Mallikarjun Kharge’s birthday | कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक ऐक्याचा संकल्प

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Mallikarjun Kharge’s birthday | कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त धार्मिक व सामाजिक ऐक्याचा संकल्प

Mallikarjun Kharge’s birthday | आज सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Congress President Mallikarjun Kharge’s birthday) यांना वाढदिवसानिमित्त आशीर्वाद देतानाच, शांततेचा व समानतेचा संदेश दिला हे महत्वाचे आहे. देशातील धार्मिक व जातीय एकोपा आज धोक्यात आणण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करीत आहेत, त्याला विरोध केला पाहिजे. देशाला धार्मिक व सामाजिक ऐक्याची गरज आहे आणि त्याचा संकल्प आपण सर्वांनी ऐतिहासिक जेधे मॅन्शन येथून कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त करावा असे आवाहन ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार (Ulhas Pawar) यांनी केले. (Mallikarjun Kharge’s birthday)

अ. भा. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ऐतिहासिक जेधे मॅन्शन येथे आयोजित ‘सामाजिक ऐक्य’ सभेत अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी हिंदू धर्मगुरू पंडित तेजस लक्ष्मण सप्तर्षी, शीख धर्मगुरू ग्यानी अमरजीत सिंग, मुस्लिम धर्मगुरू मौलाना अजरान गोवर साब, बौद्ध धर्मगुरू भन्ते उपाली बोधी, ख्रिश्चन धर्मगुरू रेवरंड सुधीर चव्हाण आणि या ‘सामाजिक ऐक्य’ सभेचे आयोजक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, दत्ता बहिरट, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, भिमराव पाटोळे, रमेश अय्यर, नुरुद्दीन सोमजी आदी प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

उल्हास पवार यांनी जेधे मॅन्शनचे ऐतिहासिक महत्व विषद करून म्हंटले की, आज देशाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. मणिपूर राज्यांमध्ये माता भगिनींवर गेली तीन महिने भरदिवसा अत्याचार होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. सर्व धर्माचे ऐक्य आणि सामंजस्यासाठी राहुल गांधी यांनी जो प्रेमाचा संदेश दिला, त्यांच्या या कामाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे ते म्हणाले.

विविधतेत एकता म्हणजेच भारत

या प्रसंगी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना शुभेच्छा देऊन म्हंटले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्व जाती धर्माचे लोक ब्रिटिशांविरूद्ध एकत्र लढले, सारा समाज जाती व धर्मभेद विसरून लढला. मात्र आता स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर याच समाजात धर्म आणि जात यांमध्ये दुही माजवून सामाजिक ऐक्याला सत्ताधारी बाधा आणत आहेत. अशा समाज द्रोही शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याचा संकल्प कॉंग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त करूया असे सांगून ते म्हणाले की, भिन्न जाती व धर्म हे आपले देशाचे वैशिष्ट्य आहे आणि या विविधतेत ऐक्य आहे हेच अधिक महत्वाचे आहे. कॉंग्रेस पक्षाने या विविधतेत ऐक्य राखले. मात्र सत्ताधारी केवळ सत्ता राखण्यासाठी समाजात तेढ निर्माण करीत आहेत. अशी तेढ निर्माण झाली तर काय होते याचे मणिपूरमधील घटना हे उत्तम उदाहरण आहे. देशात असे घडू नये म्हणून समाजात दुही माजवणाऱ्यांचा सदैव पराभव केला पाहिजे असे ते म्हणाले.

या प्रसंगी सर्व धर्मगुरूंनी आपली मनोगते व्यक्त केली आणि सामजिक व धार्मिक सलोखा हीच भारताची खरी ओळख असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन कान्होजी जेधे यांनी केले.

याप्रसंगी कॉंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. त्यामध्ये जया किराड, सोमेश्वर बालगुडे, प्रवीण करपे, शाबीर खान, चेतन अग्रवाल, आयुब पठाण, सुभाष थोरवे, भरत सुराणा, विनोद रणपिसे, स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, शानी नैशाद, प्राची दुधाने, शिवानी माने, रोहिणी मल्लाव, संगिता क्षिरसागर, रवींद्र मोहिते, बाबा सय्यद, साहिल राऊत, सचिन बहिरट, गोरख पळसकर, सुभाष जाधव, अविनाश अडसूळ, जयकुमार ठोंबरे, नितीन जैन, सलीम शेख, ओंकार मोरे, नरेश धोत्रे, उमेश काची, किशोर मारणे, डॉ. अनुपम बेगी, राजू परदेशी भंडारी, महेंद्र चव्हाण, अश्फाक शेख, शकील ताजमहल, शाकिब आबाजी, इरफान खान, शाहरुख पठाण, नरेश धोत्रे, लहू जावळेकर, साहिल भिंगे, साईराज नाईक, अनिकेत वनकर, संतोष चव्हाण आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


News Title |Resolution of religious and social unity on the occasion of Congress party president Mallikarjun Kharge’s birthday