल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी दोघांनी भूमिपूजन करा पण वाद करू नका असे सांगितले.

याविषयी अधिक माहिती अशी की, उत्कर्ष सोसायटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रकाश कदम व भाजप नगरसेविका मनिषा कदम यांनी डांबरीकरण कामासाठी निधी आपणच मंजूर केला असल्याचे सांगताना दोघांमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

PMC: Road works: congress: रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा : आंदोलन करण्याचा काँग्रेस चा इशारा

Categories
PMC Political पुणे

  रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा

: आंदोलन करण्याचा काँग्रेस चा इशारा

पुणे : पुणे शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ते छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता,टिळक रस्ता या रस्त्यांवर ड्रेनेज लाईन,स्मार्ट सिटी अंतर्गत चौक सुशोभीकरण,24×7 पाणीपुरवठा या विभागांची कामे चालू आहेत. मात्र यामुळे नागरिकांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार याला जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेस ने केला आहे. शिवाय यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस चे सरचिटणीस हृषिकेश बालगुडे यांनी केली आहे.

: नागरिकांना नाहक त्रास

याबाबत बालगुडे यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार गेले अनेक महिन्यांपासून या विभागांच्या प्रमुखांना अनेक वेळा निवेदन देऊन झाले आहे, ठेकेदार वर्गाला कोणत्याही प्रकारचे कारवाई अथवा त्यांच्याकडून कामे करताना हे अधिकारी दिसत नाही. पुणे महानगरपालिकेने दिलेल्या अटी व नियमांचे पालन करताना हे ठेकेदार दिसत नाही. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे त्यांच्या चुका दाखवून सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते प्रमुख प्रकल्प ड्रेनेज,पाणीपुरवठा, पथ हे पुणेकरांच्या जीवाशी स्पष्टपणे खेळत आहेत. अनेक रस्त्यांवर झालेला राडारोडा, खड्डे यांचं निवारण कुठेही झाल्याचे दिसून येत नाही. नागरिकांना पुणे शहरातील रस्त्यावरून जाताना अक्षरशः जीव मुठीत धरून जावं लागत आहे. याबाबत हि कामे त्वरित पूर्ण न केल्यास तसेच आपण संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई न केल्यास आपल्या दालना पुढे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे.याची सर्वस्वी जबाबदारी                                                               आपली राहील. असा इशारा बालगुडे यांनी दिला आहे.