Deepali Dhumal : Road Works : रस्ते खोदाईस परवानगी देताना रस्ते पूर्ववत करण्याची अट घाला  : विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

Categories
PMC Political पुणे
Spread the love

रस्ते खोदाईस परवानगी देताना रस्ते पूर्ववत करण्याची अट घाला

: विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची आयुक्तांना मागणी

पुणे : शहरातील रस्ते, पाण्याची पाईप लाईन, विद्युत, ड्रेनेज, भूमिगत केबल आदि कामांसाठी खोदाई केली जाते. या सर्व कामांमध्ये अनेकदा पाण्याची पाईप लाईन ,ड्रेनेज लाईन ,तुटतात किंवा फुटतात परंतु त्या योग्य पद्धतीने दुरुस्ती केल्या जात नाही,अथवा त्या दुरुस्त न करताच तश्याच ठेवल्या जातात. यामुळे नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे विविध कारणासाठी रस्त्यांची खोदाईस परवानगी देतांना व खोदाई नंतर रस्ते पूर्ववत वदुरुस्ती करताना रस्ते पूर्वी होते तसेच करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात यावी. अशी मागणी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

: नागरिकांना नाहक त्रास

याबाबत धुमाळ यांनी महापालिका आयुक्त यांना एक पत्र दिले आहे. त्यानुसार  शहरातील रस्ते, पाण्याची पाईप लाईन, विद्युत, ड्रेनेज, भूमिगत केबल आदि कामांसाठी खोदाई केली जाते.सदर कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यासाठी अनेकदा सिमेंट कोन्क्रीटचा वापर केला जातो परंतु जे रस्ते डांबरी करण केलेले आहेत असे रस्तेही कॉंक्रीट द्वारेच पूर्ववत केले जातात त्यामुळे सदर रस्त्यान मध्ये उंचवटा किंवा खोलगट भाग निर्माण होतो व अनेकदा सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. तसेच फुटपाथ व ब्लॉक बसविलेल्या ठिकाणी रस्ते खोदाई नंतर अशाच प्रकारे कॉंक्रीट द्वारेच पूर्ववत केले जाते. त्यामुळे फुटपाथही नागरिकांना वापरास सुलभ राहत नाही. या सर्व कामांमध्ये अनेकदा पाण्याची पाईप लाईन ,ड्रेनेज लाईन ,तुटतात किंवा फुटतात परंतु त्या योग्य पद्धतीने दुरुस्ती केल्या जात नाही,अथवा त्या दुरुस्त न करताच तश्याच ठेवल्या जातात. पत्रात पुढे म्हटले आहे कि विविध कामांसाठी रस्ते खोदाई परवानगी देताना ठराविक मुदतीची अट घातली जाते ; परंतु मुदत संपल्यानंतर ही सदर काम चालू ठेवले जाते. तसेच कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या जीवितास धोका होणार नाही नया साठी आवश्यक खबरदारी घेतली जात नाही.या सर्व बाबतीत संबधीत ठेकेदार व अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे.
या रस्ते खोदाई परवानगी देताना नियम व अटींमध्ये खोदाई नंतर रस्ते पूर्ववत करताना डांबरी रस्ते डांबरीकरण करून व सिमेंट रस्ते कॉंक्रीटीकरण करून तसेच फुटपाथ व पेविंग ब्लॉकचे रस्ते पेविंग ब्लॉकनेच दुरुस्त करणे बाबत समावेश करणे आवश्यक आहे.
तरी विविध कारणासाठी रस्त्यांची खोदाई केल्यानंतर रस्ते पूर्ववत व दुरुस्ती करताना ठेकेदारास रस्ते पूर्ववत करतांना पूर्वी होते तसेच करण्याची अट घालण्यात यावी. अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Leave a Reply