Road Works | रिईनस्टेटमेंट च्या नावाखाली चुकीची कामे | कॉंग्रेसचा आरोप 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

रिईनस्टेटमेंट च्या नावाखाली चुकीची कामे | कॉंग्रेसचा आरोप

रस्त्याची निकृष्ट कामे करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करा

: कॉंग्रेसची महापालिका अतिरिक्त आयुक्ताकडे मागणी

पुणे | सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण न करण्याची मागणी कॉंग्रेसच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवाय  निकृष्ट दर्जाची रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदार व अधिकारी याच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

याबाबत कॉंग्रेसचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे यांनी अतिरिक्त आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार  मध्यवर्ती भागामध्ये ड्रेनेज,२४-७ पाणी पुरवठा, यांचीं कामे चालू आहेत.हि कामे करीत असताना रस्त्यावर राडारोडा,पाईप,माती य तश्याच आहेत. हि कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे च पाहायला मिळत आहे. मनपा ने दिलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्याचे वर्तमानपत्रातून अनेक वेळा दिसून येत आहे, या कामाच्या ठिकाणी अनेक वेळा अपघात सुद्धा झाले आहेत,रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे याचा नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पुणे मनपा मुळे नागरिकांचा जीवीतास धोका निर्माण झाला आहे, अशी परीस्थीती शहरात आहे. नागरिकांनी याची तक्रार मनपा च्या पथ आणि ड्रेनेज विभाग याच्याकडे करून सुद्धा त्याच्याकडे अधिकारी कानाडोळा करून संबधित ठेकेदार यांना पाठीशी घालून कामे निकुष्ट दर्जाची करून घेत आहेत. यामुळे पावसाळ्यात रस्ते खचणे,रस्त्यावर पाणी साचणे हे प्रकार घडणार आहेत.

बालगुडे निवेदनात म्हटल्यानुसार रिईनस्टेटमेंट च्या नावाखाली चुकीची कामे केली जात आहेत. शहरातील खोदाई झालेल्या ठिकाणी डांबरीकरण करण्या ऐवजी त्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रीट केले जाते.हे व्यवस्थित केले जात नाही. यामुळे रोड खचणे व त्यावर डांबर टाकणे असा प्रकार पथ विभाग आणि ड्रेनेज विभाग यांच्याकडून होत आहे,एक काम दोन ते तीन वेळा करण्याचे प्रकार घडत आहे. या विषयी आपणकडे २७-१-२०२२ रोजी तक्रार केलेली आहे.तरी यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply